पेन्शनसाठी आता म्हातारे होण्याची गरज नाही, या प्लॅनमध्ये करा गुंतवणूक आणि चाळीशीत मिळवा पेन्शन

LIC Saral Pension Scheme : बहुतांश वेळा पेन्शन प्लॅनची गुंतवणूक जरी तरुण वयातच सुरू होत असली तरी पेन्शन मिळण्यास सुरूवात मात्र वयाच्या ६० वर्षानंतरच होते. एलआयसीच्या नव्या प्लॅनमध्ये चाळीशीतच पेन्शन मिळते.

LIC Saral Pension Scheme
एलआयसी सरल पेन्शन योजना 

थोडं पण कामाचं

  • ४० ते ८० वर्षांच्या वयोगटात कधीही एकरकमी पैसे जमा करून दर महिन्याला, दर तिमाहीला, सहामाहीला किंवा वार्षिक स्वरुपात पेन्शन मिळवू शकता.
  • पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून ६ महिन्यात पॉलिसी होल्डरला कोणत्याही वेळी कर्ज मिळते
  • पेन्शन घेणारी व्यक्ती जोपर्यत जिवंत असेल तोपर्यत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला बेस प्रिमियम परत मिळेल.

नवी दिल्ली: पेन्शन प्लॅन हा एक अत्यंक लोकप्रिय गुंतवणूक प्रकार आहे. बाजारात याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या उतारवयात किंवा निवृत्तीनंतर आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, दर महिन्याच्या खर्चासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक पेन्शन प्लॅनमध्ये (Pension Plan) गुंतवणूक करतो. बहुतांश वेळा पेन्शन प्लॅनची गुंतवणूक (Investment) जरी तरुण वयातच सुरू होत असली तरी पेन्शन मिळण्यास सुरूवात मात्र वयाच्या ६० वर्षानंतरच होते. तोपर्यत त्या प्लॅनमध्ये आपल्याला दरमहा गुंतवणूक करावी लागते. एलआयसीने असा एक प्लॅन (LIC Pension Plan) आणला आहे ज्यात वयाच्या ४०वर्षापासूनच पेन्शन मिळण्यास सुरूवात होते. यात फक्त दर महिन्याला गुंतवणूक करण्याऐवजी एकरकमी पैसे जमा करावे लागतात. हा प्लॅन त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे चांगली रक्कम बचत झालेली आहे मात्र दर महिन्याला उत्पन्न मिळण्याचा स्त्रोत नाही. अशावेळी आपल्या बचतीला सुरक्षित ठेवून मंथली इन्कम पेन्शन त्यांना सुरू करता येऊ शकते. या योजनेचे नाव आहे एलआयसी सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme). (To get the Pension one need not require to get Older now, LIC Saral Pension Plan gives pension in your 40s)

एलआयसी सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme)

यातील खास बाब म्हणजे एलआयसीने कोरोना काळातच नवीन सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Scheme)बाजारात आणली आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक महिलांना त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार असलेला कर्ता माणूस गमवावा लागला आहे. अशावेळी दर महिन्याचा खर्च, मुलांचे पालनपोषण आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे त्या महिलांवर आली आहे. अशावेळी त्या महिलांना पेन्शन प्लॅन उपयुक्त ठरू शकतो. अनेकवेळा कुटुंबाकडे काही रोख रक्कम किंवा इतर स्वरुपात बचत शिल्लक असते. काहींकडे विम्याची रक्कम हाती आलेली असते. मात्र एरवी ती प्रत्यक्ष खर्च करण्यास सुरूवात केल्यास काही काळाने हाती काहीही उरत नाही. अशावेळी सरल पेन्शन प्लॅनमध्ये एकरकमी पैसे गुंतवून दर महिन्याला एक निश्चित उत्पन्न त्यातून मिळू शकते. यातून कुटुंबाचा दर महिन्याचा खर्च भागवला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर घरातील बचतदेखील सुरक्षित राहील.

४० ते ८० वर्षांच्या नागरिकांना मिळू शकतो लाभ

एलआयसीच्या नव्या सरल पेन्शन योजनेत ती सर्व वैशिष्ट्ये आहेत जी याआधीच्या पेन्शन प्लॅनमध्ये नव्हती. म्हणजेच तुम्ही ४० ते ८० वर्षांच्या वयोगटात कधीही एकरकमी पैसे जमा करून दर महिन्याला, दर तिमाहीला, सहामाहीला किंवा वार्षिक स्वरुपात पेन्शन मिळवू शकता. हे पेन्शन पूर्ण हयातीभर मिळते. हा पहिला प्लॅन आहे ज्यात १०० टक्के रक्कम परत मिळते. म्हणजेच ही पेन्शन योजना एखाद्या व्यक्तीशी जोडलेली असेल. पेन्शन घेणारी व्यक्ती जोपर्यत जिवंत असेल तोपर्यत त्याला पेन्शन मिळत राहील. त्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला बेस प्रिमियम परत मिळेल. दुसरा पेन्शन प्लॅन जॉइंट लाइफसाठी आहे. यामध्ये पती किंवा पत्नी यापैकी जो कोणी जास्त जिवंत राहील त्याला पेन्शन मिळते. दोघांच्या मृत्यूनंतर नॉमिनीला बेस प्रिमियम मिळेल. या प्लॅनमध्ये पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून ६ महिन्यात पॉलिसी होल्डरला कोणत्याही वेळी कर्ज मिळू शकते.

भरलेले पैसे परत काढून घेण्याची सुविधा

जर तुमचे वय ४० वर्षे आहे आणि तुम्ही १० लाख रुपयांचा सिंगल प्रिमियम भरला असेल तर तुम्हाला वर्षाला ५०,२५० रुपये आयुष्यभर मिळण्यास सुरूवात होईल. याशिवाय जर तुम्हाला मध्येच काही कारणास्तव जमा केलेली रक्कम परत हवी असेल अशा परिस्थिती ५ टक्के कपात करून तुम्हाला जमा केलेली रक्कम परत करण्यात येईल. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेची माहिती तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर मिळे. तिथे जाऊन तुम्ही सर्व माहिती आणि बारकावे तपासून घेऊ शकता. हा पेन्शन प्लॅन ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात घेता येतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी