१ ऑगस्टपासून बदलणार बँक, विमा आणि पैशांशी संबंधित हे नियम, जाणून घ्या

बँकांमध्ये मिनिमम बॅलेंस चार्ज, व्याज दरापासून तर वाहन विमा पॉलिसी आणि पीएम किसान स्कीमशी निगडित नियमांमध्ये १ ऑगस्टपासून बदल होणार आहे. जाणून घ्या कोणकोणते आहेत हे बदल...

Rupees
१ ऑगस्टपासून बदलणार बँक, विमा आणि पैशांशी संबंधित हे नियम  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • १ ऑगस्टपासून बदलणार बँक, विमा आणि पैशांशी संबंधित हे नियम
  • आता बँकेच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये कमीतकमी एव्हढे पैसे ठेवावेच लागणार, नाहीतर होईल दंड
  • ऑगस्टमध्ये वाहन खरेदी करणं होऊ शकतं स्वस्त, जाणून घ्या यामागचं कारण

नवी दिल्ली: १ ऑगस्टपासून बँकांशी निगडित नियमांमध्ये, विमा पॉलिसी आणि इतर नियमांमध्ये बदल होणार आहे. मूळात फायनांशिअल नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. जे १ ऑगस्टपासून आपल्या दररोजच्या कामांना प्रभावित करतील. मिनिमम बॅलेंस चार्जपासून लाँग टर्म मोटर व्हेईकल इंशूरन्स कव्हर पॉलिसी आणि पीएम किसान स्कीमशी निगडित नियमांमध्ये बरंच काही बदलणार आहे. १ ऑगस्टपासून लागू होणारे जाणून घ्या सर्व नवीन नियम...

बँकेतील खात्यासाठी कमीतकमी बॅलेंसचा नियम

बँक ऑफ महाराष्ट्र, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेनं घोषणा केलीय की, जे ग्राहक आपल्या खात्यात १ ऑगस्टपासून कमीतकमी बॅलेंस ठेवणार नाही. त्यांच्याकडून दंडात्मक चार्ज वसूल केला जाईल. बँक ऑफ महाराष्ट्रम्ये कमीतकमी बॅलेंस २००० रुपये ठेवणं गरजेचं आहे. पहिले ही रक्कम १५०० हजरा होती. नवीन नियमानुसार जर २००० रुपये बँकेच्या खात्यात नसतील, तर बँक मेट्रो आणि शहरी भागातील खातेधारकांना पेनल्टी म्हणून ७५ रुपये प्रति महिना चार्ज लावतील. तर नगरपालिका क्षेत्रातील बँकेत ही चार्जची रक्कम ५० रुपये असेल तर ग्रामीण भागात २० रुपये प्रति महिना चार्ज करेल.

आरबीएल बँक सेव्हिंग्ज अकाऊंटवरील व्याजदरात बदल

आरबीएल बँकेच्या सेव्हिंग्ज अकाऊंटवरील व्याजदरांमध्ये बदल केला गेला आहे आणि नवीन दर १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. नुकत्याच एका संशोधनानंतर बँकेनं ग्राहकांच्या सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये जर १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम असेल तर त्यावर ४.७५ टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये १ ते १० लाख रुपये जमा असलेल्या रकमेवर ६ टक्के आणि १० लाख रुपये ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या सेव्हिंग्ज अकाऊंटवर ६.७५ टक्के व्याज मिळेल.

पीएम किसान स्कीमचा सहावा हफ्ता

पीएम-किसान योजने अंतर्गत १ ऑगस्टला सहावा हफ्ता दिला जाणार आहे. पंतप्रधान किसान निधी योजनेचा सहावा हफ्ता १ ऑगस्टपासून सुरू करेल. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये ट्रान्सफर करणार आहे. लक्षात ठेवा की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपये तीन समान हफ्त्यामध्ये प्रत्येक वर्षी दिले जातात. म्हणजे एका वर्षात शेतकऱ्यांना ६००० रुपये मिळतात, जे सरळ त्यांच्या बँक खात्यात प्रत्येक चार महिन्यांनी जमा होतील. ५वा हफ्ता सरकारनं १ एप्रिल २०२० ला जमा केला होता.

मोटर वाहन विमा नियमांमध्ये बदल

भारतीय विमान विनियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) नं जूनमध्ये विमा कंपन्यांना १ ऑगस्ट २०२० पासून नवीन वाहन मालकांना लाँग टर्म मोटर विमा पॅकेज पॉलिसी विकण्यापासून थांबवायला सांगितलंय. पुढील महिन्यापासून लाँग टर्मसाठी कॉम्प्रहेंसिव मोटर विमा जो वाहन डॅमेज आणि थर्ड पार्टी पर्सनपासून नुकसान कव्हर करेल. कारसाठी ३ वर्ष आणि दोन चाकी गाड्यांसाठी ५ वर्षांचा डॅमेज कव्हर केलं जातं. नवीन नियमानंतर नवीन कार विकत घेणाऱ्याला ३ आणि टू-व्हिलर असलेल्यांना ५ वर्षांचा विमा घेण्यासाठी बाध्य केलं जाणार नाही. नवीन नियमांमध्ये बदलामुळे ऑगस्टमध्ये कार किंवा बाईक विकत घेणं स्वस्त होऊ शकतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी