ITR Filing: प्राप्तिकर विवरणपत्राची शेवटची तारीख, नेमका किती कर भरावा आणि कर नियोजन कसे करावे, जाणून घ्या

Tax Planning : प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची (ITR Filing) शेवटची तारीख जवळ येत आहे. प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. शेवटची तारीख संपल्यानंतर, तुम्हाला दंड देखील भरावा लागेल आणि नोटीस देखील मिळू शकते. त्यामुळे त्वरित प्राप्तिकर विवरणपत्र भरून हे काम मार्गी लावा. अर्थातच आयटीआर भरताना तुम्ही इन्कम टॅक्सच्या कोणत्या स्लॅबमध्ये येता हे लक्षात घेऊन कर नियोजन (Tax Planning) करणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

ITR Filing & Tax Planning
आयटीआर भरणे आणि कर नियोजन 
थोडं पण कामाचं
  • ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे.
  • कर नियोजन करण्यापूर्वी, तुम्ही नेमका किती कर भरला पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
  • तुमच्या कर बचत पर्यायाच्या वार्षिक दराबाबत नेहमी अपडेट रहा.

ITR Filing & Tax Planing : नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची (ITR Filing) शेवटची तारीख जवळ येत आहे. प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. शेवटची तारीख संपल्यानंतर, तुम्हाला दंड देखील भरावा लागेल आणि नोटीस देखील मिळू शकते. त्यामुळे त्वरित प्राप्तिकर विवरणपत्र भरून हे काम मार्गी लावा. अर्थातच प्राप्तिकर विवरणपत्र भरताना तुम्ही इन्कम टॅक्सच्या कोणत्या स्लॅबमध्ये येता, तुम्ही नेमका किती प्राप्तिकर देणे लागता याबद्दलची माहिती घेणे महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर कर नियोजन (Tax Planning) करणेदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. कर नियोजन केल्याशिवाय तुमचे आर्थिक नियोजन पूर्णच होणार नाही. (Last date for ITR filing is close, mistakes to avoided in tax planning)

अधिक वाचा : ITR Filing : 31 जुलैपूर्वी भरा प्राप्तिकर विवरणपत्र...सरकार म्हणतंय मुदत वाढणार नाही

जर तुम्ही चालू आर्थिक वर्षासाठी अद्याप कर नियोजन केले नसेल, तर तुम्ही शेवटच्या क्षणी असे करत असाल. कर नियोजन ही वर्षभर चालणारी क्रिया असली तरी आर्थिक वर्ष संपल्यावरच अनेकांना याची जाणीव होते. शेवटच्या क्षणी कर नियोजनातही चुका होण्याची शक्यता असल्याने ही पद्धत चुकीची आहे. चला जाणून घेऊया अशाच काही चुका, ज्या टाळल्या पाहिजेत.

द्यावा लागणाऱ्या कराची यादी तयार करा

कर नियोजन करण्यापूर्वी, तुमची कर दायित्व काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कर दायित्वांबद्दल जाणून घेण्यासाठी, सर्वप्रथम तुमचे एकूण उत्पन्न आणि तुमचा कर स्लॅब जाणून घेणे महत्त्वाचे आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत - पगार, व्यवसाय, ठेवींवर व्याज, स्टॉक किंवा म्युच्युअल फंड विकून भांडवली नफा, भेटवस्तू इ. तथापि, प्रत्येक उत्पन्न करपात्र नाही.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 23 July 2022: सोन्याच्या भावात 16 महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून वाढ, सोने खरेदी करावी का? भाव कुठपर्यत पोचणार...

गुंतवणूक परतावा

तुमच्या कर बचत पर्यायाच्या वार्षिक दराबाबत नेहमी अपडेट रहा. त्या पर्यायाबद्दल सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीशी ते जुळण्याची खात्री करा. परताव्याबद्दल जाणून घेतल्यास, त्यात गुंतवणूक करून कर वाचवणे किती उपयुक्त आहे हे तुम्हाला समजेल. हा पर्याय फायदेशीर आहे की नाही, की अन्य पर्यायाकडे वळण्याची गरज आहे.

आयुर्विमा

आयुर्विमा हा आर्थिक नियोजनातील आणि कर नियोजनातील महत्त्वाचा मुद्दा आहे. कर वाचवण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यात विमा समाविष्ट आहे. तथापि, केवळ करबचतीच्या उद्देशाने पॉलिसी खरेदी केल्याने पुरेसे आयुर्विमा संरक्षण मिळत नाही आणि गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळत नाही. म्हणूनच आयुर्विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, तुमच्या कुटुंबाच्या गरजेनुसार कव्हरेज शोधण्याचा प्रयत्न करा.

अधिक वाचा : Banking, Bank Holiday : ऑगस्ट २०२२ मध्ये भारतात १३ दिवस बँका बंद राहणार

केवळ कर वाचवण्यावर लक्ष केंद्रित करणे हानिकारक 

कर नियोजन करताना, फक्त करबचतीवर लक्ष केंद्रित केल्याने आणि गुंतवणुकीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा निधी ब्लॉक होईल. आर्थिक उद्दिष्टे, संपत्ती निर्मिती, आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी रोख रकमेची उपलब्धता आणि पुरेसा आरोग्य आणि आयुर्विमा या चांगल्या कर बचत योजनेसोबत आवश्यक आहेत. तसेच, अटी व शर्ती, जोखीम, लॉक-इन कालावधी आणि गुंतवणुकीचे शुल्क वाचल्याशिवाय कोणत्याही गुंतवणूक फॉर्मवर स्वाक्षरी करू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी