Gold Price Today: लक्ष द्या! सोनं पुन्हा महागलं, चांदी आजही स्वस्त

काम-धंदा
Updated Mar 18, 2020 | 19:05 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Gold Rate Today: अनेक दिवसांच्या चढ-उतारानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालीय. तर चांदी आजही स्वस्त झाली. जाणून घ्या आजचे सोनं-चांदीचे दर...

Gold, Silver Price Today
सोनं-चांदी आजचे दर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सोन्याचे दर आज वाढले, चांदी मात्र स्वस्तच
  • मंगळवारच्या तुलनेत सोन्याच्या दरात वाढ, दिल्लीत ३११ रुपयांनी सोनं वाढलं
  • शेअर बाजार बंद होतांना मुंबईत सोनं ७०० रुपयांनी वधारलं

नवी दिल्ली: सुस्तावलेली अर्थव्यवस्था, शेअर बाजारातील घसरण आणि कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या या सर्वांचा परिणाम सराफा बाजारावर पडलेला दिसतोय. मागील पाच दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल ५००० रुपयांनी कमी झाले होते. मात्र बुधवारी सराफा बाजार जरा सावरला आणि सोन्याचे दर ३११ रुपयांनी वाढून ४०,२४१ प्रति १० ग्रामवर पोहोचले. मंगळवारी सोन्याचे दर ३९,९३० रुपये प्रति १० ग्राम होते.

एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार देशाची राजधानी दिल्लीमध्ये रुपयाची घसरण आणि वाढलेली खरेदी यामुळे सोन्याच्या दरात वाढ झालीय. असं असलं तरी चांदीचे दर मात्र पुन्हा एकदा कमी झाले आहेत. चांदी ४६८ रुपयांनी कमी होत ३५,९४८ रुपये प्रति किलो झाले. मंगळवारी रात्री बाजार बंद होत असतांना चांदीचे दर ३६,४१६ रुपये प्रति किलो होते.

सीनिअर कमोडिटीज एक्सपर्ट तपन पटेल यांनी सांगितलं की, दिल्लीत २४ कॅरेटसाठी सोन्याचे दर ३११ रुपयांनी वाढले. रुपयामध्ये घसरण झाल्यामुळे भारतात सोन्याच्या किमतीत वाढ झालीय.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी क्रमश: १४९० अमेरिकी डॉलर प्रति औंर आणि यूएस डॉलर १२.३८ प्रति औंस वर व्यवसाय सुरू होता. या दरम्यान घरगुती इक्विटी बाजार कमकुवत राहिला, तिथं बाजार १७०९.५८ अंकांवर बंद झाला.

मुंबईतील आजचे सोनं-चांदी दर

दिल्लीप्रमाणे मुंबईतही सोन्याचे दर मंगळवारच्या तुलनेत आज वाढले. चांदी मात्र स्वस्त झालीय. मुंबईत आज २४ कॅरेट १० ग्राम सोन्यासाठी ४०,९०० रुपये झाले. ७०० रुपयांनी मुंबईत ही दरवाढ झालीय. मंगळवारी संध्याकाळी बाजार बंद होत असतांना सोन्याचे दर ४०,२०० रुपये प्रति १० ग्राम होते.

तर २२ कॅरेटसाठी म्हणजे दागिने आपल्याला आज ३९.९०० रुपये प्रति १० ग्राम या दरानं मिळतील. मंगळवारी हे दर ३९,२०० रुपये प्रति १० ग्राम इतके होते.

मुंबईत चांदीचे दर आज ४१,७८० रुपये प्रति किलो इतके राहिले. मंगळवारी सुद्धा चांदीचे दर मुंबईत ४१,७८० रुपये होते.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला हेच सोनं आणि चांदीचे दर गगनाला भिडले होते. चांदी जवळपास ५० हजाराच्या घरात तर सोनं ४५ हजारांपर्यंत पोहोचलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि कोरोना व्हायरसचा परिणाम यामुळे सोनं-चांदी सध्या स्वस्त झालेलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...