३० नोव्हेंबरला LIC चे हे प्लान होताहेत बंद, त्यात तुमचा तर नाही ना... 

काम-धंदा
Updated Nov 04, 2019 | 15:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

LIC News:एलआयसी या महिन्याच्या अखेरीस अनेक प्लान विड्रॉल करू शकते. यात कंपनीचे काही बेस्ट सेलर प्लानही आहेत. नव्या दिशा निर्देशानुसार हे प्लान नसल्यामुळे त्यांना बंद करण्याचा निर्णय कंपनी घेऊ शकते. 

lic will close many insurance plan from 30 november business news in marathi google batmya
३० नोव्हेंबरला LIC चे हे प्लान होताहेत बंद, त्यात तुमचा तर नाही ना...   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • एलआयसी या महिन्याच्या अखेर अनेक प्लान करणार बंद 
  • २०१९ मध्ये जारी करण्यात आलेल्या दिशा निर्देशानुसार  हे प्लान नसल्यामुळे त्यांना बंद करण्याचा निर्णय कंपनी घेऊ शकते. 
  • कंपनी हे सर्व प्लानमध्ये आवश्यक बदल करून नव्याने रिलॉन्च करू शकतात. 

नवी दिल्ली :  सार्वजनिक क्षेत्राची दिग्गज कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत दोन डझनपेक्षा जास्त वैयक्तिक विमा प्रोडक्ट, ८ ग्रुप विमा प्लान (Insurance Plan) आणि ७ ते ८ रायडर्सला बंद करणार आहे. रिपोर्टनुसार कंपनी असे काही प्लान बंद करत आहेत, त्यात काही बेस्ट सेलर प्लान आहेत. जसे जीवन आनंद (Jeevan Anand), जीवन उमंग (Jeevan Umang), जीवन लक्ष्य (Jeevan Lakshya) और जीवन लाभ (Jeevan Labh) यांचा समावेश आहे. 

हे सर्व प्लान कंपनी रिव्हाईज करून रिलॉन्च करू शकतो. एलआयसी हे सर्व प्लान विमा रेग्युलेटरचे रिव्हाइज कस्टमर केंद्रीत गाइडलाइननुसार रिलॉन्च करू शकते. त्यामुळे नव्या प्रोडक्टमध्ये कमी बोगस रेट आणि जास्त प्रीमियम रेट पाहावा लागणार आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार ३० नोव्हेंबरला ७५ ते ८० प्रोडक्ट बंद होऊ शकतात. हे सर्व प्लान ८ जुलै २०१९ ला विमा प्रोडक्ट रेग्युलेशननुसार नाही आहेत. एलआयसी इन्शुरन्स एजेंट ३० नोव्हेंबरपर्यंत जास्तीत जास्त ग्राहकांना सध्याचे प्लान खरेदी करण्याचा आग्रह करत आहेत. 

इंश्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलमेंट अॅथोरिटी एका वरिष्ठ अधिकारीने सांगितले, आम्ही बाजारात काही विघटन दिसत येत नाही. इन्शुरन्स कंपन्या आपल्या काम करत आहेत. त्यामुळे ७५ ते ८० प्रोडक्ट बाजारातून ३० नोव्हेंबरनंतर माघारी घेण्यात येणार आहेत. सध्या असे अनेक प्रोडक्ट आहेत. जे नियमांनुसार ते १ डिसेंबरनंतरही विकण्यात येतील.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...