LIC: घरबसल्या चेक करु शकता एलआयसी पॉलिसीचं स्टेट्स, जाणून घ्या काय आहे पद्धत...

LIC policy status check: तुमच्या एलआयसी पॉलिसीचं स्टेट्स तुम्ही घरबसल्या चेक करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ मोबाइल नंबर हा पॉलिसीसोबत लिंक करावा लागेल. 

lic policy status online premium payment how to check read in marathi
घरबसल्या चेक करु शकता एलआयसी पॉलिसीचं स्टेट्स, जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: BCCL

LIC Policy: आपल्या कमाईतून पैशांची बचत करुन लोक लाईफ इन्श्यूरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करतो. बाजारात गुंतवणुकीचे इतर पर्याय उपलब्ध असताना सुद्धा अनेकजणांची पहिली पसंती ही एलआयसी असते. कारण, गुंतवणुकीचा हा एक सुरक्षित पर्याय आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. (lic policy status online premium payment how to check read in marathi)

सोप्या पद्धतीने जाणून घ्या पॉलिसी स्टेट्स 

अनेकदा आपल्याला एलआयसी पॉलिसी संदर्भात जाणून घेण्यासाठी एलआयसी एजंटची मदत घ्यावी लागते. मात्र, तुमच्या एलआयसी पॉलिसीच्या संदर्भात तुम्ही स्वत: घरबसल्या माहिती मिळवू शकता हे तुम्हाला माहिती आहे का? यासाठी तुम्हाला मोबाइल नंबर पॉलिसीसोबत लिंक करणं आवश्यक आहे. मात्र, तुमचा मोबाइल नंबर जर पॉलिसीसोबत लिंक नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण, हे काम तुम्ही अवघ्या काही क्षणात करु शकता.

हे पण वाचा : पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग, झटक्यात व्हाल मालामाल

कसे कराल स्टेट्स चेक?

 1. सर्वातआधी जाणून घेऊयात तुमच्या पॉसिसी स्टेट्स घरी बसून कसे चेक करु शकता. यासाठी एक छोटी प्रक्रिया तुम्हाला फॉलो करावी लागेल. 
 2. पॉलिसी स्टेट्स जाणून घेण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत साईटला https://www.licindia.in/ भेट द्या. लिंक ओपन होताच तुम्हाला तुमचं नाव, पॉलिसी नंबर यासारखी माहिती भरावी लागेल. यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. 
 3. जसे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल तसे तुम्ही आपल्या पॉलिसी स्टेट्सची माहिती मिळवू शकता.
 4. पॉलिसीची माहिती कॉल किंवा मेसेजच्या माध्यमातून मिळवता येईल.
 5. कॉलवर पॉलिसी स्टेट्स जाणून घेण्यासाठी 022-68276827 या नंबरवर कॉल करावा लागेल. 
 6. तर मेसेजद्वारे माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला 9222492224 या नंबरवर मेसेज करावा लागेल.
 7. त्यासाठी मेसेजमध्ये LICHELP लिहून आपला पॉलिसी नंबर लिहावा लागेल. 
 8. हा मेसेज पाठवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

हे पण वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कधी करावे लग्न?

असा करा मोबाइल नंबर लिंक

 1. जर तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर नाहीये तर तुम्ही एका लहान प्रक्रियेद्वारे ते करु शकता.
 2. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एलआयसी वेबसाईटवर जावं लागेल. जेथे कस्टमर सर्विसचा पर्याय उपलब्ध असेल. 
 3. लिंक ओपन होताच तुम्हाला समोर काही पर्याय दिसून येतील. ज्यामध्ये अपडेट युअर कॉन्टॅक्ट डिटेल ऑनलाईन हा पर्याय निवडा
 4. लिंकवर क्लिक करताच नवी विंडो ओपन होईल. ज्यात तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल. 
 5. पूर्ण माहिती भरुन झाल्यावर फॉर्म सबमिट करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी