Edible Oil | नवी दिल्ली : हिवाळ्यात तेलाच्या मागणीत वाढ होत असतानादेखील मागील आठवड्यात देशातील प्रमुख बाजारात सोयाबीन, मोहरी, सीपीओ आणि पामोलीनसह बहुतांश खाद्यतेलांचे (Edible Oil) भाव कमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार खाद्य तेलाच्या भावात घसरण झाली आहे. सोयाबीनच्या भावात घसरण झाली आहे. बाजारात अचानक खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे तेल उद्योग, शेतकरी आणि तेल आयातदार अडचणीत आले आहेत. (Last week prices of most of the Edible oil fall)
व्यापाऱ्यांना तेलबिया जास्त किंमतीवर खरेदी करावे लागत आहेत. बाजारात आयात केलेल्या स्वस्त तेलांचे भाव कमी आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना आपला माल स्वस्तात विकावा लागतो आहे. तेल आयातदारांसह व्यापाऱ्यांना यामुळे नुकसान सहन करावे लागते आहे. त्यांचे म्हणणे आहे की परदेशातून आयात केल्यावर सीपीओ नफ्यासह १११ रुपयांना पडते. तर बाजारात सध्या याचा भाव १०८ रुपये प्रति किलो आहे. पामोलीनच्या बाबतीतदेखील हीच परिस्थिती आहे. इथे खर्चापेक्षा बाजारभाव ४-५रुपये प्रति किलो जास्त आहे. खाद्यतेलाच्या व्यवसायातील या प्रकारांमुळे कपाशीच्या तेलाच्या ५० टक्के मिल बंद झाल्या आहेत.
वायदा बाजारात तेलाचे भाव खालच्या पातळीवर आहेत. काही काळापूर्वी स्टॉक करण्यावर मर्यादा असल्याने व्यापारी, खाद्य तेलाच्या मिल आणि शेतकरी यांनी मोहरीचा स्टॉक कमी केला होता. यामुळे मोहरीच्या तेलाच्या भावात घसरण झाली आहे. मोहरीची उपलब्धता कमी झाली आहे. मोहरीचे पुढील पीक येण्यास अजून दोन अडीच महिन्यांचा वेळ आहे. शेतकऱ्यांना मोहरीचा चांगला भाव मिळाल्यामुळे यंदाच्या हंगामात मोहरीची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीपीओ आणि पामोलीनच्या आयातदारांना प्रति किलो ३ ते ४ रुपयांचे नुकसान सहन करावे लागते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात महाग झाल्यामुळे आणि हिवाळ्यात मागणी घटल्यामुळे सीपीओ आणि पामोलीन तेलाच्या भावात घसरण झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरलेल्या आठवड्यात मोहरीच्या दाण्यांचा भाव ३०० रुपयांच्या घसरणीसह ८,५०० ते ८,५२५ रुपये प्रति क्विंटल इतका होता. मागील आठवड्यात हाच भाव ८,८००- ८,८२५ रुपये प्रति क्विंटल होता. मोहरीच्या तेलात घट झाली आहे. मोहरीच्या तेलात ७५ रुपयांची घसरण प्रति टन झाली आहे. सोयाबीन तेलातदेखील १७५ रुपयांची घसरण प्रति क्विंटल झाली आहे. सोयाबीनच्या भावातदेखील घसरण झाली आहे.
शेंगदाण्याचे नवे पीक आल्याने राजस्थान आणि गुजरात येथील बाजारात आवक वाढली आहे. त्याचा परिणाम होत शेंगदाण्याचा भावात घसरण झाली आहे. मागणीमुळे प्रभावित झाल्यामुळे पाम तेल म्हणजे सीपीओचा भाव २३० रुपयांच्या घसरणीसह १०,७५० रुपये प्रति क्विंटलवर बंद झाला होता.
कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर अर्थव्यवस्था आणि बाजारातील चढउतारांमुळे खाद्यतेलाचे भाव मागील काही महिन्यांपासून चांगलेच कडाडले आहेत. खाद्य तेलाच्या भावाचा सर्वसामान्य माणसांच्या बजेटवर थेट परिणाम होतो.