Health Insurance : आरोग्यविमा घेताना लक्षात घ्या हे महत्त्वाचे मुद्दे

Health Insurance : दिवसेंदिवस वैद्यकीय खर्च महाग होत चालला आहे. आरोग्यविमा (Health Insurance)हा आर्थिक नियोजनातील (Financial Planning)महत्त्वाचा भाग झाला आहे. कोरोना महामारीच्या संकटाने आरोग्यविम्याचे महत्त्व सगळ्यांच्याच लक्षात आणून दिले. मोठ्या आजारपणाच्या इलाजाखातर तुमची अनेक वर्षांची बचत कामी येऊ शकते. या अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चामुळे तुमचे आर्थिक गणित कोलमडून पडेल

Health Insurance Tips
आरोग्य विमा घेताना महत्त्वाचे असणारे मुद्दे 
थोडं पण कामाचं
  • आरोग्यविमा हा आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा भाग
  • अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चामुळे तुमचे आर्थिक गणित कोलमडून पडेल
  • आरोग्य विमा घेताना काही मुद्द्यांचे भान राखणे आवश्यक

Health Insurance Tips :  मुंबई : दिवसेंदिवस वैद्यकीय खर्च महाग होत चालला आहे.  आरोग्यविमा (Health Insurance)हा आर्थिक नियोजनातील (Financial Planning)महत्त्वाचा भाग झाला आहे. कोरोना महामारीच्या संकटाने आरोग्यविम्याचे महत्त्व सगळ्यांच्याच लक्षात आणून दिले. मोठ्या आजारपणाच्या इलाजाखातर तुमची अनेक वर्षांची बचत कामी येऊ शकते. या अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चामुळे तुमचे आर्थिक गणित कोलमडून पडेल आणि तुम्ही आर्थिक अस्थैर्याला सामोरे जाल. मात्र आरोग्य विमा घेताना काही मुद्द्यांचे भान राखणे आवश्यक असते. अशाच ५ महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया. (Key points  to be considered while buying the Health Insurance)

अधिक वाचा : Multibagger Stock : या भन्नाट शेअरने केले 1 लाखाचे 8 कोटी, गुंतवणुकदारांची तुफानी कमाई

आरोग्य विमा पॉलिसी विकत घेताना खालील मुद्दे लक्षात घ्या - 

1. आरोग्यविम्याचा क्लेम सेटलमेंट रेशो
जेव्हा तुम्ही आरोग्य विमा पॉलिसी घेता तेव्हा ज्या कंपनीची ती पॉलिसी आहे त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो किती आहे हे नक्की पाहा. सेटलमेंट रेशो जास्त असणे फार महत्त्वाचे असते. जास्त क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे विमा कंपनीने जास्त क्लेमचे पैसे ग्राहकांना दिले आहेत किंवा जास्त क्लेम मंजूर केले आहेत. यामुळे हे कळते की कंपनीचे अंडर रायटिंग नियम जास्त कडक नाहीत. आयुर्विमा कंपन्या आपल्या वार्षिक अहवालात क्लेम सेटलमेंट रेशोचे आकडे देतात. कंपनीचा मागील तीन ते ५ वर्षांचा क्लेम सेटलमेंट रेशो तपासला पाहिजे.

अधिक वाचा : 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीसंदर्भात मोठी बातमी, पगार 40 हजारांनी वाढणार, लवकरच घोषणेची शक्यता

2. पॉलिसीचा वेटिंग पिरियड
आरोग्य विमा घेताना वेटिंग पिरियड लक्षात घ्या. तुमच्या वैद्यकीय खर्च किंवा आजारांवरील खर्च कंपनी लगेच देत नाही. त्यासाठी तुम्हाला काही कालावधीनंतर तुमचा खर्च मंजूर केला जातो. यालाच वेटिंग पिरियड म्हणतात. पॉलिसी घेतल्यापासून या कालावधीपर्यत कंपनी तुमच्या वैद्यकीय खर्चाचा क्लेम मंजूर करत नाही. या कालावधी १५ दिवसांपासून ९० दिवसांपर्यतचा असतो. 

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 30 June 2022: सोने स्थिर तर चांदीच्या भावात घसरण, पाहा ताजा भाव
ज्या कंपनीचा वेटिंग पिरियड कमी असेल तिला प्राधान्य द्या.

3. संबंधित पॉलिसीमधील हॉस्पिटलचे नेटवर्क
आरोग्य विमा घेण्यापूर्वी त्या पॉलिसीअंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल नेटवर्क कसे आहे. ज्या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त हॉस्पिटलच्या नेटवर्कची सुविधा दिली जात असेल अशीच पॉलिसी घ्यावी.

4. को-पे निवडणे 
थोडेसे पैसे वाचवण्यासाठी आणि प्रिमियम कमी करण्यासाठी बऱ्याच वेळा लोक को-पे ची सुविधा घेतात. को-पे म्हणजे क्लेम करताना पॉलिसीधारकाला त्याच्या खर्चातील (जवळपास १० टक्के) काही हिश्याचे भुगताना स्वत:च करावे लागते. या पर्यायामुळे तुमच्या खिशावर भार पडू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी