Jio Giga Fiber लाँच, किंमत आणि प्लॅन्स जाहीर,  LED टीव्ही आणि सेट टॉप मिळणार फुकट! 

काम-धंदा
Updated Aug 12, 2019 | 14:11 IST

Jio Giga Fiber: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज जिओ गीगा फायबर सेवा लाँच केली आहे. यावेळी त्यांनी यूजर्ससाठी बऱ्याच घोषणा केल्या आहेत. 

jio
Jio Giga Fiber लाँच, LED टीव्ही आणि सेट टॉप मिळणार फुकट!  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • पाच सप्टेंबरपासून सुरु होणार जिओ गीगा फायबरची सेवा
 • जिओ गीगा फायबरचा सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत ७०० रुपये
 • प्लॅननुसार जिओची गीगा फायबर १०० ते १००० mbps स्पीड मिळणार

मुंबई: मोबाइल जगतात क्रांती केल्यानंतर आता जिओने फायबर सेवा सुरु करण्याची सुरुवात केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी यूजर्ससाठी अनेक गोष्टींची घोषणा केली. मुकेश अंबानी यांनी मीटिंगदरम्यान, जिओ फायबरबाबत घोषणा करताना असं म्हटलं की, याची सुरवात ही ५ सप्टेंबरपासून केली जाणार आहे. याची बेसिक किंमत ही ७०० रुपये असेल. या पॅकेजमध्ये यूजर्सला १०० mbps स्पीड मिळणार आहे. याशिवाय जिओ फॉर एव्हर प्लॅनसह ग्राहकांना मोफत एलईडी टीव्ही आणि ४ के सेट टॉप बॉक्स देण्याचीही घोषणा केली आहे. 

जिओ फायबर सेवा सुरु करण्याची घोषणा ही मागील वर्षीच करण्यात आली होती. पण कंपनीने याचा डेटा प्लॅन आणि रियल टाइम स्पीड याच्याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. रिलायन्स जिओने आतापर्यंत तब्बल ३४ कोटी यूजर्सचा आकडा पार केला आहे. एवढ्या कमी वेळात मिळालेल्या यशामुळे रिलायन्सला जगभरात एक नवी ओळख मिळाली आहे.  

जिओ फायबर डेटा प्लॅन

 1. जिओ फायबरचा सगळ्या स्वस्त प्लॅन हा ७०० रुपये प्रति महिना आहे. याचा स्पीड १०० mbps असणार आहे. 
 2. या प्लॅनमधील सगळ्यात महागडा प्लॅन हा १० हजार रुपये प्रति महिना असा असणार आहे. 
 3. जिओ फायबर पॅकेजसोबत लँडलाइन सेवा देखील पुरवणार आहे. 
 4. या पॅकेजमध्ये व्हॉईस कॉलिंग अगदी फ्री असणार आहे. याशिवाय जिओ फायबर वेलकम ऑफरमध्ये ४डी आणि ४के टेलिव्हिजन सेट आणि ४के सेटअप बॉक्स फ्री मिळणार आहे. 

पाहा मुकेश अंबानी नेमकं काय म्हणाले

अंबानी यांनी शेअरधारकांना अधिक नफा आणि बोनस देण्याचंही आश्वासन दिलं आहे. मुकेश अंबानी यांनी पुढील १८ महिने म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत कर्जमुक्त कंपनी बनण्याच्या रोडमॅप बाबतही माहिती दिली. ते यावेळी म्हणाले की, 'मागील वर्षी रिलायन्स रिटेलने प्रत्येक चार सेकंदाला एक टीव्ही आणि प्रत्येक दोन सेंकदाला एकाच फोनची विक्री केली आहे. आज रिलायन्स रिटेल जगातील १०० टॉप रिटेलर्समध्ये जागा पटकावणारी एकमेव भारतीय रिटेलिंग कंपनी आहे. तसंच पुढील ५ वर्षात आमचं लक्ष्य असेल की, जगातील टॉप २० रिटेलर्समध्ये जागा पटकावणं.' 

'छोट्या दुकानदारांसाठी रिलायन्स जिओ मर्चेंट पॉईंट ऑफ सेल (पीओएस) सोल्यूशन आणणार आहे. जे यूजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म असणार आहे. यामुळे छोटे किराणा दुकानदार देखील मॉर्डन बनतील. देशात जवळजवळ ३ कोटी किराणा दुकानदार आणि मर्चंट आहेत. याला 'न्यू कॉमर्स' असं नाव देण्यात आलं आहे.' असंही अंबानी म्हणाले. जियोच्या ग्राहकांना सध्याच्या मोबाइल क्रमांकावर गीगा फायबर कनेक्शन मिळणार आहे. 

रिलायन्स एजीएमवर झटपट नजर

 1. ज्या दिवशी सिनेमा रिलीज होणार, प्रीमियम ग्राहक हे त्याच दिवशी टीव्हीवर सिनेमा पाहू शकतात. 
 2. ब्रॉडबँडची किंमत ही ७०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत असणार आहे. 
 3. ब्रॉडबँडच्या बेसिक प्लॅनमध्ये १०० mbps स्पीड असेल. 
 4. जिओ फायबरचं कमर्शियल लाँच ५ सप्टेंबरला होणार. 
 5. जिओ होलोबोर्ड नावाने व्हीआर हेडसेट लाँच, लवकरच सुरु होणार विक्री. 
 6. सेट टॉप बॉक्समध्ये मिळणार वर्च्युअल रियलिटीचा सपोर्ट, टीव्हीवरच करता येणार शॉपिंग 
 7. गेमिंगसाठी मायक्रोसॉफ्ट आणि टेन्सेट सोबत जिओचा करार
 8. स्मार्ट टीव्हीवर मिळणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Jio Giga Fiber लाँच, किंमत आणि प्लॅन्स जाहीर,  LED टीव्ही आणि सेट टॉप मिळणार फुकट!  Description: Jio Giga Fiber: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज जिओ गीगा फायबर सेवा लाँच केली आहे. यावेळी त्यांनी यूजर्ससाठी बऱ्याच घोषणा केल्या आहेत. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...