Lemon Price | लिंबू देता का हो कोणी लिंबू! 400 रुपये प्रति किलो झाल्याने लिंबू पाणी झाले श्रीमंतांचे पेय...सोने झाले स्वस्त, लिंबू महाग

Inflation : एरवी घरोघरी सहजपणे उपलब्ध असणारा लिंबू (Lemon) आता दुर्मिळ वस्तू झाला आहे. लिंबू पाणी (Lemon water)हे उन्हाळ्यात सामान्य माणसाचे थंड पेय मानले जाते. मात्र आता लिंबूचे भाव (Lemon price Hike) गगनाला भिडल्याने साधे लिंबू पाणी हे श्रीमंतांचेच पेय बनले आहे. मागील काही दिवसात सर्वत्रच लिंबूच्या भावात प्रचंड वाढ होत तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

Rising prices of Lemon
लिंबाचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर 
थोडं पण कामाचं
  • मंगळवारी देशाच्या काही भागात लिंबाचा दर प्रतिकिलो ३४० रुपये होता.
  • बुधवारी 24 तासांत लिंबाचा दर 60 रुपयांनी वाढला.
  • जयपूरमध्ये तर एक लिंबू 30 रुपयांना विकला जात आहे.

Lemon Price Hike : नवी दिल्ली : एरवी घरोघरी सहजपणे उपलब्ध असणारा लिंबू (Lemon) आता दुर्मिळ वस्तू झाला आहे. लिंबू पाणी (Lemon water)हे उन्हाळ्यात सामान्य माणसाचे थंड पेय मानले जाते. मात्र आता लिंबूचे भाव (Lemon price Hike) गगनाला भिडल्याने साधे लिंबू पाणी हे श्रीमंतांचेच पेय बनले आहे. मागील काही दिवसात सर्वत्रच लिंबूच्या भावात प्रचंड वाढ होत तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.  बुधवारी जयपूरमध्ये तर लिंबू सुमारे 400 रुपये किलो या भावाने विकले गेले. तर मंगळवारी जयपूरमध्ये लिंबाचा दर प्रति किलो 340 रुपये होता. तो बुधवारी 24 तासांत 60 रुपयांनी वाढला. (Lemon price reached at Rs 400 per Kg, Lemon water becomes an elite drink in summer)

अधिक वाचा : Gold Price Today | विक्रमी पातळीवरून स्वस्त झाले सोने...सोने खरेदीची जबरदस्त संधी...पाहा आजचा भाव

लिंबू पाणी झाले दुर्मिळ

एका भाजी विक्रेत्याने सांगितले की, "लिंबूचे मर्यादित उत्पादन झाले आहे आणि त्यामुळे येथे लिंबाचा पुरवठा मर्यादित आहे. त्यातच डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने इतर राज्यांतून होणाऱ्या लिंबाच्या सामान्य पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे लिंबूच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे." सध्या जयपूरमध्ये एक लिंबू 30 रुपयांना विकले जात आहे. मध्यमवर्गीयांसाठी ही प्रचंड अडचणीची बाब ठरते आहे. कारण बहुतांश सर्वसामान्य नागरिकांना दुपारी लिंबू पाणी पिण्याची सवय आहे. तापमान जेव्हा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाते तेव्हा लिंबू पाण्याचा मोठा आधार असतो.

अधिक वाचा : CNG Price Hike : मुंबईत सीएनजी महागला वॅट कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला

लिंबू आवाक्याबाहेर

देशात सर्वत्रच लिंबांच्या भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते आहे. पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला आहे. येथील तापमान 40 अंशांच्या आसपास आहे. अशा उष्ण वातावरणात 400 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या लिंबांनी आम्हाला मोठा धक्का दिला आहे, असे बुधवारी भाजी घेण्यासाठी गेलेल्या गृहिणीने सांगितले. सगळ्यांनाच पेट्रोल-डिझेलच्या किमतींची चिंता वाटत आहे. भाजीपाला इतक्या महाग झाला आहे की तो आवाक्याबाहेर गेला आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

अधिक वाचा :  Indian Railway Update | रेल्वे प्रवाशांना दणका...'या' ट्रेनचे भाडे वाढणार ५० रुपयांनी! जाणून घ्या तपशीलवार माहिती

अचानक मोठी भाववाढ

भाजी विक्रेते म्हणाले, "वाढत्या तापमानामुळे लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांपर्यंत लिंबाचा दर 140 ते 150 रुपये किलो होता. मात्र तो अचानक 220 ते 400 रुपये किलोपर्यंत पोचला आहे.'' पारा चढल्याने लोकांनी लिंबाचा अधिक वापर करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांच्या दरात मोठी झेप आहे. स्थानिक मंडईंमध्ये दुकानदार ३० रुपये किंमतीचे एक किंवा दोन लिंबू देत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लिंबांची मागणी वाढली आहे.

इंधन दरवाढीमुळे भाववाढ

उन्हाळी हंगामात भाजीपाल्यांच्या दरात वाढ होत असल्याचे स्थानिक मंडईतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र यावेळी लिंबाच्या किंमतीत वाढ होण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत. याचे सर्वात मोठे कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ असल्याचे मानले जात आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली असून भाजीपाल्याचे दरही वाढताना दिसत आहेत. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा लिंबू पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. आता उन्हाळ्यात लिंबांना मागणी असते, त्यामुळे भाव वाढले असून पुरवठा कमी राहतो.

मध्यमवर्गीयांना केवळ लिंबूच त्रास देतो आहे असे नाही तर महामारीच्या काळात चहाबरोबर लागणारे 'आले' देखील 80-100 रुपये किलोने विकले जात आहे. तसेच, भेंडी, इतर भाज्या इत्यादि तितक्याच महागड्या दराने मिळतायेत आणि 120 रुपये प्रति किलो दरावर पोचल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी