December Bank Holidays: डिसेंबरमध्ये बँका 13 दिवस बंद...पाहा संपूर्ण यादी, करा कामाचे नियोजन

Bank Holidays Update : दर महिन्याप्रमाणेच डिसेंबर महिन्यासाठीदेखील रिझर्व्ह बॅंकेने सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली आहे. डिसेंबर महिना म्हटला की ख्रिसमससारखा महत्त्वाचा सण आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन यांची तयारी आणि सुट्ट्या डोळ्यासमोर येतात. या निमित्ताने बॅंकांनादेखील सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात तुमचे जर बॅंकेत म्हणजे बॅंकांच्या शाखेत एखादे काम असणार असेल तर त्याचे नियोजन आतापासूनच करा.

Bank Holidays
बॅंकांच्या सुट्ट्या 
थोडं पण कामाचं
  • डिसेंबर महिन्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने सुट्ट्यांची यादी जाहीर केली
  • डिसेंबरमध्ये ख्रिसमससारखा महत्त्वाचा सण आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन यांची धामधूम
  • डिसेंबर महिन्यात बॅंकांना एकूण 13 सुट्ट्या असणार

Bank Holidays list in December 2022 :नवी दिल्ली : लवकरच नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिना सुरू होणार आहे. दर महिन्याप्रमाणेच डिसेंबर महिन्यासाठीदेखील रिझर्व्ह बॅंकेने (RBI) सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली आहे. डिसेंबर महिना म्हटला की ख्रिसमससारखा महत्त्वाचा सण आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन यांची तयारी आणि सुट्ट्या डोळ्यासमोर येतात. या निमित्ताने बॅंकांनादेखील सुट्ट्या (Bank holidays in December 2022) असणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात तुमचे जर बॅंकेत म्हणजे बॅंकांच्या शाखेत एखादे काम असणार असेल तर त्याचे नियोजन आतापासूनच करा. कारण डिसेंबर महिन्यात बॅंकांना एकूण 13 सुट्ट्या असणार आहेत. देशातील  बँकांना इतक्या सुट्ट्या असल्यामुळे तुम्ही बॅंकेतील तुमच्या कामांचे नियोजन आताच करा. डिसेंबर महिना सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबर 2022 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. (Know the Bank holidays list in December 2022 read in Marathi)

अधिक वाचा - Winter health tips: 99% लोकांना माहित नसते व्हिटॅमिन डीसाठी सूर्यप्रकाश किती वाजता आणि किती वेळ घ्यावा...जाणून घ्या

डिसेंबरमधील बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी - (Bank Holidays In December 2022)-

बॅंकांना पहिली सुट्टी 3 डिसेंबरला

डिसेंबर महिन्यात बॅंकांना एकूण 13 दिवस सुट्टया असणार आहेत. या 13 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येक महिन्याप्रमाणे शनिवार आणि रविवारचा समावेश आहे. रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील. मात्र या सुट्ट्या अनेकवेळा त्या त्या राज्यानुसार दिल्या जातात. प्रादेशिक सुट्ट्या संबंधित राज्य सरकार ठरवतात. डिसेंबरमधील पहिली सुट्टी 3 डिसेंबर ला असणार आहे.

अधिक वाचा - मित्रासोबत प्रणय करणाऱ्या मुलीला तांत्रिकनं फेवीक्विकनं चिपकवलं, नंतर घेतला जीव

डिसेंबरमधील बॅंकांच्या सुट्ट्या

3 डिसेंबरनंतर 4 डिसेंबरला रविवारची सुट्टी आहे. 10 आणि 11 डिसेंबर रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकेला दोन दिवस सुट्टी असणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरलाही देशातील काही भागात बँका बंद राहतील. 18 डिसेंबर रविवार आणि 19 हा गोवा मुक्ती दिन आहे. 24, 25 आणि 26 डिसेंबर या दिवशी ख्रिसमसच्या सणानिमित्त राज्यांनुसार सुट्टी असणार आहे. तर  29, 30 आणि 31 डिसेंबरला सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. यातील  29 तारखेला गुरु गोविंद सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त, 30 तारखेला यू कियांग नांगबाह आणि 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बँका बंद राहतील. सलग दिवस बॅंका बंद राहणार असल्यामुळे बॅंकिंगच्या कामाचे नियोजन ग्राहकांना करावे लागणार आहे.

अधिक वाचा -  Shani Dosh : तुमच्यावर शनिची वक्रदृष्टी झाली आहे का? मग हे करा, नोकरी-व्यवसायात होईल प्रचंड फायदा

रिझर्व्ह बॅंकेकडून ठरवल्या जातात सुट्ट्या

देशातील बॅंकांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया निश्चित करते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक सुट्टीची यादी तीन श्रेणींमध्ये विभागली आहे. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक्स क्लोजिंग ऑफ खाती अशी विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सुट्यांव्यतिरिक्त, काही राज्य-विशिष्ट सुट्ट्या असतात. ज्यात सर्व रविवार तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा समावेश होतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी