CEO Salaries: पाहा विप्रो, इन्फोसिसच्या सीईओंना किती कोटींचे मिळते पॅकेज?

काम-धंदा
Updated Jun 13, 2019 | 14:23 IST | टाइम्स नाऊ हिंदी

CEO Salaries: विप्रोचे अझीम प्रेमजी रिटायर होत आहेत. त्यांनी आपल्या कंपनीची जबाबदारी रिशद या आपल्या मुलाकडे सोपवली आहे. अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीच्या निमित्तानं कंपन्यांच्या सीईओंचे पॅकेज चर्चेत आहेत.

CEO Salaries
पाहा आयटी कंपन्यांच्या सीईओंना किती असतो पगार   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली: असं म्हटलं जातं की, महिलेला तिचं वय आणि पुरुषाला त्याचा पगार कधी विचारू नये. पण, जगात अशी काही लोकं आहे की, ज्यांच्या पगाराची चर्चा सगळीकडेच होते. अर्थातच बड्या कंपनीच्या मोठ्या-मोठ्या पदांवर ही मंडळी काम करत असतात. त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केलेला असतो, अनुभव घेतलेला असतो. तसंच ते पद म्हणजे खूप मोठी जबाबदारीही असते. विप्रो, इन्फोसिस, टीसीएस या कंपन्यांची नावं आपल्या अधून मधून तोंडावर असतात. बातम्यांमधून या कंपन्यांची प्रगती, उलाढाल कळत असते. पण, या सगळ्यामागे काही जबाबदार हात असतात. त्या हातांमुळेच कंपन्या पुढं जात असतात. विप्रोचे अझीम प्रेमजी नुकतेच रिटायर झाले आहेत. त्यांनी आपल्या कंपनीची जबाबदारी रिशद या आपल्या मुलाकडे सोपवली आहे. अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीच्या निमित्तानं कंपन्या आणि त्यांचे सीईओ तसंच त्याचे पगार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

आबिदअली निमचवाला - विप्रो

विप्रो कंपनीतून अझीम प्रेमजी रिटायर झाले आहेत. त्यांची कंपनी मुलगा रिशद प्रेमजी चालवणार असला तरी, कंपनीचे सीईओ म्हणून आबिदअली निमचवाला काम करतात. गेल्या वर्षभरात निमचवाला यांचा पगार ४० टक्क्यांनी वाढला आहे. आबिदअली निमचवाला यांनी वर्षाला २७ कोटी रुपयांचे पॅकेज मिळते. गेल्या वर्षी त्यांना १९.३ कोटी रुपये पगार मिळाला होता. येत्या ३१ जुलैला अझीम प्रेमजी रितरसर निवृत्त होत आहेत. त्यामुळे या मधल्या काळात आबिदअली निमचवाला यांनी सीईओबरोबरच व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पहावे लागत आहे. प्रेमजी यांनी विप्रोमध्ये ५३ वर्षे काम केले आहे. आता ते कंपनीचे फाऊंडर चेअरमन होणार आहेत.

रिशद प्रेमजी – विप्रो

अझीम प्रेमजी यांच्याकडून विप्रोची सूत्रे स्वीकारलेले रिशद कंपनीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते कंपनीमध्ये सक्रीय आहेत. नव्याने अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या पगारात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे विप्रोचे सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) जतिन दलाल यांचा पगार २३ टक्क्यांनी वाढला आहे. निमचवाला आणि रिशद यांना दर वर्षी व्हेरिअबल (बदलणारा) पगार मिळतो.

विप्रोची वाढ मंदावलेली

विप्रो कंपनीच्या सीईओ, सीएफओ आणि अध्यक्षांना प्रचंड मोठा पगार मिळत असला तरी, कंपनीची वाढ फारशी समाधानकारक झालेली नाही. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला डॉर्लसमध्ये केवळ ५.४ टक्के वाढ करता आली आहे. तर त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी इंफोसिसने ९ टक्क्यांची वाढ  मिळवली आहे. मुळात आयटी कंपन्या आपल्या सीईओंना खूप मोठा पगार देतात. सध्या इन्फोसिसचे सीईओ असलेल्या सलील पारेख यांना कंपनी वर्षाला २४.६७ कोटी रुपयांची वार्षिक पॅकेज देते. दुसरीकडं टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथ यांना वर्षाला १६ कोटी रुपयांचे पॅकेज आहे. त्यांच्या पगारात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
CEO Salaries: पाहा विप्रो, इन्फोसिसच्या सीईओंना किती कोटींचे मिळते पॅकेज? Description: CEO Salaries: विप्रोचे अझीम प्रेमजी रिटायर होत आहेत. त्यांनी आपल्या कंपनीची जबाबदारी रिशद या आपल्या मुलाकडे सोपवली आहे. अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीच्या निमित्तानं कंपन्यांच्या सीईओंचे पॅकेज चर्चेत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola