LPG Gas Subsidy: अनुदानाचे पैसे आपल्याला मिळत आहेत की नाही, जाणून घ्या घरी बसल्या बसल्या

LPG Price Latest Today : सरकारकडून प्रत्येक उपभोक्त्याला एका वर्षात 14.2 किलोग्रॅमच्या 12 सिलेंडरवर अनुदान म्हणजेच सबसिडी दिली जाते. ही सबसिडी आपल्याला मिळत आहे की नाही हे घरबसल्या जाणून घ्या.

LPG gas cylinder
अनुदानाचे पैसे आपल्याला मिळत आहेत की नाही, जाणून घ्या घरी बसल्या बसल्या  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहेत गॅसच्या किंमती
  • गॅसच्या अनुदानाचे पैसे आपल्या खात्यात येत आहेत की नाही?
  • जाणून घ्या सबसिडीबाबत माहिती घेण्याची प्रक्रिया

LPG Gas Subsidy: सरकारकडून (Government) प्रत्येक उपभोक्त्याला (consumer) एका वर्षात 14.2 किलोग्रॅमच्या 12 सिलेंडरवर (cylinder) अनुदान म्हणजेच सबसिडी (subsidy) दिली जाते. जर ग्राहकांना यापेक्षा जास्त म्हणजे 7 किंवा त्यापेक्षा जास्त सिलेंडर घ्यायचे असतील तर त्यांना अधिक किंमत (more cost) मोजावी लागते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री (central petroleum minister) धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी दिलेल्या माहितीनुसार याची किंमत (cost) आणि सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क (average international benchmark) आणि परदेशी विनिमय दरांमधील (foreign expenditure value) बदलांनुसार ठरते. यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये महागाई (price hikes) वाढली होती. आता सरकार हे दर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. ही गॅसवरील सबसिडी आपल्याला मिळत आहे की नाही हे घरबसल्या जाणून घ्या.

गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहेत गॅसच्या किंमती

एलपीजी गॅस म्हणजे स्वयंपाकघरातील गॅस उपभोक्त्यांना गेल्या काही महिन्यांपासून एकावर एक झटके मिळाले आहेत. गॅसच्या किंमती सतत वाढत आहेत. 1 डिसेंबर 2020च्या तुलनेत स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर 215 रुपयांनी महागला आहे. यादिवशी याची किंमत 594 रुपयांवरून 644 रुपये झाली होती. यानंतर 1 जानेवारी रोजी 694 रुपये, 4 फेब्रुवारी रोजी 719 रुपये, 15 फेब्रुवारी रोजी 794 रुपये आणि नंतर 1 मार्च रोजी 819 रुपये झाली होती. आता 1 एप्रिलपर्यंत ही किंमत 10 रुपयांनी कमी होऊन दिल्लीत 809 रुपयांवर आली आहे.

गॅसच्या अनुदानाचे पैसे आपल्या खात्यात येत आहेत की नाही?

सध्या आपल्या खात्यात गॅसच्या सबसिडीचे पैसे येत आहेत की नाही? गेल्या काही महिन्यांपासून अशा बातम्या आल्या होत्या की काही उपभोक्त्यांच्या गॅस सबसिडीचे पैसे कुणा वेगळ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा झाले आहेत. अशा परिस्थितीत आपल्या खात्यात नियमित सबसिडी येत आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला बँकेत जाण्याचीही गरज नाही. आपण घरबसल्या याची माहिती घेऊ शकता.

जाणून घ्या सबसिडीबाबत माहिती घेण्याची प्रक्रिया

आपल्या स्मार्टफोनच्या ब्राऊजरमध्ये सर्वप्रथम Mylpg.in या संकेतस्थळावर जा. इथे होमपेजवर तीन एलपीजी सिलेंडर कंपन्यांचा टॅब फोटोंसह दिलेल. आपली कंपनी निवडा. नंतर आपले तपशील आणि आयडी भरा. हा आयडी आपल्या गॅस कंपनीकडून मिळालेल्या पुस्तकावर आपल्याला दिसेल. यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल ज्याद्वारे आपल्याला त्या कंपनीच्या संकेतस्थळावर जाता येईल. तिथून आपण आपल्या उपभोक्ता तपशिलांच्या लिंकवर क्लिक करून आपल्या अनुदानाची प्रक्रिया आणि आपले पैसे आपल्या खात्यात आले आहेत की नाही हे जाणून घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी