फक्त झोपून कमवा १० लाख रुपये, 'या' कंपनीची अनोखी संधी, रोज ९ तास गाढ झोपणे हेच काम

फक्त झोपण्याचे तुम्हाला १० लाख रुपयांपर्यत मिळू शकतात. असा काही जॉब किंवा संधी असेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र 'वेकफिट' (Wakefit) ही बंगळूरूस्थित कंपनी असाच एक अनोखी संधी घेऊ आली आहे.

Sleep Internship Programme
स्लीप इंटर्नशिप कार्यक्रम  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्लीप इंटर्नशिपचा कार्यक्रम
  • लोकांना फक्त झोपण्याचे पैसे दिले जाणार
  • १० लाख रुपयांचे ग्रॅंड प्राईझ

बंगळूरू : खूप पैसा कमावणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मात्र जर तुम्हाला कोणतीही मेहनत न करता पैसे कमावता (Money making) येणार असतील तर. असाच एक जॉब आहे, ज्यात तुम्हाला कोणतेही काम करावे नाही कि मेहनत करायची नाही. फक्त झोपण्याचे तुम्हाला १० लाख रुपयांपर्यत (Earn Rs 10 lakh for just sleeping) मिळू शकतात. असा काही जॉब किंवा संधी असेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र 'वेकफिट' (Wakefit) ही बंगळूरूस्थित स्लीप अॅंड हाऊस सोल्युशन कंपनी असाच एक अनोखी संधी घेऊन आली आहे. यामध्ये लोकांना फक्त झोपण्याचे पैसे दिले जाणार आहेत. हा एक स्लीप इंटर्नशिपचा कार्यक्रम (Sleep Internship Programme) आहे. यामध्ये निवड झालेल्या स्लीप इंटर्न्सना लाखो रुपये कमावण्याची संधी मिळू शकते. (Get up to Rs 10 Lakh for just sleeping, Bengaluru based company hava unique sleep internship Programme)

झोपण्यासाठी १० लाख रुपये

मागील सिझनमध्ये यश मिळाल्यानंतर वेकफिट कंपनी यावर्षी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन सुरू करणार आहे. हा कार्यक्रम यावेळेस पहिल्या पेक्षाही जास्त वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. कारण यावेळेस याचे स्वरुप अधिक मोठे आणि चांगले असणार आहे. शिवाय इंटर्न्सची एकमेकांशी स्पर्धादेखील असणार आहे. इथे झोपणे हे एक कामच आहे, त्याचा मोबादला म्हणून तुम्हाला १० लाख रुपयांपर्यत मिळतील.

६० हजार लोकांनी केला अर्ज

ही स्पर्धा जिंकणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. तर इंटर्न म्हणून निवड झाल्यावर १ लाख रुपये मिळणार आहेत. १० लाख रुपये हे ग्रॅंड प्राईझ आहे आणि जिंकणाऱ्याला इंडियाज स्पीप चॅम्पियनचा किताब मिळेल. या स्लीप इंटर्नशिप कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनसाठी जवळपास ६०,००० उमेदवारांनी आतापर्यत अर्ज केला आहे.

९ तासांची झोप आवश्यक

स्लीप इंटर्नशिपच्या दुसऱ्या सीझनमध्ये अवघड निवड प्रक्रिया पार करणाऱ्या उमेदवारांना लागोपाठ १०० रात्रीपर्यत ९ तासांची गाढ झोप घ्यावी लागणार आहे. म्हणजेच रोज रात्री ९ तास गाढ झापले पाहिजे. हेच त्या उमेदवाराचे काम असेल. झोपण्यासाठी इंटर्न्सना वेकफिटची गादी आणि एक चांगला स्लीप ट्रॅकर दिला जाईल. झोपण्यासाठी कंपनी इंटर्नना तज्ज्ञ, फिटनेस तज्ज्ञ, हाऊस डेकोरेशन तज्ज्ञ इत्यादी काउंसलिंगची सुविधादेखील देणार आहे.

झोपेचे महत्त्व लक्षात आणून देण्याचा हेतू

वेकफिटनुसार २०२० हे एक अत्यंत अवघड वर्ष होते. कोरोना महामारीमुळे तणाव वाढला आहे, त्याचबरोबर वर्क फ्रॉम होममुळे लोकांना उशीरा झोपण्याची सवय लागली आहे. त्यामुळे झोपेमध्ये अडथळे येत आहेत. झोपेचे पॅटर्न बदलले आहेत आणि कमी झोप घेण्याची समस्या दिसून येते आहे. विशेषरित्या २५ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांमध्ये ही समस्या जास्त आहे. या स्लीप इंटर्नशिप कार्यक्रमाद्वारे लोकांना चांगल्या झोपेचे महत्त्व समजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी