एलआयसी न्यू जीवन शांती : दर महिन्याला खात्यात येतील ८,७५० रुपये, अशी असेल प्लॅनिंग

काम-धंदा
Updated May 15, 2021 | 14:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

एलआयसी न्यू जीवन शांती : दर महिन्याला निश्चित बचत करून त्याचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी एलआयसीची न्यू जीवन शांती(LIC) ही योजना उपयुक्त आहे.

LIC New Jeevan Shanti Scheme
एलआयसीची न्यू जीवन शांति पॉलिसी 

थोडं पण कामाचं

  • दर महिन्याला ८,७५० रुपये
  • ३५व्या वर्षी या योजनेमध्ये करा गुंतवणूक
  • ५ लाख रुपयांची गुंतवणूक करून २० वर्षांनी मिळवा १.०५ लाख वार्षिक

नवी दिल्ली : सर्वसामान्य माणसाला दैनंदिन खर्च आणि दर महिन्याला होणार खर्च याची मोठी चिंता असते. बऱ्याचदा हा खर्चसुद्धा आवाक्याबाहेर जात असतो. त्यामुळे आवडीच्या गोष्टींवर पैसे खर्च करणे त्याला शक्य होत नाही. नोकरदार वर्गाला महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागते. यामुळे मग बचत करणे आणि भविष्यासाठी गुंतवणूक करणे अवघड होऊन बसते. दर महिन्याला निश्चित बचत करून त्याचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी एलआयसीची न्यू जीवन शांती(LIC) ही योजना उपयुक्त आहे. यासाठी तुम्हाला विशिष्ट रकमेची गुंतवणूक करावी लागेल त्या बदल्यात तुम्हाला वार्षिक स्वरुपात किंवा दर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळेल. 

भविष्यात तुम्हाला दर वर्षाला किंवा दर महिन्याला एक निश्चित रक्कम हवी असेल तर त्यासाठी तुम्ही एलआयसीच्या न्यू जीवन शांती(LIC)योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. एलआयसीचा हा एक पेन्शन प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला एकरकमी पैशांची गुंतवणूक करून काही वर्षांनी एक निश्चित रक्कम दरमहा मिळते.

दरमहा ८,७५० रुपये मिळवण्यासाठी हे करा


एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेचा फायदा त्यांना जास्त मिळतो ज्यांचे वय कमी आहे. समजा तुम्ही वयाच्या ३५व्या वर्षी या योजनेमध्ये ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला २० वर्षांनंतर वार्षिक १.०५ लाख रुपये म्हणजेच दर महिन्याला ८,७५० रुपये मिळण्यास सुरूवात होईल. या पॉलिसीची खासियत ही आहे की जर तुम्हाला हवे तर गुंतवणुकीच्या ५ वर्षांनंतरसुद्धा तुम्ही आपले मंथली पेन्शन निश्चित करू शकता. मात्र यामुळे अर्थातच तुम्हाला मिळणारी रक्कम कमी होईल. या योजनेमध्ये २१.६ टक्क्याच्या दराने वार्षिक व्याज मिळते.

यांनासुद्धा होईल लाभ


जर तुम्हाला पॉलिसी घेतल्यानंतर असे वाटले की तुम्हाला या पॉलिसीतून बाहेर पडायचे आहे किंवा काही कारणास्तव ही पॉलिसी सुरू ठेवू शकत नसाल तर तुम्ही तीन महिन्यांनंतर या योजनेतून बाहेर पडू शकता. मात्र जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी ही योजना सुरू ठेवल्यास तुम्हाला याचा चांगला फायदा मिळेल. तुम्ही ३० वर्षांच्या वयात ही पॉलसी सुरू शकता. एकदा पॉलिसी सुरू झाल्यानंतर तीन वर्षांनी तुम्ही यावर कर्जदेखील घेऊ शकता. कर्जाची रक्कम तुम्ही जमा केलेल्या प्रिमियमच्या ८० ते ९० टक्के इतकी असू शकते.

रिटायरमेंटनंतरचे नियोजन

रिटायरमेंटनंतरचे आयुष्य तणावमुक्त जगण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी तरुणवयातच बचत करणे आणि गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते. यासाठी दर महिन्याला निश्चित बचत करण्याची शिस्त लावणे आवश्यक असते. तसेच केलेल्या बचतीची नियमितपणे गुंतवणूक करणे आवश्यक असते. दीर्घकालावधीसाठी नियमित गुंतवणूक केल्याने एक मोठी रक्कम तुम्ही उभी करू शकाल. शिवाय दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्याने छोट्याशा गुंतवणुकीतूनच मोठी रक्कम उभी करता येईल. निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील आर्थिक गरजा, वैद्यकीय खर्च, आपत्कालीन खर्च, दैनंदिन खर्च यासाठीची तरतूद तरुणवयातच करणे श्रेयस्कर ठरते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी