Cryptocurrency | जॅक डॉर्सी क्रिप्टोकरन्सीच्या जगात मोठा धमाका करण्याच्या तयारीत, आता घरबसल्या करता येणार बिटकॉइन मायनिंग

Bitcoin Mining : जॅक डोर्सी (Twitter Ex CEO, Jack Dorsey) यांनी डिजिटल चलनाच्या जगात धमाका करण्याची तयारी केली आहे. ब्लॉक (पूर्वी स्क्वेअर) चे संस्थापक डॉर्सी म्हणाले की ते ओपन बिटकॉइन मायनिंग सिस्टमवर (Open Bitcoin Mining System) काम करत आहेत . त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जॅक डोर्सी यांनी १६ ऑक्टोबर २०२१ रोजी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, 'स्क्वेअर ओपन बिटकॉइन मायनिंग सिस्टमवर काम करत आहे. आम्ही या प्रकल्पाला पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.'

Jack Dorsey to launch Open bitcoin mining system
जॅक डोर्सी क्रिप्टोकरन्सीच्या जगात मोठा धमाका तयारीत 
थोडं पण कामाचं
  • ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांचे बिटकॉइनच्या संदर्भात मोठे प्लॅनिंग
  • जॅक डॉर्सी यांची कंपनी बनवतेय ओपन बिटकॉइन मायनिंग सिस्टम
  • ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर करतायेत मोठे काम

Jack Dorsey : न्यूयॉर्क :  क्रिप्टोकरन्सीचे (Cryptocurrency) मोठे समर्थक असलेले ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Twitter Ex CEO, Jack Dorsey) यांनी डिजिटल चलनाच्या  जगात धमाका करण्याची तयारी केली आहे. ब्लॉक (पूर्वी स्क्वेअर) चे संस्थापक डॉर्सी म्हणाले की ते ओपन बिटकॉइन मायनिंग सिस्टमवर (Open Bitcoin Mining System) काम करत आहेत . त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. जॅक डोर्सी यांनी १६ ऑक्टोबर २०२१ रोजी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, 'स्क्वेअर ओपन बिटकॉइन मायनिंग सिस्टमवर काम करत आहे. आम्ही या प्रकल्पाला पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.' जॅक डोर्सी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. (Jack Dorsey's company is working on system for Open bitcoin mining system)

ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर भिस्त

स्क्वेअर ही सध्या पेमेंट व्यवसायात असलेली वित्तीय सेवा कंपनी आहे. या कंपनीला ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये आपला व्यवसाय वाढवायचा आहे. स्क्वेअरचे महाव्यवस्थापक थॉमस टेम्पलटन यांनी ट्विट करून कंपनीच्या योजनेची माहिती दिली आहे. ते म्हणाले की आम्हाला बिटकॉइन मायनिंग अधिक वितरित आणि कार्यक्षम बनवायचे आहे. क्रिप्टोकरन्सीची खरेदी, मायनिंग, देखभाल यासारखी कामे अतिशय सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे उद्याचे भविष्य आहे असा कंपनीचा विश्वास आहे.

डोर्सी हे क्रिप्टोकरन्सीचे समर्थक 

जॅक डोर्सी हे बिटकॉइनच्या दीर्घकाळ समर्थकांपैकी एक आहेत. ते केवळ त्याचा प्रचार करत नाहीत, तर डिजिटल चलनातही त्यांची होल्डिंग आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये, डॉर्सी म्हणाले की तो स्वतः बिटकॉइनचे मायनिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. बिटकॉइन मायनिंग प्रत्येकाला उपलब्ध नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रत्येकजण बिटकॉइनचे मायनिंग करू शकेल अशी यंत्रणा आवश्यक असल्याचे सांगितले.

बिटकॉइन ४२,७०० डॉलरवर

सकाळी १०.२५ वाजता बिटकॉइन ४२,७७१ डॉलरच्या पातळीवर व्यवहार करत होते. गेल्या २४ तासात, तो ४४,४१८ डॉलरच्या स्तरावर पोहोचला होता, तर सर्वात कमी पातळी ४२,३४९ डॉलरची आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या २ ट्रिलियन डॉलरपेक्षा थोडे जास्त आहे. २०२१ मध्ये एक वेळी अशी आली होती की जेव्हा क्रिप्टोकरन्सीची मार्केट कॅप ३ ट्रिलियन डॉलरवर पोचले होते. त्यावेळी बिटकॉइनचा दर ६५ हजार डॉलर्सच्या पुढे होता.

क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency)वेगाने विस्तार होतो आहे आणि त्यातही बिटकॉइनच्या (Bitcoin) नावाची जगभर चर्चा होते आहे. बिटकॉइनच्या किंमतीवर सर्वचजण लक्ष ठेवून आहे. सरलेल्या वर्षात बिटकॉइनने मोठी घसरण नोंदवली मात्र आगामी काळात बिटकॉइनचे मूल्य झपाट्याने वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. अर्थात अनेक घटकांवर बिटकॉइनच्या किंमतीची घोडदौड अवलंबून असणार आहे. बिटकॉइन वर्षभरात १ लाख डॉलरचा टप्पा ओलांडेल असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) धोरणांचा बिटकॉइनवर मोठा परिणाम होत असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी