तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्यातील टेन्शन दूर करणारी एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी

LIC Jeevan Lakshya : ज्यात पॉलिसीधारक (Policyholder)असतानाही लाभ मिळतो आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाचीही काळजी घेतली जाते. या दोन्ही वैशिष्ट्यांचे लाभ देणारी पॉलिसी म्हणजे एलआयसी जीवन लक्ष्य

LIC Jeevan Lakshya Policy
'एलआयसी'ची 'जीवन लक्ष्य' पॉलिसी 

थोडं पण कामाचं

  • पॉलिसीधारक (Policyholder)असतानाही लाभ मिळतो आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाचीही काळजी घेणारी पॉलिसी
  • पॉलिसीचा कालावधी किमान १३ वर्षे आणि कमाल २५ वर्षे, पॉलिसीच्या कालावधीपेक्षा ३ वर्षे कमी प्रिमियम भरावा लागतो
  • पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरदेखील प्रिमियम न भरता ही पॉलिसी सुरू राहते आणि मॅच्युरिटीच्या वेळेस पूर्ण रक्कम नॉमिनीला मिळते

नवी दिल्ली: कोणतीही विमा पॉलिसी किंवा प्लॅन घेताना (Insurance) आपण त्यात नेहमीच्या वैशिष्ट्यांबरोबरच इतर काही वैशिष्ट्ये आहेत हे पाहतो. सर्वसाधारणपणे कोणतीही पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यानंतर सम अश्युअर्डबरोबर (Sum Assured) बोनस आणि इतर लाभ एकत्रितरित्या देते. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला विम्याचा लाभ मिळतो. एलआयसीच्या अनेक पॉलिसी (LIC Insurance Policy)बाजारात लोकप्रिय आहेत. मात्र एखादी अशीही पॉलिसी आहे का की ज्यात पॉलिसीधारक (Policyholder)असतानाही लाभ मिळतो आणि पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाचीही काळजी घेतली जाते. या दोन्ही वैशिष्ट्यांचे लाभ देणारी एलआयसीने आणली आहे, ती म्हणजे एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya). या पॉलिसीमध्ये काही जबरदस्त वैशिष्ट्ये आहेत जी पॉलिसीधारक असताना किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची काळजी घेतात. (LIC Jeevan Lakshya policy makes you and your family tension free for future)

एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC Jeevan Lakshya)

एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीला बाजारात कन्यादान पॉलिसी नावाने विकण्यात येते आहे. त्याचे कारण असे की यामध्ये मुलीला लक्षात घेऊन गुंतवणूक केल्यास तिचे करियर आणि लग्न यांच्या आर्थिक खर्चाचे टेन्शन दूर होते. ही पॉलिसी जरी सर्व कुटुंबाला एक सुरक्षा कवच देत असली तरी या पॉलिसीत मुलींना विशेष लक्षात घेण्यात आले आहे. वडीलांचे वय त्यासाठी १८ ते ५० वर्षांदरम्यान असले पाहिजे. पॉलिसी जर २५ वर्षांसाठी घेण्यात आली तर पॉलिसीधारकाला २२ वर्षांपर्यत जवळपास २७,००० रुपयांचा प्रिमियम दरवर्षी भरावा लागेल. पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर जवळपास १३ लाख रुपये मिळतील. 

एलआयसी जीवन लक्ष्यचा कालावधी

पॉलिसीचा कालावधी किमान १३ वर्षे आणि कमाल २५ वर्षे इतका आहे. जास्तीत जास्त कालावधीसाठी पॉलिसी घेतली असता चांगला लाभ मिळतो. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे जितक्या कालावधीसाठी ही पॉलिसी घेण्यात आली असेल त्याच्यापेक्षा ३ वर्षे कमी प्रिमियम भरावा लागतो. म्हणजे २५ वर्षांसाठी पॉलिसी घेतल्यास २२ वर्षांपर्यतच प्रिमियम भरावा लागतो. मात्र मॅच्युरिटीची रक्कम २५ वर्षे किंवा जितक्या कालावधीसाठी पॉलिसी घेतली असेल तितकी वर्षे पूर्ण झाल्यावरच मिळते.

पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर विना प्रिमियम सुरू राहील पॉलिसी

जर पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू एखादा आजार किंवा कोरोनामुळे झाला तर नॉमिनीला ५ लाख रुपये मिळतील. पॉलिसीधारकाचा मृत्यू अपघातात झाल्यास नॉमिनीला सम अश्युअर्डच्या दुप्पट म्हणजेच १० लाख रुपये मिळतील. याशिवाय सम अश्युअर्ड रकमेच्या १० टक्के हिस्सा दरवर्षी मुलांच्या शिक्षणासाठी मिळतील. या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्यं हे आहे की पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरदेखील प्रिमियम न भरता ही पॉलिसी सुरू राहते आणि मॅच्युरिटीच्या वेळेस पूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला प्राप्तिकरात दीड लाख रुपयांपर्यत सूट मिळते. पॉलिसी घेण्याआधी एलआयसीच्या पुढील वेबसाईटला नक्की Https://Licindia.In/ क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी