Jio Top Up: जिओचे फ्री कॉलिंग बंद, आता ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉलसाठी द्यावे लागणार पैसे

Jio Recharge Plan: आतापर्यंत फ्री कॉलिंगची सुविधा देणाऱ्या जिएने युजर्सला झटका दिला आहे. आता कॉलिंगला चार्ज लागणार आहे. यामुळे दुसऱ्या नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कॉलसाठी पैसे द्यावे लागणार आहेत. 

jio to charge users 6 paise per minute on calling other networks business news in marathi google batmya
जिओचा झटका, आता फ्री कॉलिंग बंद 

थोडं पण कामाचं

  • जिओने कॉलिंगवर लावला चार्ज दुसऱ्या नेटवर्कवर कॉलसाठी लागणार आता पैसे 
  • जिओने आयपीयू टॉप अप प्लान जारी करण्यात आला
  • नव्या प्लाननुसार जिओपेक्षा इतर नेटवर्कवर कॉल केल्यास पैसे द्यावे लागणार आहे. 

नवी दिल्ली :  रिलायन्स जिओने एक मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जिओच्या ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहे. आतापर्यंत जिओने सर्व ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्याची सेवा मोफत दिली होती., पण आययूसी व्यवस्थावर ट्रायच्या रिव्ह्यू निर्णयानंतर जिओने ६ पैसे प्रति मिनिट चार्ज लावण्याचा निर्णय घेतला आहे. जिओने या संदर्भात सांगितले की, जिओ नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग फ्री आहे. त्यामुळे कंपनीला भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडीया सारख्या स्पर्धक कंपन्यांना १३५०० कोटी रुपये द्यावे लागत होते. 

कंपनीने सांगितले की, ट्रायच्या या निर्णयामुळे जिओचे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी कंपनी प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या नेटवर्क्सवर कॉल करणाऱ्या ग्राहकांना चार्ज लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पहिल्यांदा आहे की, जिओचे ग्राहक आता फ्री कॉलिंग ऐवजी दुसऱ्या नेटवर्कसाठी पैसे देणार आहेत. सध्या कंपनी केवळ डेटासाठी चार्ज करते, कॉलिंग पूर्णपणे फ्री आहे. 

जिओने आरोप लावला की इतर ऑपरेटर्सकडून जिओच्या क्रमांकावर मोठ्या प्रमाणात मिस्ड कॉल येतात. त्यामुळे जिओच्या नेटवर्कवर दररोज २५ ते ३० कोटी मिस्ड कॉल येता. त्यामुळे इनकमिंग ट्रॅफिकचे ६५ ते ७५ कोटी मिनीट प्रभावीत होतात, जे जिओ नेटवर्कवरून इतर ऑपरेटरसाठी केले जातात. 

किती द्यावे लागणार पैसे... 

जिओतून इतर नेटवर्कसाठी आता ६ पैसे प्रति मिनिट चार्ज लागणार आहे. तर जिओवरून जिओच्या नंबरवर करण्यात आलेली व्हॉइस कॉलिंग आजही फ्री असणार आहे. तसेच इनकमिंग कॉलिंगही फ्री असणार आहे. तसेच लँडलाइनवरही फ्री कॉलिंग आहे. 

किती रुपयांचा येणार टॉप अप 

जिओने ग्राहकांवर येणारा अतिरिक्त बोझा बदलण्यासाठी डेटा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आययूसी टॉप अप व्हाउचरच्या बदल्यात ग्राहकांना फ्री डेटा मिळणार आहे. कंपनी चार टॉप अप प्लानची घोषणा केली आहे. यात १० रुपये टॉप अपवर १२४ मिनिट इतर नेटवर्कवर आणि १ जीबी डेटा, २० रुपयांच्या टॉप अपवर २४९ मिनिट आणि २ जीबी डेटा, ५० रुपये टॉप अपवर ६५६ मिनिट आणि ५ जीबी डेटा आणि १०० रुपये टॉप अपवर १३६२ मिनिट आणि १० जीबी डेटा मिळणार आहे. याचा उपयोग इतर नेटवर्कवर करण्यात येऊ शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...