LIC Scheme: फक्त ४ प्रिमियम घ्या १ कोटींचा फायदा, ही आहे एलआयसीची बंपर पॉलिसी!

ही योजना गंभीर आजारांसाठी कव्हरदेखील देते. यामध्ये ३ वैकल्पिक रायडर्सदेखील उपलब्ध आहेत. पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास जीवन शिरोमणी प्लॅनमध्ये त्याला वेळोवेळी आर्थिक लाभ मिळतो.

LIC Plan
एलआयसीची पॉलिसी 
थोडं पण कामाचं
  • एलआयसीचा जीवन शिरोमणी प्लॅन हा एक चांगला पर्याय
  • यामध्ये किमान १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण
  • हा एक नॉन लिंक्ड, पेमेंट मनी बॅक प्लॅन आहे

नवी दिल्ली: LIC jeevan shiromani Plan: जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल आणि आयुर्विम्याचा (Life Insurance)लाभ घ्यायचा असेल तर एलआयसीचा जीवन शिरोमणी प्लॅन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. एलआयसीच्या जीवन शिरोमणी प्लॅनमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. जीवन शिरोमणी (LIC jeevan Shiromani Plan)हा एक चांगला पर्याय आहे. ही पॉलिसी विमा संरक्षणाबरोबरच बचतीचा लाभदेखील देते. या पॉलिसीबद्दल जाणून घेऊया. (LIC : LIC Jeevan Shiromani Plan gives Rs 1 crore insurance & other benefits, see the details)

१ कोटी रुपयांचे विमा संरक्षण

एलआयसीचा जीवन शिरोमणी हा प्लॅन एक नॉन लिंक्ड प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला किमान १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळते. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचे प्लॅन बाजारात आणत असते. जीवन शिरोमणी प्लॅनमध्ये किमान परतावा १ कोटी रुपयांचा आहे. म्हणजेच जर तुम्ही १४ वर्षांपासून कॅल्क्युलेशन केले तर एकूण मिळणारी रक्कम १ कोटीपर्यत असेल.

काय आहे जीवन शिरोमणी प्लॅन

एलआयसीचा जीवन शिरोमणी प्लॅन (टेबल नंबर ८४७)ची सुरूवात २०१७ मध्ये झाली होती. हा एक नॉन लिंक्ड, पेमेंट मनी बॅक प्लॅन आहे. ही पॉलिसी बाजाराशी जोडलेली आहे. ही पॉलिसी मुख्यत: उच्च उत्पन्न गटाला लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. ही योजना गंभीर आजारांसाठी कव्हरदेखील देते. यामध्ये ३ वैकल्पिक रायडर्सदेखील उपलब्ध आहेत. जीवन शिरोमणी प्लॅन घेतल्यानंतर पॉलिसीधारकाला डेथ बेनिफिट म्हणून त्याच्या कुटुंबियांना आर्थिक आधार दिला जातो. या पॉलिसीमध्ये विमाधारकाच्या जीवंत राहण्याच्या स्थितीत निश्चित कालावधीनंतर त्याला पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय मॅच्युरिटीला एकरकमी रकमेचा लाभदेखील मिळतो.

पॉलिसीधारकाला मिळणारे लाभ

पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास जीवन शिरोमणी प्लॅनमध्ये त्याला वेळोवेळी आर्थिक लाभ मिळतो. लाभ मिळण्याची प्रक्रिया

१. १४ वर्षांची पॉलिसी - १० व्या आणि १२ व्या वर्षी सम अश्युअर्डच्या ३० ते ३० टक्के
२. १६ वर्षांची पॉलिसी- १२व्या आणि १४व्या वर्षी सम अश्युअर्डच्या ३५ ते ३५ टक्के
३. १८ वर्षांची पॉलिसी- १४व्या आणि १६व्या वर्षी सम अश्युअर्डच्या ४० ते ४० टक्के
४. २० वर्षांची पॉलिसी- १६व्या आणि १८व्या वर्षी सम अश्युअर्डच्या ४५ ते ४५ टक्के

पॉलिसीसाठीच्या अटी आणि नियम

१. विमा संरक्षण- १ कोटी रुपये
२. कमाल अश्युअर्ड- कोणतीही सीमा नाही
३. किमान ४ वर्षांपर्यत प्रिमियम भरावा लागेल
४. पॉलिसीचा कालावधी- १४, १६, १८ आणि २० वर्षे
५. एंट्रीसाठीचे किमान वय १८ वर्षे
६. एंट्रीसाठीचे कमाल वय १४ वर्षांच्या पॉलिसीसाठी ५५ वर्षे, १६ वर्षांच्या पॉलिसीसाठी ५१ वर्षे, १८ वर्षांच्या पॉलिसीसाठी ४८ वर्षे, २० वर्षांच्या पॉलिसीसाठी ४५ वर्षे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी