Diwali 2022: या बँकांमध्ये मिळतायेत स्वस्त व्याजदरात कर्जे...पाहा जबरदस्त ऑफर्स

Bank Loan : बहुतांश लोक घर असो की कार यासारख्या महागड्या गोष्टी दिवाळीतच खरेदी करतात. कारण दिवाळीतील खरेदी शुभ मानली जाते. दिवाळीत अनेक ऑफर्सचीदेखील रेलचेल असते. अर्थात घर किंवा वाहन खरेदी करायचे म्हटले की मोठ्या रकमेची आवश्यकता असते. यामध्ये बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक (HDFC bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर अनेक बँकांनी ऑफर्स दिल्या आहेत.

Bank Offers
बॅंक ऑफर्स 
थोडं पण कामाचं
  • दिवाळीत शॉपिंगची धामधूम
  • घर आणि कारसारख्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य
  • बॅंकांकडून दिवाळीत कर्जावर मोठ्या ऑफर्स

Bank Loan Offer : नवी दिल्ली : दिवाळीसारखा सण म्हटला की खरेदी ही आलीच. सोने खरेदीपासून ते कपडे आणि वाहनांपर्यत सर्वच प्रकारच्या खरेदीला दिवाळीत (Diwali 2022) प्राधान्य दिले जाते. बहुतांश लोक घर असो की कार यासारख्या महागड्या गोष्टी दिवाळीतच खरेदी करतात. कारण दिवाळीतील खरेदी शुभ मानली जाते. दिवाळीत अनेक ऑफर्सचीदेखील रेलचेल असते. अर्थात घर किंवा वाहन खरेदी करायचे म्हटले की मोठ्या रकमेची आवश्यकता असते. त्यामुळे मग कर्ज (Loan)घेऊन या वस्तू घेतल्या जातात. यंदा बॅंकांनीदेखील विविध ऑफर्स (Bank Offers) आणल्या आहेत. अनेक बॅंका कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक (HDFC bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि इतर अनेक बँकांनी मर्यादित कालावधीसाठी विविध प्रकारच्या कर्जाच्या ऑफर्स बाजारात आणल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया. (Leading banks are offering loan at cheaper rate this Diwali 2022)

अधिक वाचा : Pune : रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, दिवाळीला गावी निघालेल्या प्रवाशाचा चेंगराचेंगरीत मृत्यू

वेगवेगळ्या बॅंका किती व्याजदरात कर्ज देतायेत ते पाहूया-

स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)
देशातील सर्वात मोठी बॅंक असलेली स्टेट बॅंक 8.4 टक्के प्रतिवर्ष व्याजदराने गृहकर्ज आणि 8.8 टक्क्यांपासून सुरू होणारी टॉप-अप कर्जे देते आहे. ऑफर अंतर्गत या कर्जावरील प्रक्रिया शुल्क दिवाळीच्या या हंगामात माफ करण्यात आले आहे.

बँक ऑफ बडोदा
ही देखील सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बॅंक आहे. बँक ऑफ बडोदा ग्राहकांना वार्षिक 8.45 टक्के व्याजदराने गृहकर्ज देते आहे. तर बॅंक 8.45 टक्के वार्षिक व्याजदराने कार लोन देते आहे. यात महत्त्वाचे म्हणजे कार लोनवर कोणतेही फोरक्लोजर शुल्क नाही.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील आघाडीची बॅंक आहे. एचडीएफसी बॅंक ग्राहकांना वार्षिक 7.9 टक्के व्याजदराने कार लोन देते आहे. सध्या कर्जाचा 50% कालावधी (किमान 24 महिने) पूर्ण झाल्यानंतर कोणतेही फोरक्लोजर शुल्क नाही. तर बॅंक गोल्ड लोनवर प्रोसेसिंग फीमध्ये 50% सूट देते आहे. शिवाय क्रेडिट कार्डवरील कर्जासाठी 999 रुपये फ्लॅट फी आहे.

अधिक वाचा : राणेंच्या संपर्कात असलेले ठाकरे गटातील ते 4 आमदार कोण?

आयसीआयसीआय बँक
हीदेखील देशातील आघाडीची खासगी क्षेत्रातील बॅंक आहे. आयसीआयसीआय बॅंक सध्या त्यांच्या ग्राहकांना पूर्व-मंजूर गृहकर्ज आणि शिल्लक हस्तांतरण सुविधा देते आहे. शिवाय सध्या प्रक्रिया शुल्क 999 रुपये आहे. कार लोनवर बॅंक 1,999 रुपये प्रक्रिया शुल्क आकारते आहे. याचबरोबर नवीन कार कर्जावर ऑन-रोड किंमतीच्या 100% पर्यंत कर्जाची रक्कम देते आहे. कार कर्जावर कोणतेही फोरक्लोजर आणि प्रीपेमेंट शुल्क सध्या बॅंकेकडून आकारले जात नाही.

पीएनबी
पंजाब नॅशनल बॅंकदेखील दिवाळीच्या काळात ऑफर्स देते आहे. बॅंक सध्या PNB फेस्टिव्हल बोनान्झा ऑफर 2022 चालवते आहे. या योजनेअंतर्गत, गृह कर्ज तसेच कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ऑफर अंतर्गत वार्षिक 7.50 टक्के दराने गृहकर्ज देते आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडियाने या सणासुदीच्या हंगामात ऑफर्स देताना गृह आणि कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.

अधिक वाचा :Rain alert : ऐन दिवाळीत या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस, राज्यात हवामान खात्याचा अलर्ट

बँक ऑफ महाराष्ट्र
ही सार्वजनिक क्षेत्रातील आघाीची बॅंक आहे. बँक ऑफ महाराष्ट्र वार्षिक 8.30 टक्के व्याजदराने गृहकर्ज आणि 8.70 टक्के व्याजदराने कार कर्ज देते आहे. बँकेने प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.

इंडसइंड बँक
इंडसइंड बँक सात वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी कार लोन देते आहे. या सणासुदीच्या हंगामात कार खरेदी करण्यासाठी बँक 100% पर्यंत वित्तपुरवठा करते आहे. कार लोन घेताना बँका साधारणपणे 80-85% पर्यंत वित्तपुरवठा करण्यास प्राधान्य देतात. त्याचबरोबर ऑफरअंतर्गत बॅंक गृहकर्जासाठी 30 वर्षांपर्यंत दीर्घ कालावधीची सवलत देते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी