LIC Listing : कमी किंमतीत सूचीबद्ध झाला एलआयसीचा शेअर, गुंतवणुकदारांचे काही मिनिटांत 42,500 कोटींचे नुकसान...तरीही एलआयसी आहे बाहुबली

LIC Market Cap : एलआयसीचा (LIC) शेअर आज शेअर बाजारात (Share Market)डिस्काउंटसह म्हणजे घसरणीसह नोंदणीकृत झाला. एलआयसीचे शेअर 867.20 रुपये प्रति शेअरच्या(Share Price of LIC) किंमतीनिशी म्हणजेच 8.62 टक्के सूट देऊन मुंबई शेअर बाजारात (BSE) वर सूचीबद्ध झाले. त्याची इश्यू किंमत म्हणजे एलआयसीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत 949 रुपये होती. काही मिनिटांतच गुंतवणुकदारांना 42,500 कोटी रुपयांचा धक्का बसला.

LIC listing & Investor's loss
एलआयसी अपेक्षेपेक्षा कमी किंमतीत शेअर बाजारात सूचीबद्ध 
थोडं पण कामाचं
  • एलआयसीचा शेअर अपेक्षेपेक्षा 8.62 टक्क कमी किंमतीवर झाला सूचीबद्ध, 867.20 च्या किंमतीवर शेअरची नोंदणी
  • काही मिनिटांतच गुंतवणुकदारांना 42,500 कोटी रुपयांचा धक्का
  • बाजारमूल्यानुसार एलआयसी बनली देशातील 5व्या क्रमाकांची कंपनी

LIC Share Price after Listing : मुंबई : एलआयसीचा (LIC) शेअर आज शेअर बाजारात (Share Market)डिस्काउंटसह म्हणजे घसरणीसह नोंदणीकृत झाला. एलआयसीचे शेअर 867.20 रुपये प्रति शेअरच्या(Share Price of LIC) किंमतीनिशी म्हणजेच 8.62 टक्के सूट देऊन मुंबई शेअर बाजारात (BSE) वर सूचीबद्ध झाले. त्याची इश्यू किंमत म्हणजे एलआयसीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत 949 रुपये होती. काही मिनिटांतच गुंतवणुकदारांना 42,500 कोटी रुपयांचा धक्का बसला. इश्यू किंमतीवर कंपनीचे मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांच्या वर होते परंतु एलआयसीचा शेअर अपेक्षेपेक्षा कमकुवतरित्या सूचीबद्ध झाल्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य 42,500 कोटी रुपयांनी घसरले. आयपीओ (LIC IPO) मध्ये, किरकोळ गुंतवणुकदारांना प्रति शेअर 45 रुपये आणि पॉलिसीधारकांना 60 रुपये सूट मिळाली. त्यानुसार पॉलिसीधारकांचे 22 रुपये आणि कर्मचाऱ्यांचे 37 रुपयांचे नुकसान झाले. (LIC listed at discounted price but still becomes Bahubali of insurance sector)

अधिक वाचा : Adani Group Latest : अदानींचा आता मीडियामध्येही होणार बोलबाला... विकत घेतला या मीडिया कंपनीचा 49% हिस्सा, काय आहे प्लॅन?

एलआयसी बनली देशातील 5व्या क्रमाकांची कंपनी

सूचीबद्ध केल्यानंतर, LIC देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. लिस्टिंग किंमतीनुसार एलआयसीचे बाजारमूल्य  5.71 लाख कोटी रुपये आहे. मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही 16.42 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यानिशी देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. त्यापाठोपाठ टाटा समूहाची TCS, HDFC बँक आणि देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी Infosys यांचा क्रमांक लागतो.

विमा क्षेत्राचा बाहुबली

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) आज बाजारात पदार्पण केल्यानंतर सर्वात मोठी सूचीबद्ध विमा कंपनी बनली आहे. खरं तर, LIC चे बाजारमूल्य आता भारतातील सर्व सूचीबद्ध विमा कंपन्यांच्या एकत्रित बाजारमूल्यापेक्षा जास्त आहे. सकाळी 11:36 वाजता, LIC चे मार्केट कॅप 5.61 लाख कोटी रुपये होते, जे BSE वर 4.54 लाख कोटी (आठ सूचीबद्ध विमा कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप) पेक्षा जास्त आहे. 

अधिक वाचा : Gautam Adani : अदानींचा मास्टर स्ट्रोक, अंबुजा-एसीसी विकत घेत बनले सिमेंट क्षेत्राचे राजे...

1.15 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह HDFC लाइफ इन्शुरन्स कंपनी मार्केट कॅपच्या बाबतीत सूचीबद्ध विमा कंपन्यांमध्ये अव्वल आहे. मात्र या खाजगी आयुर्विमा कंपनीचा समभाग बीएसईवर 0.69 टक्क्यांनी 546.05 रुपयांवर व्यवहार करत होता.  SBI लाइफ इन्शुरन्सचे मार्केट कॅप आज दुपारच्या सत्रात 1.05 लाख कोटी रुपये इतके होते. BSE वर शेअर 0.87 टक्क्यांनी वाढून  1055.25 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे मार्केट कॅप आज BSE वर ६३,५२२ कोटी रुपये होते. कंपनीचा शेअर 1,292 रुपयांवर स्थिर व्यवहार करत होता. BSE वर ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मार्केट कॅप 71,269 कोटी रुपये होते. आजच्या सत्रात ICICI प्रुडेन्शियल लाइफचे शेअर्स 496.60 रुपयांवर व्यवहार करत होते.

अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख

वाढू शकते शेअरची किंमत

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे हेमांग जानी म्हणाले की, एलआयसीच्या शेअरची नोंदणी आयपीओतील किंमतीपेक्षा कमी दराने झाली. परंतु बाजारातील आकर्षक मूल्यांकन आणि स्थिरता लक्षात घेता, किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणुकदार स्वारस्य दाखवू शकतात. एलआयसीच्या सूचिबद्धतेनंतर मोठे भांडवल खुले झाले आहे. त्यातील काही भाग इक्विटी मार्केटमध्ये येऊ शकतात.

शेअर जाऊ शकतो 1000 रुपयांपर्यंत 

दरम्यान, विदेशी ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने एलआयसीचे कव्हरेज सुरू केले आहे. त्यात एलआयसीच्या शेअरला 1000 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह तटस्थ रेटिंग देण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की ज्या गुंतवणुकदाराला एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची आहे तो अप्रत्यक्षपणे इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतो. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य नसल्यामुळे त्याचा बाजारातील हिस्सा घसरला आहे. सिंगल प्रीमियम आणि ग्रुप बिझनेसवर कंपनीचा भर आहे. मॅक्वेरीने एलआयसीची लक्ष्य किंमत  1,000 रुपये ठेवली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी