ITR filing Latest Update: ITR दाखल करण्याची शेवटची तारीख जवळ, तर पडताळणीची मुदत वाढवली, वाचा सविस्तर बातमी

काम-धंदा
Updated Dec 29, 2021 | 16:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

ITR filing Latest Update: इन्कम टॅक्स रिटर्नची (Income Tax Return)प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला ITR दाखल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन (E-Verify) करावे लागेल. जर आयटीआरची निर्धारित वेळेत पडताळणी झाली नाही तर ते इनव्हॅलिड मानले जाते.

ITR filing date 31st December, extension for verification
ITR दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर, पडताळणीसाठी मुदतीत वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • CBDT ने ITR पडताळणीची अंतिम मुदत वाढवली
  • 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत ई-व्हेरिफिकेशन करता येईल
  • ३१ डिसेंबर ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आहे

ITR filing Latest Update: नवी दिल्ली: 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न  (Income Tax Return)भरण्यास अवघे काही दिवस उरले असून यादरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. CBDT ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी ई-फाइल केलेल्या ITR च्या पडताळणीची (Verification) अंतिम मुदत वाढवली आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत ई-व्हेरिफिकेशन करता येणार आहे. 


28 फेब्रुवारीपर्यंत ई-व्हेरिफिकेशन करता येईल

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने ITR च्या पडताळणीची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. प्राप्तीकर रिटर्नची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ITR भरल्यानंतर, तुम्हाला E-Verify करणे आवश्यक आहे. जर आयटीआरची पडताळणी निर्धारित कालावधीत केली नाही तर ते इनव्हॅलिड मानले जाते. 

या प्रकारे ITR e-verify करू शकता

1. आधार OTP द्वारे
2. नेट बँकिंगद्वारे ई-फायलिंग खात्यात लॉग इन करा
3. बँक खाते क्रमांकाद्वारे EVC
4. डीमॅट खाते क्रमांकाद्वारे EVC
5. बँकेच्या एटीएमद्वारे ईव्हीसी
6. ITR-V ची स्वाक्षरी केलेली प्रत पोस्टाद्वारे बंगळुरूच्या कार्यालयात पोस्टही करता येते. 

आधारद्वारे ITR E-Verify कसे करावे

स्टेप1: तुमच्या ई-फायलिंग खात्यात प्रवेश करण्यासाठी https://www.incometax.gov.in या वेबसाईटवर क्लिक करा. 


स्टेप 2: क्विक लिंक्स अंतर्गत ई-व्हेरिफाय रिटर्न पर्याय निवडा.


स्टेप 3: यामध्ये, आधारवर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP टाकून व्हेरिफायचा पर्याय निवडा. त्यानंतर e-Verify स्क्रीनवर क्लिक करा.


स्टेप 4: आधार OTP स्क्रीनवर चेक केल्याप्रमाणे 'Agree to Verify Aadhaar Details' निवडा. त्यानंतर Generate Aadhaar OTP वर क्लिक करा.


स्टेप 5: तुमच्या आधार-नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला 6-अंकी ओटीपी टाका, नंतर व्हॅलिडेट वर क्लिक करा.


स्टेप 6: लक्षात ठेवा हा OTP फक्त 15 मिनिटांसाठी वैध आहे. तुम्हाला योग्य OTP टाकण्यासाठी तीन संधी दिल्या जातील. तुम्हाला स्क्रीनवर OTP एक्सपायरी काउंटडाउन टाइमर देखील दिसेल, जो तुम्हाला OTP मिळाल्यावर वेळोवेळी सूचित करेल. जर तुम्ही Resend OTP वर क्लिक कराल तर पुन्हा एक नवीन OTP जनरेट होईल आणि तुम्हाला तो मिळेल.


स्टेप 7: आता मेसेज आणि ट्रांजेक्शन आयडी असलेली विन्डो ओपन होईल. पुढील वापरासाठी ट्रांजेक्शन आयडी जपून ठेवा. तुम्ही फाइलिंग पोर्टलवर दिलेल्या ई-मेल आणि 
मोबाईल नंबरवर आता कन्फरमेशनचा मेसेज येईल. 

३१ डिसेंबर ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आहे

आर्थिक वर्ष 2020-21 साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. यापूर्वी, आयटीआर दाखल करण्यासाठीची मुदत दोनदा वाढवण्यात आली होती
पहिल्यांदा 31 जुलै ते 30 सप्टेंबर आणि नंतर 30 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्व प्राप्तिकरदात्यांनी 31 डिसेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी