'ही' योजना देते दरमहा १४,००० पर्यत पेन्शन, जाणून घ्या कशी करायची गुंतवणूक

LIC Jeevan Akshay :असा गुंतवणूक प्रकार ज्यामध्ये पैसेही सुरक्षित (Safe investment) राहतील आणि चांगला परतावादेखील मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी एलआयसीची (LIC)जीवन अक्षय पॉलिसी हा एक चांगला पर्याय आहे.

LIC Jeevan Akshay
एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी 

थोडं पण कामाचं

  • जीवन अक्षय पॉलिसीचे फायदे
  • दरमहा पेन्शन मिळवण्याचा पर्याय
  • ३० वर्षांपासून ते ८५ वर्षादरम्यान नागरिक करू शकतात गुंतवणूक

नवी दिल्ली : निवृत्तीनंतर नियमित पेन्शन आणि आर्थिक सुरक्षितता ही प्रत्येकच नागरिकाची अपेक्षा असते. असा गुंतवणूक प्रकार ज्यामध्ये पैसेही सुरक्षित (Safe investment) राहतील आणि चांगला परतावादेखील (good return investment) मिळेल तुम्हाला हवा असेल तर तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (Life Insurance Corporation) म्हणजेच एलआयसीची (LIC)जीवन अक्षय पॉलिसी ( LIC Jeevan Akshay) हा एक चांगला पर्याय आहे. या पॉलिसीत तुम्हाला एक निश्चित पेन्शन (Pension) मिळते. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागेल. या पॉलिसीत तुम्हाला एकूण १० पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यातील पर्याय अ (Option A)निवडल्यावर तुम्हाला दर महिन्याला १४,००० रुपयांपर्यतचे मासिक पेन्शन मिळू शकते. (LIC Jeevan Akshay scheme, get pension upto Rs 14,000)

वयाची अट

जीवन अक्षय पॉलिसी ग्राहकाचे वय ३० वर्षांपासून ते ८५ वर्षापर्यत असू शकते. यामध्ये किमान १ लाख रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जीवन अक्षय पॉलिसीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करता येते. ही एक सिंगल प्रिमियम असणारी नॉन-लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल अॅन्युईटी स्कीम आहे.

जीवन अक्षय पॉलिसीचे फायदे

  1. या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला कर्जाचीदेखील सुविधा मिळते. तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर तीन महिन्यांनी कर्ज घेऊ शकता.
  2. जर एखाद्या ग्राहकाने या पॉलिसीत ५ लाख रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली तर त्याला अॅन्युईटीमध्ये इन्सेन्टिव्हदेखील मिळतो. 
  3. जीवन अक्षय पॉलिसीत वार्षिक, सहामाही, तिमाही आणि दर महिन्याला गुंतवणूक करता येते. यात किमान अॅन्युईटी वार्षिक १२,००० रुपये आहे. कमाल रकमेसाठी मात्र कोणतीही मर्यादा नाही.
  4. जीवन अक्षय पॉलिसीच्या जीवनभर एकाच दराने अॅन्युईटी मिळण्याच्या म्हणजेच Annuity payable for life at a uniform rate या पर्यायाला निवडून या पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दरमहा पेन्शन मिळवू शकता.

दर महा १४,००० रुपयांचे पेन्शन कसे मिळवायचे

जर एखाद्या व्यक्तीचे वय ३५ वर्षे आहे तर त्याला ३० लाख रुपयांचा प्रिमियम भरावा लागेल. यामध्ये सम अश्युअर्ड २९,४६,९५५ रुपये इतका असेल. हा प्रिमियम भरल्यानंतर जर तुम्ही पर्याय अ म्हणजेच Option A अर्थात ‘Annuity payable for life at a uniform rate’ हा पर्याय निवडला तर प्रिमियम भरल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला १४,२१४ रुपयांचे मासिक पेन्शन मिळण्यास सुरूवात होईल. स्कीमचा फायदा पॉलिसीधारक जिवंत असेपर्यत मिळतो. यामध्ये ३० वर्षापासून ते ८५ वर्षापर्यतचे नागरिक गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा लाभ दिव्यांग नागरिकदेखील घेऊ शकतात.

तरुणवयात निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आर्थिक तजवीज करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे तरुणवयातच बचतीची आणि गुंतवणुकीची सवय लावली पाहिजे. आर्थिक नियोजनामुळे उतारवयात आर्थिक अडचणी टाळता येतात. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही आर्थिक उद्दिष्टांचा समावेश केला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी