Currency Notes: नोटांवर महात्मा गांधींचा फोटो पहिल्यांदा कधी छापण्यात आला, काय होती त्या नोटेची किंमत?

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Oct 28, 2022 | 20:20 IST

Mahatma Gandhi pics on note: भारतीय नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे चित्र छापलेले आहे, पण हे चित्र पहिल्यांदा कधी छापले गेले हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे का, हे सर्व जाणून घ्या...

know when was picture of mahatma gandhi printed on currency notes for first time what was value of that note
नोटांवर महात्मा गांधींचा फोटो पहिल्यांदा कधी छापण्यात आला? (सौजन्य: iStock) 
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या महात्मा गांधींचं चित्र असलेली पहिली नोट कधी छापली गेली
  • 1969 साली गांधीजींचे चित्र असलेल्या 100 रुपयांच्या नोटा आल्या चलनात
  • गांधीजींचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट 1987 साली आली बाजारात

Currency Notes and Mahatma Gandhi: मुंबई: भारतीय नोटांवर (Currency Notes) लक्ष्मी मातेचा आणि गणपतीचा फोटो असावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केल्यानंतर या विषयाला वेगळंच राजकीय वळण लागलं. केजरीवालांच्या या मागणीनंतर भाजप नेत्यांनी भारतीय नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असावे अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे आणि राम कदम यांनी केली होती. मात्र, असं असलं तरीही नोटांवर फक्त महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचाच फोटो राहणार असल्याचं रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट केलं आहे. (know when was picture of mahatma gandhi printed on currency notes for first time what was value of that note)

रिझर्व्ह बँकेने पहिल्यांदा 1969 साली गांधीजींचे चित्र असलेल्या 100 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या. त्यावर्षी महात्मा गांधींचं ते जन्मशताब्दी वर्ष होतं, म्हणजेच, महात्मा गांधींच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे चित्र नोटांवर छापण्यात आले होते. गांधीजींचा फोटो सगळ्यात आधी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 आणि 100 रुपयांच्या नोटांवर छापण्यात आला होता.

अधिक वाचा: पैसे ठेवताना आणि मोजताना चुकूनही करू नका ही चूक, व्हा सावध; नाहीतर लक्ष्मी मातेचा होईल कोप

यामध्ये गांधीजी सेवाग्राममध्ये बसलेले दिसत आहेत, तिथलाच हा फोटो  1 रुपयाच्या नोटेवर छापण्यात आला होता. नंतर ऑक्टोबर 1987 मध्ये 500 रुपयांची नोट बाजारात आली, म्हणजेच गांधीजींचे सध्याचे चित्र असलेल्या चलनी नोटा 1987 मध्ये पहिल्यांदा दिसल्या.

ऑक्टोबर 1987 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांची नोट जारी केली, ज्यामध्ये गांधीजींच्या हसतमुख फोटो (Smiling Potrait) छापण्यात आला होता.

अधिक वाचा: Currency Note : 500 रुपयांसंदर्भात मोठे अपडेट, गांधीजींच्या चित्राजवळ हिरवी पट्टी असल्यास नोट नकली आहे का?

यानंतर गांधीजींचे हे चित्र इतर चलनी नोटांवरही वापरले जाऊ लागले, 1996 पासून महात्मा गांधींचे चित्र असलेल्या नव्या नोटा या चलनात आल्या. ज्यामध्ये अशोक स्तंभाऐवजी राष्ट्रपिता महात्माजींचा फोटो होता. नोटेच्या डाव्या बाजूच्या खालील भागात महात्मा गांधी आणि अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात आला होता.

18 नोव्हेंबर 2000 रोजी महात्मा गांधींच्या फोटोसह 500 रुपयांच्या नव्या नोटाही जारी करण्यात आल्या, तर 9 ऑक्टोबर 2000 रोजी नव्या सीरीजमधील महात्मा गांधींच्या फोटोसह 1000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या.


अधिक वाचा: Currency Note : नोटा आणि नाण्यांवर काय छापावे याचा निर्णय कोण घेते…पाहा 5 मुद्दे

भारतीय चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीच्या प्रतिमा छापण्याचा आग्रह

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय चलनी नोटांवर भगवान गणेश आणि लक्ष्मीच्या प्रतिमा छापाव्यात असे आवाहन केले आहे. नव्या नोटांवर एका बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला भगवान गणेश आणि लक्ष्मी यांचे चित्र छापता येईल, असे ते म्हणाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी