Japan Inflation | असे काय झाले की ज्यामुळे जपानमधील महागाई पोचली ४० वर्षांच्या विक्रमी पातळीवर

Japan Inflation : १९८१ मध्ये असलेल्या महागाईनंतरची ही सर्वात मोठी महागाई आहे. घाऊक बाजारात वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये खाद्यतेलाचाही समावेश आहे. तेलाच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत ४४.५ टक्के वाढ झाली आहे. तर लाकडाच्या सामानात ५७ टक्के वाढ झाली आहे. कंपन्यांद्वारे त्यांच्या उत्पादित वस्तू आणि सेवांसाठी लावल्या जाणाऱ्या किंमतींचे मोजमाप करणाऱ्या कॉर्पोरेट गुड्स प्राइस इंडेक्समध्ये ऑक्टोबर महिन्यात एक वर्षाआधीच्या तुलनेत ८ टक्के वाढ झाली आहे.

Japan Inflation
जपानमध्ये महागाईचे मोठे संकट 
थोडं पण कामाचं
  • जपानमधील महागाई ऑक्टोबर महिन्यात चार दशकांमधील उच्चांकी पातळीवर
  • जपानमधील महागाईची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट
  • कॉर्पोरेट गुड्स प्राइस इंडेक्समध्ये ऑक्टोबर महिन्यात एक वर्षाआधीच्या तुलनेत ८ टक्के वाढ

Japan Inflation | टोकियो :  जपानमधील महागाई (Inflation in Japan)ऑक्टोबर महिन्यात चार दशकांमधील उच्चांकी पातळीवर पोचली आहे. याआधी चीनमध्येदेखील घाऊक पातळीवर वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. यामुळे पुरवठा साखळीत अडचणी येऊ शकतात. याशिवाय विविध वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे (Price rise in commodity) कंपन्यांच्या नफ्यावरदेखील विपरित परिणाम झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वाढलेल्या किंमतींमुळे आणि येनच्या मूल्यात झालेल्या घसरणीमुळे आयात केलेल्या वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. जपानमधील महागाईची परिस्थिती गंभीर झाल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील (Serious challenge in front of economy) अडचणी वाढल्या आहेत. कोरोना महामारीमुळे (corona pandemic)आधीच असलेल्या मोठ्या संकटानंतर आता महागाईचेदेखील (Inflation crisis)संकट उभे ठाकले आहे. (Japan Inflation: Japan faces four decades highest level inflation) 

सप्टेंबरमध्येदेखील होती जबरदस्त महागाई

कंपन्यांद्वारे त्यांच्या उत्पादित वस्तू आणि सेवांसाठी लावल्या जाणाऱ्या किंमतींचे मोजमाप करणाऱ्या कॉर्पोरेट गुड्स प्राइस इंडेक्समध्ये ऑक्टोबर महिन्यात एक वर्षाआधीच्या तुलनेत ८ टक्के वाढ झाली आहे. गुरूवारी बॅंक ऑफ जपानच्या आकडेवारीमध्ये हे दिसून आले की महागाई ७ टक्क्यांवर आहे. सप्टेंबरमध्येदेखील ६.५ टक्के असलेल्या महागाई ऑक्टोबर महिन्यात आणखीच वाढ झाली आहे. १९८१ मध्ये असलेल्या महागाईनंतरची ही सर्वात मोठी महागाई आहे. घाऊक बाजारात वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये खाद्यतेलाचाही समावेश आहे. तेलाच्या किंमतीत मागील वर्षाच्या तुलनेत ४४.५ टक्के वाढ झाली आहे. तर लाकडाच्या सामानात ५७ टक्के वाढ झाली आहे. येनवर आधारित घाऊक निर्देशांकात ऑक्टोबर महिन्यात ३८ टक्के वाढ झाली आहे.

जपानमधील कंपन्या किंमतीवर नियंत्रणाच्या प्रयत्नात

महागाईमुळे वस्तूंच्या किंमतीत जरी वाढ झाली असली तरी जपानी कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ करणे टाळत आहेत. वाढलेल्या महागाईमुळे आणि किंमतींमुळे लोक खर्च करणे टाळू शकतात. याचा आणखी विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात मुख्य कन्झ्युमर प्राइस फक्त ०.१ टक्क्यांनी वाढल्या होत्या. अर्थात काही जपानी कंपन्यांचे म्हणणे आहे की त्यांना वस्तूंच्या किंमतीत वाढ करावी लागेल. महागाईचा दबाव कंपन्यांवर वाढत असल्याचे हे चिन्ह आहे. यामुळे जपानी कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो. याच कारणामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर देखील परिणाम झाला आहे. जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा यांच्यासमोर त्यामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

महागाई मागची कारणे

जेव्हा एखाद्या माणसाकडे जास्त पैसे असतात तेव्हा तो जास्त वस्तू विकत घेतो. वस्तूंची खरेदी वाढली कि त्या वस्तूंची मागणी देखील वाढते आणि त्या तुलनेत उत्पादनांचा पुरवठा कमी असल्याने त्यांच्या किंमतीत वाढ होते. याच पद्धतीने बाजारात महागाईची सुरूवात होते. अर्थतज्ज्ञांच्या मते बाजारात जास्त रोख रक्कम किंवा पैसा आल्यास महागाईची सुरूवात होते. याला नियंत्रणात ठेवण्यासाठीच जगभरातील शिखर बॅंका प्रयत्न करतात. आरबीआयनेदेखील व्याजदरांवर नियंत्रण ठेवले आहे. बॅंकांच्या व्याजदरात वाढ झाली की यामुळे बाजारातील पैशाचा ओघ आटतो आणि महागाईवर नियंत्रण येते. अर्थात हे एक कारण असते. याशिवाय इतरही अनेक कारणांमुळे महागाईत वाढ होत असते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी