Jeff Bezos on Musk | इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर, जेफ बेझॉस यांना चीनबद्दल आहे मोठी शंका...पाहा काय आहे प्रकरण

Jeff Bezos on Twitter deal : इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्याची चर्चा सर्वत्र असतानाच जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेझॉस यांनी यासंदर्भात चीनच्या कनेक्शन आणि पुढील वाटचालीसंदर्भात शंका व्यक्त केली आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मस्कच्या ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर आता चिनी सरकारला फायदा मिळू शकतो किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Jeff Bezos on Twitter acquisition by Musk
इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर जेफ बेझॉसच्या शंका 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर जेफ बेझॉस केले अनेक ट्विट
  • बेझॉसे टेस्ला आणि चीनच्या जवळच्या संबंधांबद्दल व्यक्त केली शंका
  • आगामी काळात ट्विटर आणि चीनच्या संबंधांवर उपस्थित केले प्रश्न

Jeff Bezos on Twitter acquisition by Musk : न्यूयॉर्क: इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत (Twitter take over by Elon Musk) घेतल्याची चर्चा सर्वत्र असतानाच जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांनी यासंदर्भात चीनच्या कनेक्शन आणि पुढील वाटचालीसंदर्भात शंका व्यक्त केली आहे.अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मस्कच्या ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर आता चिनी सरकारला (China) फायदा मिळू शकतो किंवा नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आज सकाळी बेझॉस यांनी अनेक ट्विट केले आहेत. यात त्यांनी इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या कंपनीची चीनशी असलेल्या जवळच्या संबंधांकडे लक्ष वेधले. चीन हा जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन बाजार आहे. त्याचबरोबर चीन हा तोच देश आहे जिथे टेस्लाने (Tesla)आपला परदेशातील पहिला टेस्ला कारखाना सुरू केला आहे. (Jeff Bezos raises questions about Elon Musk & Chine relations after Twitter acquisition by Musk)

अधिक वाचा : Twitter: अखेर इलॉन मस्क यांचा ट्विटरवर ताबा! ४४ अब्ज डॉलर्समध्ये केली खरेदी

जेफ बेझॉसची मोठी शंका 

बेझोसने न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर माईक फोर्सिथ (New York Times reporter Mike Forsythe) यांना रिट्विट केले. माईक यांनी चीनमधील टेस्लाची प्रचंड बाजारपेठ आणि टेस्लाचे ईव्ही बॅटरीसाठी चिनी कंपन्यांवर असलेले अवलंबित्व याकडे लक्ष वेधले होते.  न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टरने नमूद केले की 2009 पासून चीनने ट्विटरवर घातलेल्या बंदीमुळे याआधी हे स्पष्ट झाले होते की या मायक्रोब्लॉगिंग साइटवर चीनी सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. मात्र आता ट्विटरची मालकी बदलल्यानंतर यात काहीतरी बदल झाला असावा.

आगामी काळात ट्विटर निर्माण होणाऱ्या हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षांवर स्वतःचे मत व्यक्त करताना, बेझोसने फोर्सिथच्या निरीक्षणाला त्यांच्या पोस्टमध्ये प्रतिसाद दिला: "मनोरंजक प्रश्न. चिनी सरकारला शहराच्या चौकावर थोडा फायदा मिळाला का?" असे म्हणण्यामागे बेझॉस यांना म्हणायचे आहे की चीनी सरकारला आता ट्विटर माध्यमांतून जनतेवर अधिक पकड मिळवता येईल का.

अधिक वाचा : SBI Internet Alert | स्टेट बॅंकेने ग्राहकांना दिल्या इंटरनेट सुरक्षेसाठीच्या सूचना, चटकन जाणून घ्या 8 महत्त्वाचे मुद्दे ...नाहीतर होईल नुकसान

मस्कच्या ट्विटला बेझॉसचे उत्तर

ट्विटरच्या विक्री करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर लगेचच मस्कच्या स्वतःच्याच विधानाला प्रतिसाद म्हणून बेझोसने ट्विट केले आहे. मस्कने आदल्या दिवशीच ट्विटरवरून मुक्त अभिव्यक्तीबद्दल बोलताना ट्विट केले होते की "अभिव्यक्ती स्वांतत्र्य हा कार्यरत लोकशाहीचा पाया आहे आणि ट्विटर हे एक प्रकारचा डिजिटल चावडी किंवा चौकच आहे जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली जाते," 

एका महत्त्वाच्या विषयाला सुरूवात करताना, बेझोसने टिप्पण्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या प्रश्नाबद्दल आपली शंका देखील व्यक्त केली. कारण त्यांनी टेस्ला आणि ट्विटर या दोन्हीमध्ये चीनची काय भूमिका असणार यावर टिप्पणी केली. "या प्रश्नावर माझे स्वतःचे उत्तर बहुधा नाही असेच आहे. या संदर्भात अधिक संभाव्य परिणाम म्हणजे चीनमध्ये ट्विटरवर सेन्सॉरशिपऐवजी टेस्लासाठी अधिक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होईल," असे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंताने म्हटले आहे. "परंतु आपण पाहूया. मस्क या प्रकारची गुंतागुंत हाताळण्यात चांगला पटाईट आहे," असे बेझॉस यांनी पुढे म्हटले आहे. मस्कबद्दल अनूकूल मत झटपट देत बेझॉसने म्हटले ज्यांच्याशी त्यांनी ट्विटरवर एक प्रसिद्ध सार्वजनिक चुरस किंवा स्पर्धा केली आहे. मस्क-बेझॉस यांचा ट्विटरवरील वाद हा मस्कच्या एका ट्विटमुळे सर्वांच्याच लक्षात राहणार आहे. ते ट्विट होते बेझॉसला दुसऱ्या क्रमांकाची जाणीव करून देण्याचे. जेफ बेझॉस यांनी जेव्हा अॅमेझॉनच्या जागतिक यशाबद्दल वक्तव्य केले होते, त्याला मस्कने खोचक प्रतिसाद दिला होता.

अधिक वाचा : Fraud Alert | स्टेट बॅंकेचा ग्राहकांना सावधगिरीचा इशारा, या नंबरपासून दूर राहा, पाहा काय आहे कारण....

पराग अग्रवाल आपल्या कर्मचाऱ्यांना काय म्हणाले

ट्विटरचा ताबा घेतल्यामुळे मस्कला पृथ्वीवरील सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक नियंत्रण मिळेल. मस्कने कंपनी विकत घेण्याच्या अनेक धमक्या दिल्या आणि नंतर ट्विटरला अशी ऑफर दिली की ते नाकारू शकले नाहीत. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सीएनबीसीच्या मुलाखतीत कबूल केले की या सर्व घटनाक्रमामुळे ते अक्षरश: एका बाजूला लोटले गेले होते. त्यांना बोलणी करून व्यवहार करण्याशिवाय पर्यायच राहिला नव्हता. ट्विटरच्या संचालक मंडळाने करार पूर्ण केल्यानंतर, पराग अग्रवाल यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की या सोशल मीडिया कंपनीचे भवितव्य आता अनिश्चित आहे आणि त्यांना याची अजिबात कल्पना नाही की ही कंपनी आता कोणत्या दिशेने जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी