LIC Dividend : एलआयसीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी लाभांश जाहीर, गुंतवणुकदारांना मिळणार इतके पैसे...

LIC Investment : देशातील आघाडीची विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने सूचीबद्ध केल्यानंतर त्यांचे पहिले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 18 टक्क्यांनी घसरून 2371 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 2917.33 कोटी रुपये होता.

LIC declares dividend to investors
एलआयसीकडून गुंतवणुकदारांसाठी लाभांश जाहीर 
थोडं पण कामाचं
  • एलआयसीने आपल्या भागधारकांना लाभांश जाहीर केले
  • एलआयसीचे आपले पहिले तिमाही निकाल जाहीर
  • गुंतवणुकदारांना मिळणार प्रति शेअर 1.50 रुपये लाभांश

LIC Declarers Dividend : नवी दिल्ली : देशातील आघाडीची विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने सूचीबद्ध केल्यानंतर त्यांचे पहिले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 18 टक्क्यांनी घसरून 2371 कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा एकूण नफा 2917.33 कोटी रुपये होता. यासह LIC ने आपल्या भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1.50 रुपये लाभांश मिळेल. (LIC declares dividend to investors, check the details)

या महिन्यात आलेल्या LIC च्या IPO मध्ये शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर हा लाभांश दिला जाईल.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 02 June 2022 : सोने घसरले; चांदीदेखील उतरली, पाहा ताजा भाव

नफा कमी झाला पण उत्पन्नात वाढ

एलआयसीने आपले तिमाही निकाल जाहीर करताना सांगितले की, या तिमाहीत कंपनीचा नफा कमी झाला असला तरी या तिमाहीत कंपनीचे प्रीमियम उत्पन्न 18% ने वाढून 1.44 लाख कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, वर्षभरापूर्वी याच काळात कंपनीचे उत्पन्न 1.22 लाख कोटी रुपये होते.

अधिक वाचा : June Month Bank Holidays: जूनमध्ये 12 दिवस बंद राहतील बँका; लवकर करुन बँकेची कामे नाहीतर होईल अडचण 

IPO मध्ये LIC ला तोटा 

LIC ने 17 मे ला आपला 21,000 कोटी रुपयांचा IPO लॉन्च केला. बाजारात एलआयसीच्या शेअर्सची सूची सवलतीने झाली. LIC चा स्टॉक NSE वर 77 रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजेच 8.11% खाली 872 रुपयांवर लिस्ट झाला. त्याच वेळी, ते BSE वर 867 वर सूचीबद्ध झाले. IPO च्या इश्यू प्राईस पासून, LIC च्या शेअरची किंमत 15% ने घसरली आहे. LIC मधील 3.5% हिस्सा विकून सरकारने सुमारे 21,000 कोटी रुपये कमावले आहेत.

अधिक वाचा : Maruti ने घेतली पुन्हा उड्डाण, Hyundai ला मोठा झटका, टाटांनी विकली इतकी वाहने

लाभांश म्हणजे काय?

जेव्हा एखादी कंपनी तिच्या नफ्यातील काही भाग भागधारकांना वितरित करते तेव्हा त्याला लाभांश म्हणतात. काही कंपन्या त्यांच्या नफ्यातील काही भाग वेळोवेळी त्यांच्या भागधारकांना देत असतात. ते नफ्यातील हा भाग भागधारकांना लाभांश म्हणून देतात.

एलआयसीचा (LIC) शेअर आज शेअर बाजारात (Share Market)डिस्काउंटसह म्हणजे घसरणीसह नोंदणीकृत झाला होता. एलआयसीचे शेअर 867.20 रुपये प्रति शेअरच्या(Share Price of LIC) किंमतीनिशी म्हणजेच 8.62 टक्के सूट देऊन मुंबई शेअर बाजारात (BSE) वर सूचीबद्ध झाले होते. त्याची इश्यू किंमत म्हणजे एलआयसीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत 949 रुपये होती. यामुळे काही मिनिटांतच गुंतवणुकदारांना 42,500 कोटी रुपयांचा धक्का बसला. इश्यू किंमतीवर कंपनीचे मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांच्या वर होते परंतु एलआयसीचा शेअर अपेक्षेपेक्षा कमकुवतरित्या सूचीबद्ध झाल्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य 42,500 कोटी रुपयांनी घसरले. आयपीओ (LIC IPO) मध्ये, किरकोळ गुंतवणुकदारांना प्रति शेअर 45 रुपये आणि पॉलिसीधारकांना 60 रुपये सूट मिळाली होती. त्यानुसार पॉलिसीधारकांचे 22 रुपये आणि कर्मचाऱ्यांचे 37 रुपयांचे नुकसान झाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी