बजेट २०२०-२१: अर्थसंकल्पात शेकऱ्यांसाठी विशेष घोषणा, सरकार सुरू करणार किसान रेल योजना

काम-धंदा
Updated Feb 01, 2020 | 12:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

मोदी सरकारचा २०२०-२१ सालचा वार्षिक अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करत आहेत.या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.जाणून घ्या या योजना

Nirmala Sitaraman
सरकार सुरू करणार किसान रेल योजना, अर्थमंत्र्यांची घोषणा  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • सरकारची शेतकऱ्यांसाठी 'किसान रेल योजना' जाहीर. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दूध, मांस, मासे यांची वाहतूक करणं अधिक सोपं होईल.
  • जलसंकटात असलेल्या १०० जिल्ह्यांना अर्थसहाय्य देणार, शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम आता सरकार सुरू करणार.
  • सौर ऊर्जेवर शेतीसाठीचे पंप सुरू केले गेले आहेत. आणखी १५ लाख शेतकऱ्यांना सरकार सोलार पंप उपलब्ध करून देणार आहे.

नवी दिल्ली:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२०-२१ वाचण्यास सुरूवात केलीय. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सरकारनं जाहीर केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या अर्थसंकल्पाचं वाचन करतांना म्हणाल्या, 'शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आहे. यापुढे 'किसान रेल योजना' सरकार सुरू करणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दूध, मांस, मासे यांची वाहतूक करणं अधिक सोपे होणार आहे.'

 

 

शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते पाणी आणि ऊर्जा. याबाबत बोलतांना अर्थमंत्री म्हणाल्या, 'अन्नदाता उर्जादाता बनवण्यावर आम्ही भर देणार आहोत. जलसंकटात असलेल्या १०० जिल्ह्यांना अर्थसहाय्य देणार आहोत तसंच शेतीचा वापर अधिक चांगल्या पद्धतीनं करुन अधिक उत्पन्न कसं घेता येईल, यावर सरकारचा भर असणार आहे'.

 

 

 

 

आधीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान किसान योजने’ला यश मिळत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, ‘पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवण्यात यश आलंय. आपल्या देशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी सरकार सज्ज आहे.’ तसंच शेतकऱ्यांसाठी १६ कलमी कार्यक्रम आता आम्ही सुरू करत आहोत, यामुळे शेतकऱ्यांची चांगली प्रगती होईल. सौर ऊर्जेवर शेतीसाठीचे पंप सुरू केले गेले आहेत. आणखी १५ लाख शेतकऱ्यांना सरकार सोलार पंप उपलब्ध करून देणार आहे, असंही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...