एलआयसीने आणली नवीन विमा ज्योती योजना, गुंतवणुकीवर वार्षिक परताव्याची हमी

काम-धंदा
Updated Mar 05, 2021 | 13:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

या योजने अंतर्गत ग्राहकांना परताव्यात दर वर्षी वृद्धीची हमी दिली जाणार आहे. ही योजना पंधरा ते वीस वर्षांसाठी घेतली जाऊ शकते. यात गुंतवणूक केल्यास ठराविक वार्षिक परताव्याची हमी मिळू शकते.

LIC brings new Bima Jyoti scheme with guarantee of annual returns on investment
एलआयसी  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • एलआयसीने आपल्यासाठी एक नवी गुंतवणूक योजना आणली आहे.
  • विमा ज्योती योजना असे नाव असलेली ही योजना १५ ते २० वर्षांची आहे
  • ९० दिवस ते ९० वर्षे वय असणाऱ्यांसाठी ही पॉलिसी विकत घेता येते

मुबई: एलआयसीने आपल्यासाठी एक नवी गुंतवणूक योजना आणली आहे. या योजने अंतर्गत विमा घेणाऱ्या ग्राहकांना आपल्या परताव्यात वार्षिक वृद्धी मिळण्याची हमी एलआयसीने दिली आहे. या योजनेमुळे ग्राहकांना फायदा मिळणार असून त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर ठराविक परताव्याची गॅरंटी कंपनी देणार आहे. एलआयसीच्या या नव्या पॉलिसीचे नाव विमा ज्योती योजना असे देण्यात आले आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि वैयक्तिक बचतीची योजना आहे.

विमा ज्योती पॉलिसी एखाद्या विमा एजंटकडून खरेदी केली जाऊ शकते. याव्यतिरिक्त ही पॉलिसी ऑनलाईन विकत घेण्याचा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे. एलआयसीच्या वेबसाइटच्या माध्यमातून ही पॉलिसी विकत घेता येऊ शकते. 

विमा ज्योती योजनेची मूलभूत रक्कम ही एक लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच तुम्ही कमीत कमी एक लाख रूपयांची पॉलिसी घेऊ शकता. या पॉलिसिची कमाल गुंतवणूक रक्कम अजून ठरवण्यात आलेली नाही. ही पॉलिसी १५ ते २० वर्षांसाठी खरेदी केली जाऊ शकते. तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याचा कालावधी ठरवू शकता. 

विमा ज्योती योजनेतील विशेष बाबी  

वय

पॉलिसी घेणाऱ्याचे किमान वय ९० दिवस आणि कमाल वय ९० वर्षे  इतके आहे. या दरम्यानच्या वयोगटातील व्यक्तींसाठी ही पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते. 

प्रिमिअम भरण्याचा कालावधी

विमा ज्योती पॉलिसीच्या कालावधिपेक्षा पाच वर्षे कमी कालावधीत प्रिमिअम भरणे आवश्यक आहे.

वार्षिक परताव्याची हमी

दर वर्षी १००० रूपयांवर ५० रूपयांच्या परताव्याची हमी कंपनीने दिली आहे. ही सर्व रक्कम पॉलिसी मॅच्युअर झाल्यास पॉलिसीच्या शेवटच्या वर्षात ग्राह्य धरली जाईल आणि एकूण रकमेत पकडली जाईल. 

प्रिमिअम कसा भरायचा  

प्रिमिअम वार्षिक, सहा महिने, तिमाही किंवा मासिक अशा  कोणत्याही प्रकारे भरले जाऊ शकते. यातील मासिक प्रिमिअम भरण्यासाठी NACH (नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस)च्या माध्यमाचा वापर केला जाऊ शकतो. किंवा सॅलरी डिडक्शन म्हणजेच पगार कपातीच्या माध्यमातून केला जाऊ शकतो. या पॉलिसिवर कर्ज घेण्याची सवलतही  मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी