Mumbai Local News जून २०२४ पर्यंत तयार होऊ शकतं जोगेश्वरी टर्मिनस

काम-धंदा
Updated Mar 18, 2023 | 17:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mumbai Local News मुंबई उपनगर रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाढती गर्दी पाहता, अतिरिक्त टर्मिनस बनवण्याचा विचार करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. तसेच वांद्रे आणि बोरिवली येथे ही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे स्थानक आहेत.  यादरम्यान, जोगेश्वरी टर्मिनस देखील जून २०२४ पर्यंत खुले होणार असल्याची बातमी समोर आली आहे.  

मुंबई उपनगर रेल्वे प्रवाशांसाठी घेण्यात आला मोठा निर्णय
उपनगरातील वाढती गर्दी पाहता उभारले जाणार जोगेश्वरी टर्मिनस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रेल्वे अधिकाऱ्याचे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आहे लक्ष्य
  • ६९ कोटी रुपये इतका निधी या उपक्रमासाठी निर्धारित करण्यात आला आहे
  • मुंबई उपनगरात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता जोगेश्वरी टर्मिनसच्या प्रस्तावाला मंजूरी

Mumbai Local News मुंबई : CSMT, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस वर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई उपनगरात आणखीन एक टर्मिनस उभारणे काळाची गरज असल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे जोगेश्वरीमध्ये टर्मिनस ऊभारण्याचा २०१९ मधील आणि त्यानंतर २०२१ च्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजूरी मिळाली आहे. 

हे पण वाचा : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णींचे निधन

त्यानुसार, 69 कोटी रुपये इतका निधी या उपक्रमासाठी निर्धारित केला असून, दोन्ही बाजूने एकूण २४ ट्रेन कारसाठी हे टर्मिनस सक्षम केले जाणार आहे.

हे पण वाचा : Mumbai Traffic : मुंबईतले हे जुने पूल तोडणार

या स्थानकांवर होत आहेत अतिरिक्त कामे -
अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बेलापूर, बोरिवली, भायखळा, चर्नी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचपोकळी,दादर,दिवा, ग्रँट रोड, जोगेश्वरी, कल्याण, कांजूर मार्ग, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोअर परळ, मालाड, मरीन लाइन्स, माटुंगा, मुंबई सेंट्रल, मुंब्रा, परेल, प्रभादेवी, स‌ॅंडहर्स्ट रोड, शहाड, ठाकुर्ली, ठाणे, टिटवाळा, वडाळा रोड, विद्याविहार आणि विक्रोळी यांसारख्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी आणि इतर अन्य सुविधांची देखील सुरुवात केली जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी