पाहा नोव्हेंबर महिन्यात कधी-कधी बंद असणार बँका

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Oct 29, 2020 | 16:06 IST

Bank Holidays in November 2020: नोव्हेंबर महिन्यात बँकांना अनेक सुट्या असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी नेमकी सुट्टी कधी आहे हे जरुर पाहावं.

Bank Holiday
पाहा नोव्हेंबर महिन्यात कधी-कधी बंद असणार बँका  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • नोव्हेंबरमध्ये चार रविवारी आणि दोन शनिवारी बँका बंद असतील
 • दिवाळीसह साप्ताहिक सुट्टी देखील असणार 
 • बँकेची सुट्टी गुरु नानक जयंतीला देखील असणार

मुंबई: Bank Holidays in November 2020: नोव्हेंबर हा सणासुदीचा महिना आहे ज्यामध्ये दिवाळी, (Diwali)करवा चौथ, छठपूजा आणि गुरुनानक जयंती असे अनेक महत्वाचे सण (Festival) आहेत. नोव्हेंबर महिन्यात (November Bank Holiday) ऑक्टोबरप्रमाणे सणासुदीच्या हंगामामुळे बरेच दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. म्हणूनच बँक ग्राहकांनी कोणतीही गैरसोय टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी त्यांची कामं वेळेत पूर्ण केले पाहिजे जेणेकरून त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये. शनिवारी आणि रविवारी  दिवाळी अशा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व बँका बंद असतात. नोव्हेंबरमध्ये चार रविवारी आणि दोन शनिवारी बँका बंद ठेवण्यात येतील.

नोव्हेंबर २०२० मध्ये दिवाळीची सुट्टी तर आहेच पण साप्ताहिक सुट्टी असल्याने देखील बँका सलग बंद राहणार आहेत. दिवाळीशिवाय नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती देखील आहे. या दिवशीही बँकांना सुट्टी असेल. यंदा दिवाळी शनिवारी आणि रविवार दोन दिवस असल्याने बँक सलग दोन दिवस बंद राहतील. याशिवाय इतरही सणांनिमित्त या महिन्यात बँकांना सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या दिवशी बँकांना असणार सुट्टी: 

नोव्हेंबरमधील बँक हॉलिडे (Bank Holiday)

 1. १ नोव्हेंबर - रविवार
 2. ८ नोव्हेंबर - रविवार
 3. १४ नोव्हेंबर - दुसरा शनिवार / दिवाळी
 4. १५ नोव्हेंबर - रविवार
 5. २२ नोव्हेंबर - रविवार
 6. २८ नोव्हेंबर - चौथा शनिवार
 7. २९ नोव्हेंबर - रविवार
 8. ३० नोव्हेंबर - गुरु नानक जयंती

बँक खातेदारांनी नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की केंद्र सरकारच्या सर्व सुट्टी देशातील सर्व बँक, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांवर लागू होतात. तथापि, काही राज्यांमध्ये बँकाच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. म्हणूनच, या सुट्ट्यांना ध्यानात घेऊन आपण आपल्या बँकेसंबंधी व्यवहार उरकून घेतले पाहिजेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी