ITR Filing : प्राप्तिकर विवरणपत्र भरताना मिळेल 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट, जाणून घ्या कसे

Income Tax Slab : प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे आयटीआर (ITR Filing) दाखल करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 ही आहे. जर तुम्ही अजून तुमचा कर भरला नसेल, तर लगेच भरा. दरम्यान, आता प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची मुदत वाढवली जाणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच शेवटची तारीख यायला अवघे काही दिवस उरले आहेत. दुसरीकडे, यानंतर तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल.

Benefit of Rs 2.5 lakhs on ITR
आयटीआर भरताना मिळवा 2.5 लाखांची सूट 
थोडं पण कामाचं
  • प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022
  • प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल
  • काही लोकांना ITR भरण्यासाठी 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल

Income Tax Slab : नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे आयटीआर (ITR Filing) दाखल करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 ही आहे. जर तुम्ही अजून तुमचा कर भरला नसेल, तर लगेच भरा. दरम्यान, आता प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची मुदत वाढवली जाणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजेच शेवटची तारीख यायला अवघे काही दिवस उरले आहेत. दुसरीकडे, यानंतर तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. तुमच्या माहितीसाठी यावेळी काही लोकांना ITR भरण्यासाठी 2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. जाणून घ्या कसे ते.( Know how to get benefit of Rs 2.5 lakhs on ITR filing)

अधिक वाचा : 7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात आले डीए थकबाकीचे पैसे, लगेच तपासा

2.5 लाखांपासून सुरू होतो इन्कम टॅक्स स्लॅब (Income Tax Slab)

हे लक्षात घेण्यासारखे आहे की सर्वसाधारणपणे 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास ते प्राप्तिकराच्या कक्षेत येतात. म्हणजेच जर त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना कर भरावा लागतो. साधारणत: 2.5 लाख ते 5 लाख रुपयांवर वार्षिक 5 टक्के प्राप्तिकर कापला जातो.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 25 July 2022: सोन्यावरील अस्थिरतेचे सावट कायम, चांदीच्या भावातदेखील घसरण, पाहा ताजा भाव

अतिरिक्त सवलत कोणाला आणि कशी मिळेल?

आता पाहूया अतिरिक्त सवलत कोणाला आणि कशी मिळणार? ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे वय 60 ते 80 वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांनाही कर भरावा लागतो. परंतु 60 ते 80 वयोगटातील लोकांसाठी, जेव्हा वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये असेल तेव्हा कर ब्रॅकेट सुरू होते. त्यानुसार या लोकांना ३ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळाल्यावर प्राप्तिकर भरावा लागणार आहे. म्हणजेच या लोकांना 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळते.

अधिक वाचा : ITR Filing: प्राप्तिकर विवरणपत्राची शेवटची तारीख, नेमका किती कर भरावा आणि कर नियोजन कसे करावे, जाणून घ्या

2.5 लाख रुपयांची अतिरिक्त सूट कशी मिळवायची?

याशिवाय काही लोकांना व्हेरी सिनियर सिटीझनच्या श्रेणीतही ठेवण्यात आले आहे. म्हणजेच ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनाही प्राप्तिकर भरण्यात अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. म्हणजेच अशा अति ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील लोकांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल तरच ते प्राप्तिकराच्या कक्षेत येतात. आता यानुसार या लोकांना सामान्य करदात्याच्या तुलनेत 2.5 लाखांची अतिरिक्त सूट मिळते.

प्राप्तिकर विवरणपत्र भरताना तुम्ही इन्कम टॅक्सच्या कोणत्या स्लॅबमध्ये येता, तुम्ही नेमका किती प्राप्तिकर देणे लागता याबद्दलची माहिती घेणे महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर कर नियोजन (Tax Planning) करणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. कर नियोजन केल्याशिवाय तुमचे आर्थिक नियोजन पूर्णच होणार नाही. तुम्ही चालू आर्थिक वर्षासाठी अद्याप कर नियोजन केले नसेल, तर तुम्ही शेवटच्या क्षणी असे करत असाल. कर नियोजन ही वर्षभर चालणारी क्रिया असली तरी आर्थिक वर्ष संपल्यावरच अनेकांना याची जाणीव होते. शेवटच्या क्षणी कर नियोजनातही चुका होण्याची शक्यता असल्याने ही पद्धत चुकीची आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी