Bank holidays | जानेवारी महिन्यात किती दिवस असणार बॅंकांना सुट्टी, पाहा लिस्ट

Bank holidays in January : नवीन वर्षात अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लावण्याचे नियोजन केले जाते. यामध्ये बॅंकांशी संबंधित कामेही असतात. मात्र तुमचे नियोजन आखण्यापूर्वी जानेवारी २०२२ मध्ये बॅंकांना असणाऱ्या सुट्ट्या (Bank holidays) माहित करू घ्या, म्हणजे तुमचे नियोजन सुरळीतपणे पार पडेल. पाहूया जानेवारी महिन्यात (Bank holidays in January)कोणत्या दिवशी बॅंकांना सुट्टी असणार आहे.

 Bank holidays in January
जानेवारी महिन्यातील बॅंकांच्या सुट्ट्या 
थोडं पण कामाचं
 • नवीन वर्षात जानेवारी महिन्यात बॅंकांना किती दिवस असणार सुट्टी
 • बॅंकांच्या सुट्ट्या तपासा आणि करा आपल्या कामांचे नियोजन
 • बॅंकांच्या शाखांना सुट्टी असली तरी नेट बॅंकिंग सुरूच राहणार

Bank holidays in January 2022: नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या आगमनानंतर अनेकांनी नवे प्लॅनिंग (New Year Planning)आखले असेल. त्यात आर्थिक बाबी, व्यवहार यांचाही समावेश असतो. अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लावण्याचे नियोजन केले जाते. यामध्ये बॅंकांशी संबंधित कामेही असतात. मात्र तुमचे नियोजन आखण्यापूर्वी जानेवारी २०२२ मध्ये बॅंकांना असणाऱ्या सुट्ट्या (Bank holidays) माहित करू घ्या, म्हणजे तुमचे नियोजन सुरळीतपणे पार पडेल. पाहूया जानेवारी महिन्यात (Bank holidays in January)कोणत्या दिवशी बॅंकांना सुट्टी असणार आहे. (Know the Bank holidays in January 2022: Check the list)

आरबीआयने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियने जानेवारी २०२२साठीची बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी महिन्यात ९ दिवस बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे. यात विकेंड म्हणजे दुसऱ्या, चौथ्या शनिवारचा आणि रविवारचा समावेश आहे. अर्थात या काळात डिजिटल बॅंकिंग, नेट बॅंकिंग सुरूच राहणार आहे. मात्र या ९ दिवसात ग्राहकांना बॅंकांच्या शाखेत जाऊन मात्र काम करता येणार नाही. त्यांना बॅंकेच्या शाखेतून पैसे काढता येणार नाहीत किंवा पैसे जमा करता येणार नाहीत, कारण बॅंकांना सुट्टी असणार आहे. 

जानेवारी २०२२ मध्ये बॅंकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी पाहूया-

 1.  १ जानेवारी २०२२ ला नवीन वर्षानिमित्त ऐझॉल, चैन्नई, गंगटोक आणि शिलॉंग येथे बॅंकांना सुट्टी असणार आहे.
 2.  ३ जानेवारी २०२२ ला नवीन वर्षानिमित्त ऐझॉल आणि गंगटोक येथे बॅंकांना सुट्टी असणार आहे.
 3. ४ जानेवारी २०२२ला लोसूंग निमित्त गंगटोक येथे बॅंकांना सुट्टी असणार आहे.
 4. ११ जानेवारी २०२२ला मिशनरी डे निमित्त ऐझॉल येथे बॅंकांना सुट्टी असणार आहे.
 5. १२ जानेवारी २०२२ला स्वामी विवेकानंदांच्या जयतींनिमित्त कोलकाता येथे बॅंकांना सुट्टी असणार आहे.
 6. १४ जानेवारी २०२२ ला मकर संक्रांती, पोंगल निमित्त अहमदाबाद आणि चैन्नई येथे बॅंकांना सुट्टी असणार आहे.
 7. १५ जानेवारी २०२२ला उत्तरायण पुण्यकाल मकर संक्रांती उत्सवासाठी, संक्रांती, पोंगल, थिरुवल्लुवर डे निमित्त बंगळूरू, चैन्नई, गंगटोक आणि हैदराबाद येथे बॅंकांना सुट्टी असणार आहे.
 8. १८ जानेवारी २०२२ला थाई पूसम निमित्त चैन्नई येथे बॅंकांना सुट्टी असणार आहे.
 9. २६ जानेवारी २०२२ला प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वच शहरांमध्ये बॅंकांना सुट्टी असणार आहे. यात अपवाद फक्त अगरतला, भोपाळ, भुबनेश्वर, चंदीगढ, गुवाहाटी, इंफाळ, जयपूर, कोची आणि  श्रीनगर या शहरांचा आहे.

वर उल्लेख केलेल्या सुट्ट्यांव्यतिरिक्त बॅंकांना ८ जानेवारी आणि २२ जानेवारीला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारनिमित्त सुट्टी असणार आहे. तर २ जानेवारी, ९ जानेवारी, १६ जानेवारी, २३ जानेवारी आणि ३० जानेवारीला रविवार असल्यामुळे सुट्टी असणार आहे. तुम्ही कोणत्या शहरात राहता आणि त्या शहरात बॅंकांना कधी सुट्ट्या आहेत हे पाहून तुम्हाला तुमच्या कामाचे नियोजन करता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी