Petrol, Diesel Price Today 16 September:पेट्रोल, डिझेल दराच्या घसरणीला ब्रेक, जाणून घ्या आजचा दर

काम-धंदा
Updated Sep 16, 2020 | 12:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Petrol, Diesel Price: दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होत असलेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. जाणून घ्या आजचा दर

Oil company
पेट्रोल, डिझेल दराच्या घसरणीला ब्रेक, जाणून घ्या आजचा दर 

थोडं पण कामाचं

  • पेट्रोल-डिझेल दराच्या घसरणीला ब्रेक
  • आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले
  • बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाहीत

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात(International market) बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेलांच्या किंमती(oil rates) वाढलेल्या पाहायला मिळाल्या. तर भारतात गेल्या दोन दिवसांपासासून पेट्रोल(petrol) आणि डिझेलच्या(diesel) दरात घसरण होत होती मात्र आज(बुधवार १६ ऑगस्ट) या घसरणीला ब्रेक मिळाला. तेल विपणन कंपन्यांनी बुधवारी पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल केले नाहीत. तर एक दिवस आधी पेट्रोल्या दरात दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये १७ पैसे तर चेन्नईमध्ये १५ पैसे प्रती लीटर कपात केली होती. तर डिझेलच्या दरात दिल्ली आणि कोलकातामध्ये २२ पैसे तर मुंबईत २४ पैसे आणि चेन्नईमध्ये २१ पैसे प्रती लीटरची कपात करण्यात आली होती. 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर कोणतेही बदल न होता अनुक्रमे ८१.५५ रूपये, ८३.०६ रूपये, ८८.२१ रूपये आणि ८४.५७ रूपये प्रती लीटरवर कायम राहिले. डिझेलच्या किंमतीही चार महानगरांमध्ये अनुक्रमे ७२.५६ रूपये, ७६.०६ रूपये, ७९.०५ रूपये आणि ७.९१ रूपये प्रती लीटरवर स्थिर राहिले. 

शहरं  पेट्रोल दर     डिझेल दर
मुंबई    ८८.२१ रुपये प्रति लिटर     ७९.०५ रुपये प्रति लिटर 
ठाणे     ८७.८१ रुपये प्रति लिटर   ७७.४५ रुपये प्रति लिटर
पुणे      ८८.५४ रुपये प्रति लिटर     ७८.१८ रुपये प्रति लिटर
नाशिक      ८७.९० रुपये प्रति लिटर     ७७.५७ रुपये प्रति लिटर
औरंगाबाद      ८९.३८ रुपये प्रति लिटर     ८०.२२ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर     ८८.३३ रुपये प्रति लिटर     ७८.०० रुपये प्रति लिटर
लातूर      ८९.०४ रुपये प्रति लिटर     ७८.६८ रुपये प्रति लिटर
नागपूर      ८८.७२ रुपये प्रति लिटर     ७९.६१ रुपये प्रति लिटर
सातारा      ८८.६७ रुपये प्रति लिटर     ७८.३० रुपये प्रति लिटर
रत्नागिरी      ८९.५१ रुपये प्रति लिटर     ७९.१४ रुपये प्रति लिटर

  


देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर 

दिल्लीः ८१.५५ रुपये प्रति लिटर
मुंबईः ८८.२१ रुपये प्रति लिटर
चेन्नई:  ८४.५७ रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: ७९.७२ रुपये प्रति लिटर
हैदराबादः ८४.७५ रुपये प्रति लिटर
बंगळुरू: ८४.२० रुपये प्रति लिटर

देशातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

दिल्लीः ७२.५६ रुपये प्रति लिटर
मुंबईः ७९.०५ रुपये प्रति लिटर
चेन्नई: ७७.९२ रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: ७३.०३ रुपये प्रति लिटर
हैदराबादः ७९.०८ रुपये प्रति लिटर
बंगळुरू: ७६.८२ रुपये प्रति लिटर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी