LIC | एलआयसीचा दमदार प्लॅन, तुमच्या मुलांसाठी करा १५० रुपयांची बचत, मिळवा १९ लाख

LIC Children Money Back Plan : एलआयसी आपल्या ग्राहकांना आणि सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन प्लॅन बाजारात आणत असते. एलआयसीच्या पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक (Investment)केली जात असते. सरकारी कंपनी असल्यामुळे लोकांना त्यात सुरक्षितता वाटते, शिवाय मिळणारा लाभदेखील चांगला असतो. मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन एलआयसीने एक दमदार प्लॅन आणला आहे. त्याचे नाव आहे चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन

LIC Children Money Back Plan
एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन
  • कमी रकमेसह भविष्यात मोठे फायदे
  • मुलांच्या भविष्यातील गरजांसाठी तरतूद करण्यासाठीचा प्लॅन

LIC Children Money Back Plan | नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीच्या योजना (LIC Plan)किंवा प्लॅन हे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत. एलआयसी आपल्या ग्राहकांना आणि सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन नवनवीन प्लॅन बाजारात आणत असते. एलआयसीच्या पॉलिसीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक (Investment)केली जात असते. सरकारी कंपनी असल्यामुळे लोकांना त्यात सुरक्षितता वाटते, शिवाय मिळणारा लाभदेखील चांगला असतो. मुलांचे भवितव्य लक्षात घेऊन एलआयसीने एक दमदार प्लॅन आणला आहे. त्याचे नाव आहे चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन (LIC Children Money Back Plan). या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी गुंतवणूक करू शकता. (LIC's new Children Money Back Plan, investment option for future requirements of your children)

एलआयसी चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन

मुलांच्या भवितव्यासाठी, आर्थिक गरजांसाठी पालक गुंतवणूक करत असतात. अशावेळी बाजारात विविध पर्याय उपलब्ध असतात. एलआयसीचा चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन हा असाच दमदार पर्याय आहे. एलआयसीचा चिल्ड्रन मनी बॅक प्लॅनचा कालावधी २५ वर्षांचा असतो. यामध्ये मॅच्युरिटीची रक्कम तुम्हाला टप्प्या टप्प्याने दिली जाते. तुमचे अपत्य १८ वर्षांचे असताना पहिला हफ्ता मिळतो, त्यानंतर २० वर्षांचे झाल्यावर दुसरा आणि २२ वर्षांचे झाल्यावर तिसरा हफ्ता मिळतो. शिवाय यात बोनसदेखील मिळतो. विमाधारकाला विमा रकमेच्या २०-२० टक्के रक्कम मनी बॅक  म्हणून मिळते. त्याचबरोबर अपत्य २५ वर्षांचे झाल्यावर त्या पूर्ण रक्कम दिली जाते. शिवाय उरलेल्या ४० टक्के रकमेसोबत बोनसदेखील मिळतो. तुम्ही जितक्या लवकरच पॉलिसी घ्याल तितका अधिक फायदा फायदा होईल.

वयाची अट आणि फायदा

एलआयसीचा चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन घेण्यासाठी वयाची अट शून्य ते १२ वर्षे आहे. यात ६० टक्के रक्कम हफ्त्यात दिली जाते तर उर्वरित ४० टक्के रक्कम मुदतपूर्तीच्या वेळेस बोनससह मिळते. तुम्ही या योजनेत १ लाखांचा किमान विमा घेऊ शकता. विम्याच्या रकमेस कमाल मर्यादा नाही. हफ्ते न भल्यास व्याजासह एकरकमी रक्कम मिळते. जर तुम्ही १५० रुपयांची दररोज बचत करणार असाल तर विम्याचा वार्षिक हफ्ता ५५,००० रुपये होईल. म्हणजेच २५ वर्षात एकूण १४ लाख रुपये जमा होतील. त्यावर तुम्हाला १९ लाख रुपये मिळतील.

एलआयसी पॉलिसी सरेंडर करताना जाणून घ्या हा नियम

एलआयसीची पॉलिसी (LIC Policy)घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशभरात एलआयसीचे जाळे पसरलेले आहे. मात्र अनेकवेळा आर्थिक संकटामुळे किंवा इतर कारणांमुळे एलआयसीची (LIC)घेतलेली पॉलिसी बंद करण्याची वेळ पॉलिसीधारकांवर येते. प्रीमियम (Premium)भरण्यात अडचण येत असेल किंवा पॉलिसी पुरेशी वाटत नसेल तर ती विमा पॉलिसी बंद करण्याचा विचार केला जातो. अशावेळी पॉलिसी बंद केल्यावर तुम्हाला काही पैसे परत मिळतात याला सरेंडर व्हॅल्यू (surrender value)म्हणतात. पॉलिसी सरेंडर करण्यासाठीची एक प्रक्रिया असे आणि नियमावली असते. मात्र पॉलिसी सरेंडर करताना तुम्हाला हे माहित असायला हवे की पॉलिसी सरेंडर व्हॅल्यू ही करपात्र असते की नाही, प्राप्तिकर विवरणपत्र भरताना सरेंडर व्हॅल्यूचा उल्लेख केला पाहिजे की नाही, सरेंडर व्हॅल्यूवर प्राप्तिकर भरावा लागतो की नाही. 

जेव्हा तुम्ही पॉलिसी सरेंडर करण्याचे ठरवता तेव्हा त्यासंदर्भातील टॅक्सबद्दलचा नियम जाणून घेतला पाहिजे. सर्वसाधारपणे असा नियम असतो की जर सुरूवातीचे दोन वर्षे प्रीमियम भरण्यात आला असेल तर सरेंडर व्हॅल्यूवर कोणताही टॅक्स लागत नाही. पॉलिसी केव्हा घेण्यात आली आहे यावरदेखील टॅक्सचा नियम अवलंबून असतो. जर पॉलिसी ३१ मार्च २००३च्या आधी घेतली असेल तर ती पॉलिसी पूर्णपणे टॅक्सफ्री आहे. मात्र जर पॉलिसी १ एप्रिल २००३ पासून ३१ मार्च २०१२ दरम्यानची असेल तर सरेंडर व्हॅल्यूवर टॅक्स तेव्हाच माफ असेल जेव्हा सम अश्युअर्डची रक्कम प्लॅनच्या वार्षिक प्रीमियमपेक्षा ५ पट असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी