हेल्थ इन्श्युरन्स : आरोग्य विमा पॉलिसी घेताना क्लेम सेटलमेंट रेशो आणि हॉस्पिटलच्या नेटवर्कसह 'या' ८ बाबी घ्या

काम-धंदा
Updated Apr 18, 2021 | 16:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे तुमचे आर्थिक गणित कोलमडून पडेल आणि तुम्ही आर्थिक अस्थैर्याला सामोरे जाल. अशा परिस्थितीच्या विळख्यात अडकायचे नसेल तर लवकरात लवकर हेल्थ इन्श्युरन्स म्हणजेच आरोग्यविमा पॉलिसी घ्या.

Key factors you should consider before buying Health Insurance
आरोग्य विमा घेताना महत्त्वाचे असणारे मुद्दे 

थोडं पण कामाचं

  • आरोग्य विमा घेतानाचे महत्त्वाचे मुद्दे
  • क्लेम सेटलमेंट रेशो
  • हॉस्पिटलचे नेटवर्क, वेटिंग पिरियड

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशात उग्र रुप धारण केले आहे. कोरोनाचा संसर्ग देशभर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कोविड-१९ने बाधित झाल्यावर त्याच्या इलाजाखातर तुमची अनेक वर्षांची बचत कामी येऊ शकते. या अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे तुमचे आर्थिक गणित कोलमडून पडेल आणि तुम्ही आर्थिक अस्थैर्याला सामोरे जाल. अशा परिस्थितीच्या विळख्यात अडकायचे नसेल तर लवकरात लवकर हेल्थ इन्श्युरन्स म्हणजेच आरोग्यविमा पॉलिसी घ्या. आरोग्य विम्यामुळे फक्त तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या उपचारांसाठी योग्य वेळी पैसाच उपलब्ध होणार नाही तर तुमची बचतदेखील सुरक्षित राहील. मात्र आरोग्य विमा घेताना काही मुद्द्यांचे भान राखणे आवश्यक असते. अशाच ८ मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.

१. पॉलिसीमध्ये कोणकोणत्या खर्चाचा समावेश आहे हे समजून घ्या


विमा कंपन्या अनेक प्रकारच्या पॉलिसी बाजारात विकत आहेत. प्रत्येक विमा कंपनीचे काही नियम असतात. अर्थात सर्व विमा कंपन्या या आयआरडीएआयच्या मार्गदर्शक तत्त्वांखाली आणि नियमांखालीच काम करत असतात. आरोग्य विमा पॉलिसी घेताना सर्वात आधी लक्षात घ्या की त्यात कोणकोणत्या बाबी कव्हर होणार आहेत. ज्या पॉलिसीमध्ये चाचण्यांचा खर्च आणि अॅम्ब्युलन्सचा खर्च अशा जास्त बाबी कव्हर केल्या जात असतील अशी पॉलिसी घ्यावी. म्हणजे वैद्यकीय खर्चासाठी तुमच्या खिशातून पैसे खर्च करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.

२. क्लेम सेटलमेंट रेशो लक्षात घ्या


जेव्हा तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी घेता तेव्हा ज्या कंपनीची ती पॉलिसी आहे त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे हे नक्की पाहा. सेटलमेंट रेशो जास्त असणे फार महत्त्वाचे असते. जास्त क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे विमा कंपनीने जास्त क्लेमचे पैसे ग्राहकांना दिले आहेत किंवा जास्त क्लेम मंजूर केले आहेत. यामुळे हे कळते की कंपनीचे अंडर रायटिंग नियम जास्त कडक नाहीत. आयुर्विमा कंपन्या आपल्या वार्षिक अहवालात क्लेम सेटलमेंट रेशोचे आकडे देतात. कंपनीचा मागील तीन ते ५ वर्षांचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासला पाहिजे.

३. आधीच्या आजारांना कव्हर आहे की नाही हे पाहणे


सर्वच आरोग्य विमा प्लॅन आधीपासून असलेल्या आजारांना पॉलिसीत कव्हर करतात. मात्र यासाठी ४८ महिन्यांचा वेटिंग पिरियड असतो. तर काही कंपन्या ३६ महिन्यांनी आधीचे आजार कव्हर करतात. पॉलिसी घेताना हा नियम लक्षात घ्या

४. हॉस्पिटलचे नेटवर्क


आरोग्य विमा घेण्यापूर्वी त्या पॉलिसीअंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल नेटवर्क कसे आहे. ज्या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटलच्या नेटवर्कची सुविधा दिली जात असेल अशीच पॉलिसी घ्यावी.

५. को-पे निवडणे महाग ठरेल


थोडेसे पैसे वाचवण्यासाठी आणि प्रिमियम कमी करण्यासाठी बऱ्याच वेळा लोक को-पे ची सुविधा घेतात. को-पे म्हणजे क्लेम करताना पॉलिसीधारकाला त्याच्या खर्चातील (जवळपास १० टक्के) काही हिश्याचे भुगताना स्वत:च करावे लागते. या पर्यायामुळे तुमच्या खिशावर भार पडू शकतो.

६. अपनी मेडिकल हिस्ट्री लपवू नका


आरोग्य विमा पॉलिसी घेताना आपली आधीच्या आजारांची माहिती लपवू नका. बऱ्याचवेळा लोक ही माहिती लपवतात. काही वेळा मधूमेह, रक्तदाब इत्यादी आजार असल्यास पॉलिसीचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती लपवली जाते. अशा परिस्थितीत भविष्यात ही बाब उघड झाल्यास विमा कंपन्या तुमचा क्लेम नाकारू शकतात.

७. लिमिट किंवा सब लिमिट असलेला प्लॅन घेऊ नये


हॉस्पिटल किंवा प्रायवेट रुमचे भाडे यासारख्या लिमिट टाळा. कंपनीकडून तुमच्या हॉस्पिटलमधील खोलीचे भाडे कंपनीने ठरवणे तुमच्यासाठी योग्य नाही. या पर्यायात कंपनी ठराविकच रक्कमचा खर्च मंजूर करते, त्यापुढील खर्च तुम्हालाच करावा लागतो.

८. वेटिंग पिरियड लक्षात घ्या


आरोग्य विमा घेताना वेटिंग पिरियड लक्षात घ्या. तुमच्या वैद्यकीय खर्च किंवा आजारांवरील खर्च कंपनी लगेच देत नाही. त्यासाठी तुम्हाला काही कालावधीनंतर तुमचा खर्च मंजूर केला जातो. यालाच वेटिंग पिरियड म्हणतात. पॉलिसी घेतल्यापासून या कालावधीपर्यत कंपनी तुमच्या वैद्यकीय खर्चाचा क्लेम मंजूर करत नाही. या कालावधी १५ दिवसांपासून ९० दिवसांपर्यतचा असतो. 
ज्या कंपनीचा वेटिंग पिरियड कमी असेल तिला प्राधान्य द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी