Cheapest Home Loan | कमी व्याजदरात होम लोन हवंय? मग या बँका देतायेत सर्वात कमी व्याजदरात होम लोन

Home Loan Interest Rates : गृहकर्जाद्वारे (Home Loan) घर खरेदी करणे आता महाग होणार आहे. कारण बॅंकांकडून गृहकर्जाच्या व्याजदरात (Home Loan Interest Rates) वाढ करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अशावेळी स्वस्तात गृहकर्ज देणाऱ्या बॅंकांविषयी जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) रेपो रेट 40 बेसिस पॉईंटने (Repo rate)(1% = 100 बेस पॉइंट) वाढवत 4.40% टक्के केला आहे. यानंतर अनेक बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर वाढवले ​​आहेत.

Lowest Home Loan Interest Rates
स्वस्तात गृहकर्ज देणाऱ्या बॅंका 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने बॅंकांच्या व्याजदरात वाढीला सुरूवात
  • बॅंकांची कर्जे होणार महाग, गृहकर्जावरील व्याजदरात वाढ
  • स्वस्तात होम लोन देणाऱ्या बॅंका जाणून घ्या

Lowest home loan interest rates : नवी दिल्ली : गृहकर्जाद्वारे (Home Loan) घर खरेदी करणे आता महाग होणार आहे. कारण बॅंकांकडून गृहकर्जाच्या व्याजदरात (Home Loan Interest Rates) वाढ करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अशावेळी स्वस्तात गृहकर्ज देणाऱ्या बॅंकांविषयी जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने(RBI) रेपो रेट 40 बेसिस पॉईंटने (Repo rate)(1% = 100 बेस पॉइंट) वाढवत 4.40% टक्के केला आहे. त्याचबरोबर कॅश रिझर्व्ह रेशन (CRR) 50 बेस पॉईंट्सने 4.5% पर्यंत वाढवल्यानंतर अनेक बँकांनी गृहकर्जावरील व्याजदर वाढवले ​​आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाच एका महत्त्वाच्या बैठकीत आरबीआयने हा निर्णय घेतला. बॅंकांचे रिझर्व्ह बॅंकेकडे असणारी राखीव भांडवल वाढवून बाजारातील जवळपास 82,000-8,7000 कोटी रुपयांची जादा रोख रक्कम बँकिंग प्रणालीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर चिंता करण्याची शक्यता नाही. परंतु रेपो दरांमध्ये वाढ झाल्यामुळे बँका आणि बिगर बँकिंग बॅंकांवर पुन्हा लक्ष केंद्रीत झाले आहे. आता बॅंकाकडून गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ होत आहेत. याचा फटका गृहकर्जाद्वारे घर खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. ग्राहकांच्या होम लोनच्या ईएमआयमध्ये(EMI) वाढ होणार आहे. अर्थात मुदतठेवींवरील व्याजदरदेखील वाढणार आहेत. (Know which banks are giving home loan at lowest rate)

अधिक वाचा : Mother's Day 2022: या 'मदर्स डे' ला, आईला द्या या 5 'अर्थ'पूर्ण भेट, तिचे म्हातारपण होईल सुखाचे...

बहुतेक बँका रेपो रेट त्यांचा बाह्य बेंचमार्क म्हणून वापरतात त्यामुळे रेपो दरात वाढ झाल्याने व्याजदरही वाढतात. बँका दर तीन महिन्यांनी एकदा त्यांचे बाह्य बेंचमार्क-आधारित कर्जाचे दर संतुलित करतात.

महागाई नियंत्रणाचा आरबीआयचा प्रयत्न

रेपो रेट (Repo Rate)किंवा इतर बेंचमार्कशी निगडीत विद्यमान कर्जदारांसाठीचे व्याजदर पुढील रिसेटच्या तारखेपर्यंत स्थिर राहतील. रेपो दर वाढीमुळे निश्चित दराने जारी केलेल्या कोणत्याही कर्जावर परिणाम होणार नाही. बर्‍याच अर्थशास्त्रज्ञांना येत्या काही महिन्यांत रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये आणखी 100 बेसिस पॉइंट वाढीची अपेक्षा आहे. कारण आरबीआयसमोर (RBI) वाढलेल्या महागाईला नियंत्रित करण्याचे आव्हान आहे आणि आरबीआय महागाई (Inflation)कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या देशातील महागाई RBI च्या 4-6% च्या कम्फर्ट बँडच्या बाहेर आहे. यापुढे आणखी बँका व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे सध्याच्या आणि संभाव्य कर्जदारांच्या ईएमआयमध्ये ( EMI)वाढ होणार आहे. अनेक बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांकडून आता ग्राहकांना अधिक व्याजदरात कर्जे दिली जाणार आहेत. अर्थात बॅंकांमधील मुदतठेवींवरदेखील आता अधिक व्याज मिळणार आहे.

अधिक वाचा : Cinema Halls | ग्राहकांकडून जास्त पैसे घेणे सिनेमागृहाला पडले महागात... 60 रुपयांसाठी मोजावे लागणार 40 हजार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

व्याजदराचे चक्र बदलत असताना, सध्या बाजारात सर्वात कमी दर देणार्‍या बँकांवर एक नजर टाकूया.

सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देणाऱ्या 5 बॅंका-

बँक                                             RRLR        किमान दर             कमाल दर
बँक ऑफ महाराष्ट्र                         6.8%          6.4%                    7.38%
पंजाब आणि सिंध बँक                     6.6%          6.5%                    7.35%
बँक ऑफ इंडिया                           6.85%        6.5%                    8.2%
पंजाब नॅशनल बँक                         6.5%          6.5%                   7.35%
कोटक महिंद्रा बँक                         6.6%          6.6%                    7.1%

अधिक वाचा : Interest rates | व्याजदरातील वाढ होण्यास सुरूवात... आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने बॅंकांनी वाढवले व्याजदर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी