Changes from 1st October : 1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, आताच पाहा आणि नाहीतर होईल नुकसान

Rules from 1st October : ऑक्टोबर महिना सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. डेबिट आणि क्रेडिट कार्डपासून ते अटल पेन्शन योजना आणि एलपीजी सिलिंडरपर्यंत अनेक बदल होणार आहे. या बदलांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.

Rules Changing from 1st October
1 ऑक्टोबरपासून बदलणारे नियम 
थोडं पण कामाचं
  • टोकनायझेशन ते म्युच्युअल फंड अनेक गोष्टींमधील नियम
  • देशात एकूण 6 नियमात बदल होणार आहेत.
  • होणारे बदल समजून घ्या आणि नुकसान टाळा

Rules Changing from 1st October 2022 : नवी दिल्ली :  दर महिन्यात काहीतरी बदल होत असतात. त्यातही हे नियम जर आर्थिक बाबींशी (Financial Task) संबंधित असतील तर आपण वेळीच त्यांची दखल घेतली पाहिजे. ऑक्टोबर (October) महिना सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. सध्या नवरात्र सुरू आहे. पुढील महिन्यात देशात अनेक सण आहेत. त्याचबरोबर 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही (Rule changes from 1st October) बदलणार आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डपासून ते अटल पेन्शन योजना आणि एलपीजी सिलिंडरपर्यंत अनेक बदल होणार आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून होणाऱ्या या महत्त्वाच्या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. नेमके काय बदल होणार आहे ते जाणून घेऊया. (Know the changes in rules from 1st October which will affect your pocket)

अधिक वाचा : Festive Car Offers : स्वस्तात कार खरेदीची उत्तम संधी, या कंपनीची नवरात्री-दिवाळी ऑफर; होईल इतका फायदा

1 ऑक्टोबर 2022 पासून होणारे महत्त्वाचे बदल-

म्युच्युअल फंडामध्ये नामांकन आवश्यक 

तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी हा नियम महत्त्वाचा आहे. सेबीने म्युच्युअल फंड धारकांसाठी नामांकनाशी संबंधित नियमांची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. नवीन नियमांनुसार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांनी 1 ऑक्टोबरपासून नॉमिनेशनची माहिती देणे आवश्यक आहे.

अल्पबचत योजनांचे व्याजदर 

केंद्र सरकारद्वारे सर्वसामान्यांसाठी अनेक अल्पबचत योजना राबवल्या जातात. या योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित तर असतातच परंतु त्याचबरोबर त्या चांगले व्याजदेखील देतात.  यापैकी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), आणि राष्ट्रीय बचत योजना (NSC)या सर्वात लोकप्रिय योजना आहेत. सरकार दर तिमाहीत या अल्पबचत योजनांवरील व्याजदरात बदल करत असते. पुढील महिन्यापासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ होऊ शकते. या योजनांच्या व्याजदरांचे पुनरावलोकन 30 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे. या योजनांवर मिळणाऱ्या लाभांची गणना केंद्राकडून प्रत्येक तिमाहीत केली जाते. सरकारी कर्जरोख्यांच्या परताव्याच्या आधारावर या योजनांचे व्याजदर ठरवले जातात. 

अधिक वाचा : Diabetes Cause : जीवनशैलीशी निगडीत या 4 कारणांमुळे असतो मधुमेहाचा सर्वाधिक धोका, तुमचे काय?

टोकनायझेशन लागू होणार

डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे होणारी फसवणूक पाहता, कार्ड टोकनायझेशनचे नियम लागू होणार आहेत. जूनच्या शेवटी रिझर्व्ह बॅंकेने टोकनायझेशनची अंतिम मुदत तीन महिन्यांनी वाढवून 30 सप्टेंबर 2022 केली. सध्याच्या नियमांनुसार, व्यवहार केल्यानंतर कार्डची माहिती व्यापारी किंवा कंपनीद्वारे सेव्ह केली जाते. अशा परिस्थितीत वेबसाइट हॅक झाल्यास माहितीही सुरक्षित नसते. पण कार्ड टोकनायझेशनमुळे ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहील. डेटा बँकेकडे असेल आणि ई-कॉमर्स वेबसाइटवर असणार नाही.

गॅस सिलिंडरच्या दरात बदल 

देशातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीचा दरात दरमहिन्याच्या 1 तारखेला बदल होतात. काहीवेळी दर स्थिर राहतात तर कधी यात वाढ किंवा घट होत असते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला आढावा घेत नवे दर जाहीर करतात. यासोबतच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सिलिंडर महाग आणि स्वस्तही असू शकतो. महत्त्वाची बाब अशी की वेगवेगळ्या राज्यांमध्ये करामुळे सिलिंडरची किंमतही वेगवेगळी असते.

अधिक वाचा :  Mumbai Mahalaxmi Temple : नवरात्रौत्सव काळात मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जात आहात? मग वाचा ही बातमी

डीमॅट खाते आणि शेअर्समधील गुंतवणूक

डीमॅट खात्याशी संबंधित ही कामे त्वरीत निकाली काढा. तुम्हीही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल तर काळजी घ्या. तुम्ही या महिन्याच्या अखेरीस म्हणजे शुक्रवारपर्यंत टू फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू न केल्यास, डिमॅट खातेधारकांना त्यांच्या खात्यात लॉग इन करण्यात अडचण येऊ शकते. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) 14 जून रोजी यासाठी परिपत्रक जारी केले होते. बाजार नियामक सेबीने डिमॅट खातेधारकांच्या संरक्षणासाठी हा नियम लागू करण्याची घोषणा केली आहे.

अटल पेन्शन योजनेत मोठे बदल

अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. पुढील महिन्यापासून करदाते अटल पेन्शन योजनेसाठी पात्र असणार नाहीत. वित्त मंत्रालयाने जारी केलेला नवीन आदेश जर एखादा ग्राहक 1 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यानंतर या योजनेत सामील झाला आणि अर्जाच्या तारखेला किंवा त्यापूर्वी प्राप्तिकर भरला असेल तर त्याचे अटल पेन्शन योजना खाते बंद केले जाईल. अटल पेन्शन योजना ही भारत सरकारद्वारे समर्थित आणि PFRDA द्वारे संचालित एक हमी पेन्शन योजना आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी