५०० रुपयांपेक्षा २०० रुपयांची नोट आहे महाग

Know printing cost of Indian Currency notes and cost of printing of 2000 and 500 Rupees notes : नोटांची छपाई करण्यासाठी मोठा खर्च होतो. यामुळे नोटा छपाईसाठी रिझर्व्ह बँकेला मोठी तरतूद करावी लागते.

Know printing cost of Indian Currency notes and cost of printing of 2000 and 500 Rupees notes
५०० रुपयांपेक्षा २०० रुपयांची नोट आहे महाग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ५०० रुपयांपेक्षा २०० रुपयांची नोट आहे महाग
  • २० रुपयांपेक्षा १० रुपयांच्या नोटा छापायला जास्त खर्च
  • कागदाच्या वाढत्या किंमतींमुळे खर्चात वाढ

Know printing cost of Indian Currency notes and cost of printing of 2000 and 500 Rupees notes : केंद्र सरकारने महागाई कमी करावी. नोटा छापाव्या असे काही जण अधूनमधून म्हणत असतात. हे बोलणे सोपे असले तरी प्रत्यक्षात नोटांची छपाई करण्यासाठी पण मोठा खर्च होतो. यामुळे नोटा छपाईसाठी रिझर्व्ह बँकेला मोठी तरतूद करावी लागते. नोट कितीही मूल्याची असो ती छापण्यासाठी खर्च हा करावाच लागतो आणि प्रत्येक नोट छापण्यासाठी हा खर्च येतो. 

1 रुपयात छापल्या जातात 20 रुपयांच्या नोटा, जाणून घ्या 2000च्या नोटा छापण्यासाठी येतो किती खर्च?

दोन हजार रुपयांच्या नोटांची छापाई झाली बंद, गेल्या दोन वर्षांपासून छापली गेली नाही एकही नवीन नोट

विशेष म्हणजे २०० रुपयांची नोट छापण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा ५०० रुपयांची नोट छापण्याचा खर्च कमी आहे.  २० रुपयांपेक्षा १० रुपयांच्या नोटा छापायला जास्त खर्च येतो. कागदाच्या वाढत्या किंमतींमुळे हा खर्च वाढत आहे. रिझर्व्ह बँकेने सध्या २००० रुपयांच्या नोटा छापणे थांबविले आहे. पण २००० रुपयांच्या नोटांना भारतीय चलन व्यवस्थेत मान्यता आहे.

माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार नोटा छपाईचा खर्च...

  1. १० रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- ९६० रुपये
  2. २० रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- ९५० रुपये
  3. ५० रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- १ हजार १३० रुपये
  4. १०० रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- १ हजार ७७० रुपये
  5. २०० रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- २ हजार ३७० रुपये
  6. ५०० रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- २ हजार २९० रुपये

रिझर्व्ह बँकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षात ५० रुपयांच्या हजार नोटा छापण्यासाठी ९२० रुपये खर्च येत होता. यामध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षात २३ टक्के वाढ झाली असून, हा खर्च २ हजार १३० रुपयांवर पोहोचला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी