एलआयसीचा सर्वात स्वस्त प्लॅन, दरमहिना ५०० रुपये भरा, मिळवा २ लाख रुपये

काम-धंदा
Updated Apr 20, 2021 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

ज्या कुटुंबांचे उत्पन्न मर्यादित किंवा कमी आहे, तर त्यांच्यासाठी एलआयसीची ही पॉलिसी म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. अशाच कुटुंबांसाठी किंवा लोकांसाठी एलआयसीची एक योजना आहे जिचे नाव आहे 'आधार स्तंभ'.

Best  LIC Plan for low income group
कमी उत्पन्नगटातील नागरिकांसाठी एलआयसीची आधारस्तंभ 

थोडं पण कामाचं

  • एलआयसीची आधार स्तंभ पॉलिसी
  • एलआयसी आधारशिला पॉलिसी
  • कमी उत्पन्नगटातील नागरिकांसाठी पर्याय

नवी दिल्ली : एलआयसीची पॉलिसी घेतल्याला २० वर्षे पूर्ण होण्यादरम्यान जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना किंवा नॉमिनीला १.५ लाख रुपये मिळतात. शिवाय लॉयल्टी अॅडिशनदेखील मिळते. अर्थात ते पॉलिसी किती कालावधीसाठी सुरू होती यावर अवलंबून असेल.

ज्या कुटुंबांचे उत्पन्न मर्यादित किंवा कमी आहे, ज्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने नुकताच कमाई करण्यास सुरूवात केली आहे, तर त्यांच्यासाठी एलआयसीची ही पॉलिसी म्हणजे एक उत्तम पर्याय आहे. अशाच कुटुंबांसाठी किंवा लोकांसाठी एलआयसीची एक योजना आहे जिचे नाव आहे 'आधार स्तंभ'. ही पॉलिसी फक्त पुरूषांसाठीच आहे. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ऑटो कव्हरची सुविधा आहे. पॉलिसी घेण्यसाठी मेडिकल टेस्टचीदेखील आवश्यकता नाही. या पॉलिसीत किमान ७५,००० रुपयांचा परतावा मिळतो.

फक्त पुरूषांसाठीच पॉलिसी

ही पॉलिसी फक्त पुरूषांसाठीच आहे कारण महिलांनासुद्धा जर अशीच कमी पैशांची पॉलिसी घ्यावयाची असेल तर त्यांच्यासाठी एलआयसीची आधारशिला पॉलिसी आहे. आधार स्तंभ पॉलिसी छोटी आहे आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. यामध्ये अशा काही खास सुविधा आहेत ज्या इतर पॉलिसीमध्ये नाहीत.

कोण घेऊ शकतो पॉलिसी


आधार स्तंभ रेग्युलर प्रिमियम पेमेंट पॉलिसीचा प्लॅन आहे. यात जितक्या वर्षांसाठी पॉलिसी घेतली जाते तितक्या वर्षांचाच प्रिमियम भरावा लागतो. या पॉलिसीची खासियत अशी की लॉयल्टी अॅडिशन तुमच्या सम अश्युअर्डसोबत जोडून मॅच्युरिटीच्या वेळेस मिळतो. ज्यांचे वय ८ वर्षांपासून ५५ वर्षांपर्यत आहे अशा सर्वांसाठी ही पॉलिसी आहे. ही पॉलिसी किमान १० वर्षे आणि कमाल २० वर्षांसाठी घेता येते. कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही पॉलिसी असल्यामुळे यातील सम अॅश्युअर्डची रक्कम ७५,००० रुपये इतकी आहे. ३ लाखांपर्यतची पॉलिसी तुम्ही घेऊ शकता.

महिलांसाठी आधारशिला पॉलिसी


एलआयसीची फक्त महिलांसाठीची आधारशिला पॉलिसी आहे. आधारस्तंभ पॉलिसीचा प्रिमियम मासिक, तीन महिन्यांनी, सहामाही आणि वार्षिक स्वरुपात भरता येतो. तर या पॉलिसीअंतर्गत प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत करवजावट देखील मिळते.

५०० रुपये लावून २ लाखांचा फायदा


समजा राजेशने आधारस्तंभ पॉलिसी घेतली आहे, त्याचे वय ४० वर्षे आहे. राजेशने दीड लाख रुपये सम अश्युअर्डचा प्लॅन घेतला आहे. राजेशने २० वर्षांसाठीची पॉलिसी घेतली आहे आणि दर महा ५०० रुपयांचा प्रिमियम भरतो. राजेशला २० वर्षांपर्यत दरमहा ५०० रुपये भरावे लागतील. २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी मॅच्युअर्ड होईल. यानंतर राजेशला सर्वात आधी १.५ लाख रुपये मिळतील. त्यानंतर लॉयल्टी अॅडीशनचे ४८,७५० रुपये मिळतील. राजेशला एकूण २० वर्षांनी १,९८,७५० रुपये मिळतील. म्हणजेच दरमह ५०० रुपये भरून २ लाख रुपये मिळवता येतात.

पॉलिसीधारकचा मृत्यू झाल्यास


ही पॉलिसी घेतल्यानंतर २० वर्षे पूर्ण होण्याआधीच जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला १.५ लाख रुपये मिळतील. शिवाय लॉयल्टी अॅडिशनसुद्धा मिळेल. अर्थात ते पॉलिसी किती काळ सुरू होती त्यावर अवलंबून असेल. पॉलिसी जितक्या वर्षांसाठी सुरू असले तितके जास्त लॉयल्टी अॅडीशन मिळेल. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी