Electric Vehicle | नव्या वर्षाची जबरदस्त भेट, ही भारतीय कंपनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यावर कर्मचाऱ्यांना देणार ३ लाख रुपये

JSW Group EV policy: महागाई, दर महिन्याचा खर्च, वाहनांच्या किंमती, इंधनाचे वाढते दर यामुळे कार विकत घेण्यास सर्वसामान्यांना नेहमीच अडचणी असतात. अशावेळी एका भारतीय कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कार विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक बंपर गिफ्ट (New Year gift) दिले आहे. नव्या वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक कार किंवा वाहन (Electric vehicle) विकत घेण्यासाठी या भारतीय कंपनीने ३ लाख रुपयांचा इन्सेंटिव्ह (incentive to buy electric vehicle) म्हणजे खास भत्ता देण्याचे ठरवले आहे.

JSW group employees to get incentive to buy electric vehicle
जेएसडब्ल्यू समूहाच्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी मिळणार खास भत्ता 
थोडं पण कामाचं
  • इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यावर या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार ३ लाखांचा खास भत्ता
  • जेएसडब्ल्यू समूहाची खास ईव्ही पॉलिसी
  • कार्बन उत्सर्जन कमी करून ग्रीन मोबिलिटी वाढवण्यासाठी सुरू केली खास पॉलिसी

JSW Group | नवी दिल्ली : नवीन वर्षात अनेक वस्तू घेण्याचे प्लॅनिंग प्रत्येकानेच केलेले असते. त्यातच कार (Car)हे तर प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र महागाई, दर महिन्याचा खर्च, वाहनांच्या किंमती, इंधनाचे वाढते दर यामुळे कार विकत घेण्यास सर्वसामान्यांना नेहमीच अडचणी असतात. अशावेळी एका भारतीय कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कार विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक बंपर गिफ्ट (New Year gift) दिले आहे. नव्या वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक कार किंवा वाहन (Electric vehicle) विकत घेण्यासाठी या भारतीय कंपनीने ३ लाख रुपयांचा इन्सेंटिव्ह (incentive to buy electric vehicle) म्हणजे खास भत्ता देण्याचे ठरवले आहे. ही कंपनी आहे देशातील आघाडीच्या उद्योगसमूहापैकी एक असलेला जेएसडब्ल्यू समूह (JSW Group). येत्या १ जानेवारीपासून कंपनीने ही नवी पॉलिसी लागू केली आहे. (JSW group to give incentive of Rs 3 lakhs to employees to buy electric vehicle)

जेएसडब्ल्यू समूहाचे धोरण

जेएसडब्ल्यू समूहाने लागू केलेली ही पॉलिसी संपूर्ण भारतातील समूहाच्या सर्व कंपन्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. याचा अर्थ या समूहात काम करणारे सर्व कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सोमवारी कंपनीने ही घोषणा करताना म्हटले की भारताच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आणि पर्यावरणासंदर्भातील धोरणानुरुप मुंबईतस्थित या अब्जावधी डॉलरच्या समूहाने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन जेएसडब्ल्यू इलेक्ट्रिक व्हेहिकल धोरण सुरू केले आहे.

फ्री चार्जिंगची सुविधादेखील मिळणार

जेएसडब्ल्यू समूहाच्या इलेक्ट्रिक व्हेहिकल धोरणानुसार सर्व समूहाचे सर्व कर्मचारी दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी करू शकतात. इतकेच नाही तर समूहाती सर्व कर्मचाऱ्यांसाठी कार्यालये आणि उत्पादन प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोफत चार्जिंग स्टेशन आणि पार्किंग स्लॉट उपलब्ध करून दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि स्वीकृती वाढावी तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राबवण्यात येते आहे.

भारताच्या ग्रीन मोबिलिटीमध्ये योगदान

जेएसडब्ल्यू समूहाचे चेअरमन सज्जन जिंदल यांनी म्हटले की जेएसडब्ल्यू समूहाची नवी ईलेक्ट्रिक व्हेहिकल पॉलिसी ही युनिक आहे. यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहने विकत घेणाऱ्यांची संख्या वाढेल. भारताला ग्रीन मोबिलिटी देण्यास हे उपयुक्त ठरेल. या धोरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्यावर काम करत राहू. २०७० पर्यत भारताला शून्य कार्बन उत्सर्जनापर्यत पोचवण्यासाठी कॉर्पोरेट आणि सरकारी क्षेत्राकडून योगदान देण्याचा प्रयत्न करायचा आहे.

जेएसडब्ल्यू समूह स्टील, एनर्जी, पायाभूत सुविधा, सीमेंट, पेंट्स, स्पोर्ट्स, वेंचर कॅपिटल इत्यादी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीने स्वत:साठीदेखील कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट निश्चित ेकले आहे २०३०पर्यत कार्बन उत्सर्जनात ४२ टक्के कपात करण्याचे उद्दिष्ट समूहाने ठेवले आहे. 

जगाबरोबरच भारतातदेखील इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात असून त्यासाठी वेगवेगळी धोरणे राबविण्यात येत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी