IPO and FPO Meanning in marathi : IPO आणि FPO म्हणजे काय? यातील फरक जाणून घ्या मराठीत 

know the meaning of IPO and FPO in Marathi : सध्या अदानी ग्रुपच्या FPO रद्द केल्यानंतर सर्व जण IPO आणि FPO बद्दल चर्चा सुरू आहे. सामान्यांना IPO आणि FPO यातील फरक माहिती नाही. आम्ही तुमच्यासाठी या दोघांतील  फरक सांगणार आहोत तेही मराठीत. 

know the meaning of IPO and FPO in Marathi
IPO आणि FPO म्हणजे काय? यातील फरक जाणून घ्या मराठीत  
थोडं पण कामाचं
  • सध्या अदानी ग्रुपच्या FPO रद्द केल्यानंतर सर्व जण IPO आणि FPO बद्दल चर्चा सुरू आहे.
  • सामान्यांना IPO आणि FPO यातील फरक माहिती नाही.
  • आम्ही तुमच्यासाठी या दोघांतील  फरक सांगणार आहोत तेही मराठीत. 

Whats if IPO and FPO Meaning in Marathi, मुंबई : सध्या अदानी ग्रुपच्या FPO रद्द केल्यानंतर सर्व जण IPO आणि FPO बद्दल चर्चा सुरू आहे. सामान्यांना IPO आणि FPO यातील फरक माहिती नाही. आम्ही तुमच्यासाठी या दोघांतील  फरक सांगणार आहोत तेही मराठीत. 

कंपन्यांना आपल्या व्यवसायवाढीसाठी आणि चालू खर्चासाठी भांडवलाची गरज लागते. भांडवल उभे करण्यासाठी कंपन्यांकडे कर्ज घेण्याचा मार्ग असतो. मात्र, कर्ज घेण्यापेक्षा कंपनी आपले शेअर्स विक्रीला काढून भांडवलाची तजवीज करते. ही शेअर्स विक्री करणे म्हणजे पब्लिक इश्यू काढणे. पब्लिक इश्यूचे प्रारंभिक आणि त्यानंतरचा असे दोन भाग पडतात. प्रारंभिक पब्लिक इश्यू म्हणजेच आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर ). त्यानंतरच्या इश्यूला एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) म्हणतात. अदानींच्या FPO मुळे आपण आयपीओ (IPO) आणि एफपीओ (FPO) म्हणजे काय? आणि या मार्गाने गुंतवणूकदारांना शेअर बाजारात कशी गुंतवणूक करता येते हे समजावून घेणार आहोत.

आयपीओ (IPO)

एखाद्या लहान कंपनीचा व्यवसाय चांगला चाललेला असतो. कंपनीला नफाही चांगला मिळत असतो. भविष्यात वाढीची कंपनीला मोठी संधी असते. मात्र, या व्यवसायवाढीसाठी कंपनीकडं पुरेसं भांडवल नसतं. अशावेळी या कंपनीचे प्रवर्तक (प्रमोटर) आपल्या कंपनीचे शेअर्स सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विक्रीस काढतात. हे शेअर्स आयपीओद्वारे विक्रीस काढले जातात. टीव्ही, वृत्तपत्रे, होर्डिंगवर आपण कंपन्यांच्या आयपीओची जाहिरात अनेकदा पाहत असतो. ह्या आयपीओचा कालावधी साधारणत: ४ दिवसांचा असतो. म्हणजे या ४ दिवसात या कंपनीचे शेअर्स विकत घेता येतात. त्यानंतर आयपीओ बंद होतो. त्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप केलं जातं. मग ह्या वाटप केलेल्या शेअर्सची शेअर बाजारात नोंदणी होते. त्याला लिस्टिंग असं म्हणतात. आयपीओ काढणाऱ्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होते. या सर्व प्रक्रियेनंतर हे शेअर्स गुंतवणूकदार शेअर बाजारात हवे तेव्हा विकू शकतात. तसंच इतर गुंतवणूकदारांनाही शेअर बाजारात या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी उपलब्ध होतात. आयपीओ घेण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट असणे आवश्यक आहे.

आयपीओची प्रक्रिया काय असते 

आयपीओची किंमत दोन पद्धतीने ठरवली जाते. एक फिक्स्ड प्राइस म्हणजेच निश्चित किंमत. आणि दुसरी म्हणजे बुक बिल्डिंग पद्धत.

फिक्स्ड प्राइस : यामध्ये कंपनी विक्रीस काढलेल्या शेअरची किंमत आधीच निश्चित करते. त्यामुळे शेअर्स किती रुपयांना विक्रीला आहेत हे गुंतवणूकदारांना समजते. त्यानंतर गुंतवणूकदार या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेतो.

बुक बिल्डिंग : या पद्धतीत शेअर्सचा किंमत पट्टा (प्राइस बँड) निश्चीत केला जातो. या किंमत पट्ट्यामध्ये गुंतवणूकदारांना बोली लावावी लागते. उदा.कंपनीने जर २०० ते २५० रुपये असा किंमत पट्टा निश्चीत केला असेल तर गुंतवणूकदारांना या किमतीदरम्यान बोली लावता येते. इश्यू उघडताना कंपनी शेअर्सची किंमत निश्चित करते. म्हणजे त्या भावाने शेअर्सची विक्री करते. ज्या भावावर सर्व शेअर्स विकले जातील तो भाव कंपनी निश्चित करते.

आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त २ लाख रूपयांपर्यंत शेअर्स खरेदीसाठी बोली लावू शकतो. आयपीओमध्ये लाॅटमध्ये बोली लावावी लागते. उदा. जर कोणत्या आयपीओमध्ये एका लाॅटमध्ये १५ शेअर्स आहेत तर गुंतवणूकदाराला कमीत कमी १५ शेअर्ससाठी बोली लावावी लागते म्हणजे १ लाॅट खरेदी करणं अनिवार्य आहे. त्यानंतर १५ च्या पटीत बोली लावावी लावते.

आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार आणि पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्‍वॉलिफाईड इंस्‍टीट्यूशन बायर्स (क्‍यूआयबी) यांच्यासाठी शेअर्स राखीव ठेवले जातात. १९९९ पासून सर्व आयपीओंचे ५० ते ६० टक्के शेअर क्‍यूआयबीसाठी राखीव ठेवले जातात. क्‍यूआयबी शेअरसाठी जेवढी किंमत निश्चित करते त्‍याला कट ऑफ ऑप्‍शन म्‍हणतात.

एफपीओ (FPO)

आयपीओनंतर कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होती. त्यानंतर काही कालावधीने कंपनीला व्यवसायवाढीसाठी पुन्हा भांडवलाची गरज भासते. अशा वेळी कंपनी पुन्हा आपले शेअर्स विक्रीला काढते. त्यालाच एफपीओ असं म्हणतात. एफपीओमध्ये सहसा प्रवर्तक आपले शेअर्स विकतात. काही वेळेला कंपनी एफपीओमध्ये नवीन शेअर्सही जारी करते. जेव्हा कंपनी शेअर्सची विक्री फक्त आपल्या शेअर होल्डर्सना करते, त्याला राइट इश्यू म्हणतात. एफपीओ नवीन आणि जुन्या गुंतवणूकदारांसाठी असतो. एफपीओमध्ये सहसा स्वस्तात शेअर्स मिळतात. तर किरकोळ गुंतवणूकदारांना एफपीओमध्ये सूट दिली जाते. एफपीओमध्ये गुंतवणूक मोठा नफा मिळवू शकतात. एफपीओ जारी केल्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पहायला मिळतं. अशा वेळी गुंतवणूकदारांना स्वस्तात शेअर खरेदी करता येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी