LIC Plan | एलआयसीचा नवा दमदार प्लॅन, इन्श्युरन्स आणि कमाई

life insurance : लआयसीने (LIC) धन रेखा हा नवा प्लॅन आणला आहे. धन रेखा (Dhan Rekha) हा एक नॉन लिंक्ड, इंडिव्युजल सेव्हिंग्स लाइफ इन्श्युरन्स प्लॅन (savings life insurance plan)आहे. या प्लॅनमध्ये युनिक वैशिष्ट्ये आहेत. महिलांसाठी यात विशेष प्रिमियमचे दर आहेत. एलआयसी प्लॅन एरवी लोकप्रिय आहेत.

LIC Dhan Rekha
एलआयसीचा धन रेखा प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • एलआयसीचा नवा नॉन लिंक्ड, इंडिव्युजल सेव्हिंग्स लाइफ इन्श्युरन्स प्लॅन
  • एलआयसीच्या धन रेखा प्लॅनमध्ये खास फायदे
  • किमान सम अश्युअर्ड ही २ लाख रुपये तर कमाल कोणतीही मर्यादा नाही

Life insurance plan : नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजे एलआयसीने (LIC) धन रेखा हा नवा प्लॅन आणला आहे. धन रेखा (Dhan Rekha) हा एक नॉन लिंक्ड, इंडिव्युजल सेव्हिंग्स लाइफ इन्श्युरन्स प्लॅन (savings life insurance plan)आहे. या प्लॅनमध्ये युनिक वैशिष्ट्ये आहेत. महिलांसाठी यात विशेष प्रिमियमचे दर आहेत. एलआयसी प्लॅन एरवी लोकप्रिय आहेत. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार धन रेखा प्लॅनमध्ये सम अश्युअर्डच्या काही टक्के रक्कम नियमित अंतराने विमाधारकाला मिळणार आहे. (LIC launches new life insurance plan, check the details)

धनरेखा प्लॅनची वैशिष्टये

धनरेखा प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाला पूर्ण सम अश्युअर्ड मिळणार आहे. त्यातून मनी बॅकची रक्कम वजा केली जाणार नाही. शिवाय यात गॅरंटीड लाभदेखील मिळणार आहेत. गॅरंटीड लाभ हे पॉलिसीच्या प्रत्येक वर्षाअखेर मिळतात. पॉलिसीच्या सहाव्या वर्षापासून ते पॉलिसीच्या शेवटच्या वर्षांपर्यत हे लाभ मिळतात. सिंगल प्रिमियमसाठी सम अश्युअर्ड १२५ टक्के आणि इतर गॅरंटीड लाभ या प्लॅनमध्ये मिळतात. या प्लॅनमध्ये पॉलिसीच्या कालावधीत पॉलिसीधारकाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाते.

धनरेखा प्लॅनचे फायदे

या प्लॅनमध्ये पाच वर्षानंतर एकरकमी लाभाऐवजी पाच हफ्त्यात लाभ मिळण्याची सुविधा आहे. हे लाभ मॅच्युरिटीच्या वेळेस आणि मृत्यूनंतर मिळणारे आहेत. या प्लॅनचा प्रिमियम सिंगल किंवा १० वर्षांसाठीचा प्रिमियम, १५ वर्षांसाठीचा प्रिमियम आणि २० वर्षांसाठीचा प्रिमियम भरण्याची सुविधा आहे. लिमिटेड पेमेंट प्रिमियमसाठी मृत्यूच्या वेळची सम अश्युअर्ड बेसिक सम अश्युअर्डच्या १२५ टक्के किंवा वार्षिक प्रिमियमच्या सात पट यातील जो जास्त असेल ती मिळते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूच्या वेळेस मिळणाऱ्या गॅरंटीड लाभांसह सम अश्युअर्ड हा १०५ टक्क्यांपेक्षा कमी नसणार आहे.

धन रेखा प्लॅनमध्ये किमान सम अश्युअर्ड ही २ लाख रुपये आहे. तर कमाल सम अश्युअर्डसाठी कोणतीही मर्यादा नाही.  प्लॅन घेण्यासाठी वयाची पात्रता किमान ९० दिवसांपासून ते आठ वर्षांपर्यत आहे. पॉलिसीच्या निवडलेल्या कालावधीवर ते अवलंबून आहे. हा प्लॅन घेण्यासाठी कमाल वय ३५ वर्षे ते ५५ वर्षे आहे. पॉलिसीच्या निवडलेल्या कालावधीवर ते अवलंबून आहे.

एलआयसी (LIC)या देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा आयपीओ (LIC IPO)लवकरच शेअर बाजारात येणार आहे. गुंतवणुकदार (Investors) एलआयसीच्या आयपीओची उत्कंठतेने वाट पाहत आहेत. विशेषत: ज्या गुंतवणुकादारांकडे एलआयसीची पॉलिसी (LIC Policyholders) आहे असे गुंतवणुकदार या आयपीओकडे डोळे लावून बसले आहेत. सरकारने याआधीच जाहीर केले आहे की एलआयसीचा आयपीओ जेव्हा शेअर बाजारात (Share Market) येईल तेव्हा एलआयसी पॉलिसीधारकांसाठी १० टक्के शेअर राखीव ठेवले जाणार आहेत. तर बुधवारीच एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांना आपले पॅन अपडेट करण्याचीदेखील सूचना केली आहे. याचा फायदा त्यांना आयपीओच्या वेळेस मिळणार आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना कर्मचाऱ्यांच्याच पातळीवर आणण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. यामुळे एलआयसी पॉलिसीधारकांना १० टक्क्यांच्या सूटवर आयपीओच्या १० टक्क्यांमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी