Cryptocurrency Tax Explained | बिटकॉइन, एनएफटीमध्ये गुंतवणूक करतांय...मग जाणून घ्या नव्या क्रिप्टो करांसदर्भात सर्वकाही!

Cryptocurrency Investment : नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिल 2022 पासून, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक (Investment in Cryptocurrency) करणाऱ्यांना आभासी मालमत्तेतून मिळणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर (Cryptocurrency Tax) भरावा लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सी, नॉनफंजिबल टोकन (NFTs) आणि इतर आभासी डिजिटल मालमत्तांमधून (VDA) मिळणाऱ्या उत्पन्नासाठीचा नवीन कर सादर केला. प्रस्तावित नियमानुसार, सर्व आभासी मालमत्तेवर 30 टक्के कर आकारला जाईल.

New Cryptocurrency Tax
नव्या क्रिप्टोकरन्सी कराबद्दल विस्ताराने जाणून घ्या 
थोडं पण कामाचं
 • 1 एप्रिल 2022 पासून, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आभासी मालमत्तेतून मिळणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर भरावा लागणार
 • अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी उत्पन्नासाठी गणना आणि कर दराची पद्धत प्रदान करण्यासाठी नवीन कलम 115BBH सादर केले
 • क्रिप्टोकरन्सी टॅक्स वसूल करताना फक्त डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सीमधून झालेला नफाच गृहित धरला जाणार, तोट्यावर वजावट नाही

Cryptocurrency Tax from April : नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिल 2022 पासून, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक (Investment in Cryptocurrency) करणाऱ्यांना आभासी मालमत्तेतून मिळणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकर (Cryptocurrency Tax) भरावा लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सी, नॉनफंजिबल टोकन (NFTs) आणि इतर आभासी डिजिटल मालमत्तांमधून (VDA) मिळणाऱ्या उत्पन्नासाठीचा नवीन कर सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी उत्पन्नासाठी गणना आणि कर दराची पद्धत प्रदान करण्यासाठी नवीन कलम 115BBH सादर केले. प्रस्तावित नियमानुसार, सर्व आभासी मालमत्तेवर 30 टक्के कर आकारला जाईल. (Know in detail about the new Crptocurrency tax if you are cryptocurrency investor)

अधिक वाचा : Investment Tips | तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करूनदेखील जास्त परतावा देखील मिळवू शकता! जाणून घ्या या खास टिप्स

नफा, तोटा आणि कर वजावट

क्रिप्टोकरन्सी आणि सर्व डिजिटल मालमत्तेचा समावेश असलेल्या सर्व व्यवहारांवर 1 टक्के कर वजावट (TDS) देखील लागू होईल. शिवाय, एका प्रकारच्या व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेतून होणारे नुकसान हे दुसर्‍या डिजिटल टोकन्सच्या व्यवहारातून झालेल्या नफ्यातून वजा करता येणार नाही. म्हणजेच क्रिप्टोकरन्सी टॅक्स वसूल करताना फक्त डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सीमधून झालेला नफाच गृहित धरला जाणार आहे. यात झालेला तोटा वजा करून फक्त निव्वळ नफ्यावर हा कर आकारला जाणार नाही. यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात झालेल्या तोट्यावर क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकदारांना कोणतीही करवजावट घेता येणार नाही.

अधिक वाचा : Indian Railways update | आरक्षण असूनही बर्थ न दिल्याबद्दल भारतीय रेल्वे, प्रवाशाला देणार एक लाख रुपये

तुम्हाला नवीन क्रिप्टोकरन्सी कर बद्दल माहिती असायला हव्यात अशा बाबी-

 1. - क्रिप्टोकरन्सी तसेच एनएफटी सारख्या आभासी मालमत्तेच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के दराने कर आकारला जाईल.
 2. - क्रिप्टोकरन्सी मालमत्तेत गुंतवणूक करताना किंवा अशी मालमत्ता ताब्यात घेताना करण्यात आलेल्या व्यवहारांसाठी येणाऱ्या खर्चाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची वजावट केली जाणार नाही.  
 3. - क्रिप्टोकरन्सी किंवा आभासी डिजिटल मालमत्तेतून झालेला तोटा करदात्याच्या इतर कोणत्याही उत्पन्नाच्या (शेअर्स किंवा म्युच्युअल फंड) विरुद्ध सेट ऑफ केला जाऊ शकत नाही म्हणजे गणला जाणार नाही. याचाच अर्थ प्राप्तिकर मोजणी करताना करदात्याचे सर्व तोट्याचे व्यवहार दुर्लक्षित केले जातील आणि फक्त नफाच लक्षात घेतला जाईल.
 4. -  डिजिटल मालमत्तेमुळे होणारा तोटा पुढील वर्षासाठी पुढे नेला जाऊ शकत नाही
 5. - याशिवाय, आभासी डिजिटल मालमत्तेच्या विक्रीतून करदात्याला मिळालेल्या कोणत्याही पेमेंटवर एका वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर 1 टक्के टीडीएस लागू होईल.
 6. - क्रिप्टोकरन्सी आणि एनएफटी गिफ्ट मिळालेल्यासाठी ही बाब करपात्र असेल.

अधिक वाचा : Pune Real Estate | पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये घर खरेदी करणे होणार महाग...पाहा काय आहे कारण

उदाहरण : जर तुम्ही 1 लाख रुपयांची आभासी डिजिटल मालमत्ता विकली असेल आणि त्याच्या संपादनाची किंमत 20,000 रुपये असेल. अशावेळी आभासी मालमत्तेच्या विक्रीतून निव्वळ उत्पन्न 80,000 रुपये मिळेल. (1,00,000 रुपये - 20,000 रुपये). नवीन प्राप्तिकर कायद्यानुसार, 24,000 रुपये कर दायित्व असेल. हे नमूद करणे आवश्यक आहे की आभासी मालमत्तेचे नुकसान आभासी मालमत्तेतूनच झालेल्या नुकसानासंदर्भात सेटल केले जाऊ शकते.

नवीन नियमाबद्दल माहिती देताना, Proaasetz Exchange चे संस्थापक मनोज दालमिया म्हणाले की, "फायनान्स बिलानुसार व्हर्च्युअल डिजीटल अॅसेट (VDA) साठी विशिष्ट करप्रणालीचे पालन करणे आवश्यक आहे, यात कोणत्याही स्लॅब वजावट न करता नफ्यावर 30 टक्के कराचा समावेश आहे. एका VDA मधील तोटा दुसर्‍या VDA मधील नफ्यातून वजा केला जाणार नाही. त्यामुळे कर मोजणीसाठी सर्व तोट्याच्या व्यवहारांकडे दुर्लक्ष केले जाईल आणि फक्त नफा मोजला जाईल."

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “सर्व ट्रेडिंग जोड्या ते क्रिप्टोकरन्सी किंवा क्रिप्टोकरन्सी ते क्रिप्टोकरन्सी हे करपात्र इव्हेंट असेल. होल्डिंग आणि ट्रेडिंग व्यतिरिक्त डिजिटल टोकन भेट देणे देखील गिफ्ट मिळणाऱ्यासाठी करपात्र असेल."

भारतात क्रिप्टो मायनिंगसंदर्भात तुम्हाला नवीन प्राप्तिकराबद्दल माहिती असायला हव्यात अशा बाबी-

 1. - अर्थ मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की क्रिप्टो मालमत्तेच्या मायनिंगच्या खर्चास कर कपात म्हणून परवानगी दिली जाणार नाही. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांनी व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या (VDA) मायनिंगसाठी केलेल्या पायाभूत सुविधांचा खर्चाचा समावेश क्रिप्टोकरन्सी किंवा आभासी मालमत्तेच्या संपादनाच्या खर्चात करू नये. 
 2. - नवीन क्रिप्टोकरन्सी टॅक्समध्ये क्रिप्टो मायनिंग करणाऱ्यांना आलेल्या खर्चाचासाठी कोणतीही वजावट दिली जाणार नाही. त्यामुळे मायनिंग व्यवहाराचा खर्च हा शून्य असेल. आभासी मालमत्तेवर
 3. (VDA) फक्त संपादन किंवा खरेदीची किंमतच गृहित धरलीली जाऊ शकते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी