Job Search | नोकरी शोधताय...नो टेन्शन, 'हे' टॉप ५ हायरिंग अॅप्स आहेत दिमतीला

Hiring Apps: अशा काही हायरिंग अॅप्सची (Hiring Apps) माहिती घेऊया, ज्यांचा वापर करून तुम्ही सहजपणे नोकरी शोधणे, बदलणे किंवा तुम्हाला हवा असलेला माणूस नोकरीवर ठेवणे या गोष्टी करू शकता. हे अॅप्स यासंदर्भात खूपच उपयुक्त आहेत.

Top 5 hiring Apps
टॉप ५ हायरिंग अॅप्स 
थोडं पण कामाचं
  • जॉब शोधणे (Job search) हे फारच किचकट आणि कंटाळवाणे काम
  • जिटल युगात (Digital Platform) नोकरी शोधणे झाले सोपे
  • पाहूया टॉप ५ हायरिंग अॅप्स

Job Search | नवी दिल्ली: नोकरी शोधणे किंवा नोकरी बदलण्यासाठी दुसरा जॉब शोधणे (Job search) हे फारच किचकट आणि कंटाळवाणे काम असते. तुम्ही नोकरी शोधणारे (Job seekers) असा किंवा एखाद्या कंपनीत तुम्हाला मनुष्यबळ घ्यायचे असेल तरी ही प्रक्रिया नेहमीच अतिशय कठीण असते. यासाठी वेळ, ऊर्जा खर्ची घालावी लागते. मात्र आता डिजिटल युगात (Digital Platform)अनेक कामे हातातल्या मोबाइलवर सहजपणे होत असतात. आपण अशा काही हायरिंग अॅप्सची (Hiring Apps) माहिती घेऊया, ज्यांचा वापर करून तुम्ही सहजपणे नोकरी शोधणे, बदलणे किंवा तुम्हाला हवा असलेला माणूस नोकरीवर ठेवणे या गोष्टी करू शकता. हे अॅप्स यासंदर्भात खूपच उपयुक्त आहेत. अॅंड्राइड आणि आयओएस सिस्टमवर हे अॅप्स उपलब्ध आहेत. पाहूया टॉप ५ डिजिटल हायरिंग अॅप्स. (Job Search: Top 5 hiring Apps for job search, see the details)

१. Hirect

हायरेक्ट हे सर्वात चांगला डिजिटल हायरिंग अॅप आहे. हे एक चॅटवर आधारित डायरेक्ट हायरिंग अॅप आहे. हे स्टार्टअप जॉब्सना लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले आहे. आतापर्यत या अॅपने व्हेरिफाइड स्टार्ट अपमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या दहा लाखांपेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांना जोडले आहे. 

२. Workable

Workable हे अॅप अॅंड्राइडवर उपलब्ध आहे. हे एक लोकप्रिय हायरिंग अॅप आहे. जॉब किंवा नोकरी देणाऱ्यांसाठी हे एक दमदार साधन आहे. या अॅपद्वारे नोकरी देणारे, कंपन्या चांगल्या उमेदवारांची लगेच संशोधन, निवड, नियुक्ती करू शकतात. हे एक सुरक्षित, स्मार्ट हायरिंग अॅप आहे. या अॅपमध्ये पर्सनल प्रोफाइल, स्कोअरवर्ड, मूल्यांकन, रिपोर्ट, विश्लेषण इत्यादी सुविधा आहेत. यात तुम्ही तुमची मुलाखत देखील शेड्युल करू शकता.

३. LinkedIn Recruiter

LinkedIn Recruiter हे अॅप सर्व प्रकारच्या प्रोफेशनल्ससाठी एक लोकप्रिय अॅप आहे. लिंक्डइनचे आज ४० कोटी युजर्स आहेत. बहुतांश कंपन्या किंवा नोकरी देणाऱ्यांची हे अॅप ही पहिली पसंद आहे. एक खास रिक्रुटमेंटसाठी बनवण्यात आलेले अॅप आहे. कंपन्यांची गरज लक्षात घेऊन याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. इथून विविध क्षेत्रातील प्रोफेशनल्सची हायरिंग केली जाते. आयओएस आणि अॅंड्राइड दोन्हीही प्लॅटफॉर्मवर हे उपलब्ध आहे. या अॅपद्वारे कंपन्या सहजपणे प्रत्यक्ष उमेदवारांशी जोडले जाऊ शकतात. जर एखादा उमेदवार त्यांना योग्य वाटला तर ते प्रत्यक्ष मेसेज किंवा कॉल करू शकतात. शिवाय या इतरही चांगल्या सुविधा आहेत.

४. Naukri recruiter

Naukri recruiter हे अॅप प्रचलित आहे. नोकरी देणाऱ्यांसाठी किंवा कंपन्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. नोकरी डेस्कटॉपच्या रिक्रुटर प्लॅटफॉर्वर हे काम करू शकते. याद्वारे चांगले उमेदवार शोधणे सोपे जाते. या एक युनिक कॉलर आयडी फीचर देखील मिळते. यामुळे व्यक्तीचा कॉल पिक होण्याची शक्यता वाढते. उमेदवारांचे रेटिंग, रिव्हयू याद्वारे करता येते.

५. Monster

Monster हे आणखी एक लोकप्रिय अॅप. अनेक मोठ्या कंपन्या आपल्यासाठी चांगले कर्मचारी शोधण्यासाठी या अॅपचा वापर करतात. नोकरीसाठीची पोस्टदेखील यात तयार करता येते. उमेदवारांची चाळणी करता येते. याशिवाय उमेदवारांचा बायोडाटा लगेच पाहता येतो. कंपन्या उमेदवारांशी लगेच संपर्क करू शकतात. यामुळे ईमेल्सच्या भानगडीपासून तुम्ही वाचू शकता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी