Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे मग लक्षात ठेवा हू सूत्रे...

Bitcoin : क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकदारांसाठी सरलेले वर्ष यादगार ठरले आहे. अनेक डिजिटल करन्सींनी (Digital currency) यावर्षी ७००० टक्क्यांपर्यत परतावा दिला आहे. अर्थात नियमनाच्या पातळीवर सरकार क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्यासाठी बिल आणण्याच्या तयारीत आहे. आगामी अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीसंदर्भात काही मार्गदर्शक सूत्रे (Guidelines for cryptocurrency) जाहीर केली जाऊ शकतात. गुंतवणुकदारांसाठी मात्र २०२१ हे वर्ष फारच लाभदायी ठरले.

Cryptocurrency Investment & Tips
क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीत वाढ
  • तरुण मोठ्या प्रमाणात बिटकॉइनकडे आकर्षित
  • क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करतानाची सूत्रे

Cryptocurrency Tips | नवी दिल्ली : दिवसेंदिवस क्रिप्टोकरन्सी  लोकप्रिय होत चालली आहे. तरुणांचा याकडे मोठा ओढा आहे. २०२१ मध्ये क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकीत चांगलीच वाढ झाली आहे. शेअर बाजाराएवढेच आकर्षण क्रिप्टोकरन्सीचे आहे. क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणुकदारांसाठी सरलेले वर्ष यादगार ठरले आहे. अनेक डिजिटल करन्सींनी (Digital currency) यावर्षी ७००० टक्क्यांपर्यत परतावा दिला आहे. अर्थात नियमनाच्या पातळीवर सरकार क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणण्यासाठी बिल आणण्याच्या तयारीत आहे. आगामी अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सीसंदर्भात काही मार्गदर्शक सूत्रे (Guidelines for cryptocurrency) जाहीर केली जाऊ शकतात. गुंतवणुकदारांसाठी मात्र २०२१ हे वर्ष फारच लाभदायी ठरले. आता २०२२ मध्ये क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठ कशी असणार, गुंतवणुकदारांना पुढील वर्ष कसे जाणार आणि त्यांनी नेमक्या कोणत्या बाबी (cryptocurrency investment)लक्षात ठेवल्या पाहिजेत ते पाहूया. (Key factors to be considered for cryptocurrency investment)

क्रिप्टकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या गोष्टी-

१. क्रिप्टोकरन्सीचा पोर्टफोलिओ छोटा ठेवा
क्रिप्टोकरन्सीत प्रचंड चढउतार होतात. त्यामुळे सतर्क राहत क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ छोटाच ठेवावा. यामध्ये मोजकीच गुंतवणूक करावी जी गमावल्यावर तुम्ही अडचणीत येणार नाही. तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या १० ते १५ टक्क्यांपेक्षा ही रक्कम जास्त असता कामा नये.

२. कोसळल्यावर ८० ते ९० टक्के घटते क्रिप्टोकरन्सी
क्रिप्टोकरन्सीतील क्रॅश किंवा घसरण ही अनेकवेळा ७० ते ९० टक्क्यांपर्यत देखील असते. मात्र नंतर त्यात पुन्हा तेजी येत मजबूती येते. त्यामुळे यातील घसरणीमुळे घाबरू नका.

३. विश्वासार्ह अॅपद्वारेच गुंतवणूक करा
क्रिप्टोकरन्सी ही काही नियमन केलेला गुंतवणूक प्रकार नाही. त्यामुळे यात गुंतवणूक करताना तुम्ही ज्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे यात गुंतवणूक करत आहात तो विश्वासार्ह आहे कीनी याची खातरजमा करून घ्या. शिवाय ऑनलाइन गुंतवणूक असल्यामुळे सायबर फ्रॉडचीदेखील भीती असते. त्यामुळे याबाबतीत सतर्क राहा.

४. कोणत्यातरी टिप वर गुंतवणूक करू नका
क्रिप्टोकरन्सीबद्दल इकडून तिकडून बरेच कानावर येत असते. वेगवेगळ्या माध्यमातून टिप दिल्या जातात. मात्र अशा टिपवर डोळे झाकून विश्वास ठेवत गुंतवणूक कराल तर पश्चाताप करावा लागेल.

५. चांगल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये करा गुंतवणूक
क्रिप्टोकरन्सी हा एक गुंतवणूक प्रकार आहे. यात हजारो प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी बाजारात उपलब्ध आहेत. मात्र आघाडीच्या आणि चांगल्या क्रिप्टोकरन्सीमध्येच गुंतवणूक करा. त्या महाग नक्कीच आहेत मात्र त्यांचीच विश्वासार्हता अधिक आहे. उदाहरणार्थ बिटकाइन आणि इथेरियम यांना क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेत ब्लूचिप म्हटले जाते. कारण त्या सर्वात विश्वासपात्र आहेत. क्रिप्टोकरन्सीत तुम्ही फक्त १०० रुपयांनीदेखील गुंतवणूक करू शकता. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी महाग असली तरी फरक पडत नाही.

क्रिप्टोकरन्सीमध्ये खूपच चढउतार असतात. यात वेगाने वाढ होते आणि त्यापेक्षा जास्त वेगाने घसरण होते. यावर्षी बिटकॉइन ६५,००० डॉलरच्या पलीकडे पोचले होते. मात्र घसरण झाल्यावर तो ३०,००० डॉलरच्या खाली आला होता. सध्या बिटकॉइन (Bitcoin) ५१,००० डॉलरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. २०२२ मध्ये क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल करन्सीच्या गुंतवणुकदारांचे काय होणार हे बरेचसे केंद्र सरकारच्या धोरणावर अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्यात चीनने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रान्झॅक्शनवर पूर्ण बंदी आणली होती. अर्थात जाणकारांच्या मते ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain technology) जगभर मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते आहे. भारतात सरकारने क्रिप्टोकरन्सीवर बिल आणण्याची तयारी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी