Job Opportunity : आयटी-बीपीएम क्षेत्रात यावर्षी मिळणार 3 लाख नोकऱ्या...

Career in IT sector : देशातील आयटी क्षेत्रात यंदा करियरच्या जोरदार संधी आहेत. एरवीही हे क्षेत्र नोकरीच्या मोठी संधी (Job opportunity) आणि चांगल्या पगारासाठी प्रसिद्ध आहे. त्यातच आता आयटी-बीपीएम (IT-BPM) उद्योग या वर्षी भारतात सुमारे 3 लाख नोकर्‍या देण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या क्षेत्रातील एकूण कर्मचारी संख्या 51 लाखावरून 54.5 लाख इतकी होईल. टीएमलीसच्या (TeamLease) डिजिटल एम्प्लॉयमेंट आऊटलूक अहवालानुसार, 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये आयटी-बीपीएम उद्योग 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

Jobs in IT companies
आयटी कंपन्यांमध्ये मोठी नोकरभरती 
थोडं पण कामाचं
  • आयटी क्षेत्रात यंदा करियरच्या जोरदार संधी मिळणार
  • आयटी-बीपीएम (IT-BPM) उद्योग या वर्षी भारतात सुमारे 3 लाख नोकर्‍या देण्यासाठी सज्ज
  • टीएमलीसच्या (TeamLease) डिजिटल एम्प्लॉयमेंट आऊटलूक अहवालानुसार, 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये आयटी-बीपीएम उद्योग 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

Career Opportunity in IT-BPM : नवी दिल्ली : देशातील आयटी क्षेत्रात यंदा करियरच्या जोरदार संधी आहेत. एरवीही हे क्षेत्र नोकरीच्या मोठी संधी (Job opportunity) आणि चांगल्या पगारासाठी प्रसिद्ध आहे. त्यातच आता आयटी-बीपीएम (IT-BPM) उद्योग या वर्षी भारतात सुमारे 3 लाख नोकर्‍या देण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या क्षेत्रातील एकूण कर्मचारी संख्या 51 लाखावरून 54.5 लाख इतकी होईल. टीएमलीसच्या (TeamLease) डिजिटल एम्प्लॉयमेंट आऊटलूक अहवालानुसार, 2022-2023 या आर्थिक वर्षामध्ये आयटी-बीपीएम उद्योग 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा फायदा होत या क्षेत्रातील रोजगार आणि करियरच्या संधीदेखील वाढणार आहेत. (IT-BPM industry to offer 3 lakhs job opprortuinity this year)

अधिक वाचा : Swapnil Joshi: अभिज्ञा भावेचं 'हे' आहे Top Secret,स्वप्निल जोशीनं नक्कल करत शेअर केला व्हिडिओ

सर्वाधिक नोकऱ्या देणाऱ्या क्षेत्रांमध्ये आयटीचा समावेश

दुसरीकडे, कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या 21 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. IT सेवा कंपन्या, जागतिक क्षमता केंद्रे (GCCs) आणि उत्पादन विकास कंपन्या यामध्ये सर्वाधिक कंत्राटी कर्मचारीआहेत. त्यांचा यातील हिस्सा 70 टक्क्यांहून अधिक आहे. खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक असण्यासोबतच, आयटी उद्योग भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये (GDP)8 टक्क्यांहून अधिक योगदान देतो. हे जागतिक आउटसोर्सिंग मार्केटच्या जवळपास 55 टक्के आहे.

टीमलीज डिजिटल सीओओ सुनील चेन्नाकोटील यांनी म्हटले की, “आयटी-बीपीएम उद्योग हा भारतातील एक वाढणार उद्योग आहे. हा खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा रोजगार निर्मिता उद्योग आहे. हे क्षेत्र सुमारे 39 लाख  लोकांना रोजगार देते आणि जीडीपीमध्ये 8 टक्क्यांहून अधिक योगदान देते. जागतिक आउटसोर्सिंग मार्केटच्या 55 टक्के एवढा हा उद्योग आहे”

अधिक वाचा : या दिग्गज क्रिकेटरने 'गे' असल्याचा केला धक्कादायक खुलासा

छोट्या शहरांमधील तरुणांना मिळणार संधी

या आर्थिक वर्षाच्या अखेरीस डिजिटल कौशल्यासाठीची मागणीही 8.4 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. 10 पैकी किमान 7 आयटी कंपन्या टियर-1 कंपन्या, उत्पादन कंपन्या, ग्लोबल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स (GIC) प्लेयर्स आणि स्टार्टअप्सच्या उपस्थितीमुळे वाढत्या मागणीमुळे उदयोन्मुख ठिकाणांहून उमेदवार शोधतील. तिरुवनंतपुरम, कोईम्बतूर, कोचीन, चंदीगड, अहमदाबाद, इंदूर, म्हैसूर, वडोदरा, जयपूर, मदुराई, विशाखापट्टणम, मंगलोर, लखनौ, गोवा, सेलम, नागपूर, दुर्गापूर, विजयवाडा आणि त्रिची ही 20 ठिकाणे आहेत अशी आहेत जी 85% पेक्षा जास्त योगदान देतात.

अधिक वाचा : Rape in hotel : नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले हॉटेलमध्ये, मग केला बलात्कार

मागील वर्षीही केली होती मोठी नोकरभरती

टीसीएस (TCS), विप्रो ( Wipro) आणि इन्फोसिस ( Infosys) या देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांनी (IT Compnaies) मागील आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने नोकरभरती केली. या प्रमुख कंपन्यांनी म्हटले होते की ते चालू आर्थिक वर्षामध्ये त्यांची नियुक्ती मोहीम सुरू ठेवतील. ज्यामध्ये गेल्या वर्षी मोठी वाढ झाली होती. अहवालानुसार, तीन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी 2021 मध्ये विक्रमी 1.7 लाख कर्मचारी नियुक्त केले होते. 2020 मध्ये ही संख्या फक्त 31,000 होती, अशी माहिती समोर आली  आहे.

आयटी क्षेत्रातील मागील वर्षाचाच ट्रेंड यंदादी सुरू राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कंपन्या यंदाही दणकून नोकरभरती करणार असल्याचे दिसते आहे. यामुळे तरुणांना या क्षेत्रात करियरच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी