LIC IPO Date | इंतजार खत्म ! 4 मे ला येणार एलआयसीचा आयपीओ... सोडू नका सरकारच्या दुभत्या गाईकडून कमाईची मोठी संधी...7 महत्त्वाच्या गोष्टी

LIC IPO Investment : सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून वाटत पाहत असलेला एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ अखेर येतो आहे. एलआयसीचा आयपीओ 4 मे पासून बाजारात खुला होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI)एलआयसीच्या आयपीओ प्रस्तावाला मंजूरी दिली. कंपनीने ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सेबीकडे दाखल केला होता. या आयपीओकडे शेअर बाजार आणि गुंतवणुकदार गेले कित्येक दिवस डोळे लावून बसले होते. कमाईसाठी सर्वांचेच हात शिवशिवत आहेत.

Big Opportunity to earn from LIC IPO
एलआयसीच्या आयपीओतून करा तुफान कमाई 
थोडं पण कामाचं
  • एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ 4 मेला गुंतवणुकीसाठी खुला होणार
  • संस्थात्मक आणि सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मोठी संधी
  • सरकार आयपीओमधून 21,000 कोटी रुपयांची कमाई करणार

LIC IPO to open on 4th May : नवी दिल्ली : सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून वाटत पाहत असलेला एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ (LIC IPO) अखेर येतो आहे. एलआयसीचा आयपीओ 4 मे पासून बाजारात खुला होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) एलआयसीच्या आयपीओ प्रस्तावाला मंजूरी दिली. कंपनीने ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सेबीकडे दाखल केला होता. एलआयसीचा आयपीओ 4 मे  ते  9मे 2022 दरम्यान खुला असणार आहे. या कालावधीत गुंतवणुकदारांना एलआयसीसारख्या जबरदस्त कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक (Investment) करण्याची संधी मिळणार आहे. एलआयसीच्या शेअर्समध्ये नोंदणीनंतर मोठी तेजी येण्याची शक्यता असल्याने आयपीओमध्ये स्वस्तात शेअर्स विकत घेत नंतर बंपर कमाई करण्यासाठी गुंतवणुकदार तयारीत आहेत. (LIC IPO will open on 4th May, check 7 important thing you must about IPO)

पॉलिसीधारक आणि कर्मचार्‍यांसाठी आरक्षणे आणि सवलत, जारी करण्याच्या तारखा आणि इश्यूची किंमत बुधवारपर्यंत कळेल, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

अधिक वाचा : Jeff Bezos on Musk | इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर, जेफ बेझॉस यांना चीनबद्दल आहे मोठी शंका...पाहा काय आहे प्रकरण

या मेगा आयपीओसंदर्भातील महत्त्वाच्या 7 गोष्टी जाणून घ्या-

  1. -  बाजाराच्या स्थितीमुळे LIC ने IPO चा आकार 5 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. विम्याची संपूर्ण मालकी असलेल्या सरकारची ३.५ टक्के विक्री करण्याची योजना आहे.
  2. -  LIC चे मूल्य 6 लाख कोटी रुपये इतके आहे. ते  सरकारच्या सुधारित अंदाजानुसार 5.39 लाख कोटी रुपयांच्या मूळ एम्बेडेड मूल्याच्या फक्त 1.1 पट आहे.
  3. -  LIC IPO मुळे सरकारी तिजोरीत 21,000 कोटी रुपये जमा होतील.
  4. -  सरकारला सुरुवातीला 31 मार्च रोजी संपलेल्या शेवटच्या आर्थिक वर्षात LIC ची यादी करायची होती परंतु रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजाराला धक्का बसल्यानंतर विक्रीला विलंब करावा लागला.
  5. -  किरकोळ गुंतवणुकदार IPO इश्यू आकाराच्या सुमारे 35 टक्के भाग घेण्यास पात्र असतील आणि सुमारे 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. सुमारे अर्धा IPO हा पात्र संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी (QIBs) निश्चित करण्यात आला आहे. QIB च्या भागापैकी 60 टक्के हिस्सा अॅंकर गुंतवणुकदारांसाठी परिस्थितीनुरुप राखून ठेवले आहेत.
  6. - अँकर गुंतवणुकदाराचा एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल. आयपीओचा 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला महत्त्वपूर्ण भाग पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. कर्मचार्‍यांसाठी देखील, LIC IPO च्या 5 टक्के हिस्सा राखीव असेल. कर्मचारी आणि पॉलिसीधारक दोघांनाही सवलतीच्या दरात LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.
  7. -  LIC IPO ला अँकर गुंतवणूकदारांकडून 13,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची वचनबद्धता प्राप्त झाली आहे. ही ऑफर अशा गुंतवणूकदारांना ऑफर केलेल्या समभागांच्या दुप्पट मूल्यापेक्षा जास्त आहे

अधिक वाचा : SBI Internet Alert | स्टेट बॅंकेने ग्राहकांना दिल्या इंटरनेट सुरक्षेसाठीच्या सूचना, चटकन जाणून घ्या 8 महत्त्वाचे मुद्दे ...नाहीतर होईल नुकसान

भारतीय शेअर बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO

21,000 कोटी रुपयांपर्यतचा आकार कमी केल्यानंतरही, LIC IPO हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. आत्तापर्यंत, 2021 मध्ये पेटीएमचा सर्वात मोठा IPO 18,300 कोटी रुपये होता. त्यानंतर 2010 मध्ये कोल इंडिया लिमिटेडचा 15,500 कोटी रुपयांचा आयपीओ आणि 2008 मध्ये रिलायन्स पॉवरचा 11,700 कोटी रुपयांचा आयपीओ होता.

अधिक वाचा : LIC IPO | एलआयसीचा नवा प्रस्ताव दाखल, आयपीओच्या नवीन आकाराला मंजूरी, जाणून घ्या लॉचिंगची तारीख, किंमत, गुंतवणुकीविषयीची माहिती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी