Indian Railway | रेल्वे प्रवाशांना झटका! विमानतळाप्रमाणेच प्रवाशांना द्यावे लागणार स्टेशन युजर चार्ज

User charge on railway station: लवकरच तुम्हाला ट्रेनने (Train) प्रवास करण्यासाठी ५० रुपये जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railway)विमानतळाप्रमाणेच विकसित केलेल्या रेल्वे स्टेशनवर विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट फी (Station Development Fee)आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क प्रवाशांना युजर चार्जच्या रुपात द्यावे लागणार आहे.

Station Development Fee
रेल्वे स्टेशनवर डेव्हलपमेंट फी 
थोडं पण कामाचं
  • रेल्वे प्रवाशांना बसणार युजर चार्जचा अतिरिक्त भुर्दंड
  • विमानतळाप्रमाणे विकसित केलेल्या रेल्वे स्टेशनवर आकारला जाणार अतिरिक्त चार्ज
  • रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय

Railway Station Development Fee | नवी दिल्ली : नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांच्या (Railway passengers) खिशावरील भार वाढणार आहे. लवकरच तुम्हाला ट्रेनने (Train) प्रवास करण्यासाठी ५० रुपये जास्त शुल्क द्यावे लागणार आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railway)विमानतळाप्रमाणेच विकसित केलेल्या रेल्वे स्टेशनवर विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट फी (Station Development Fee)आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क प्रवाशांना युजर चार्जच्या रुपात द्यावे लागणार आहे. (Like Airport, now railway passengers need to pay development charges on stations)

१० ते ५० रुपये असेल शुल्क

विमानतळाच्या धर्तीवर विकसित करण्यात आलेल्या रेल्वे स्टेशनवर आता प्रवाशांकडून युजर चार्ज लावला जाणार आहे. हे शुल्क १० ते ५० रुपयांच्या दरम्यान असणार आहे. देशभरात ४०० रेल्वे स्टेशनना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुविधाप्रमाणेच विकसित करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाकडून केला जातो आहे. यामध्ये बहुतांश रेल्वे स्टेशन हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रकारातील आहेत. गांधीनगर आणि भोपालचे रानी कमलावती रेल्वे स्टेशन याआधीच विकसित होऊन तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन देखील केले आहे. 

रेल्वे बोर्डाने दिली मंजूरी

रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांवर युजर चार्ज लावण्यास मंजूरी देण्यात आली आहे. वेगवेगळ्या श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांवर चार्जदेखील वेगवेगळा लागणार आहे. याचा समावेश तिकिटातच केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यतचा युजर चार्ज लागणार आहे.

विमानतळावर लावला जातो असा शुल्क

अनारक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क १० रुपये असणार आहे. तर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क २५ रुपये आणि एसीमधून प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क ५० रुपये असणार आहे. याच प्रकारचे शुल्क देशात विमानतळावरदेखील घेतले जाते. अर्थात रेल्वे मंत्रालयानुसार हा युजर लार्ज केव्हापासून लागू होणार याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. प्लॅटफॉर्म तिकिट विकत घेणाऱ्यांसाठीदेखील हे शुल्क १० रुपये इतके असणार आहे. विमानतळाप्रमाणे विकसित करण्यात आलेल्या स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांकडून निश्चित शुल्काच्या ५० टक्के रक्कम घेतली जाणार आहे.

भारतीय रेल्वेने (Indian Railway)देशभरातील जवळपास ३६० गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही ट्रेनच्या मार्गात बदल करून त्यांचे रिशेड्यूलिंग करण्यात आले आहे. रेल्वे विभाग दररोज बदल करण्यात आलेल्या किंवा रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती जाहीर करत असते. त्यामुळे तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर रेल्वे गाड्यांची माहिती करून घ्या.

रेल्वे विभागाने मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यात ३४६ ट्रेन पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तर २० ट्रेनना अंशत: रद्द करण्यात आले आहे. रेल्वे १७ गाड्यांच्या मार्गात बदल केले आहेत. तर १३ गाड्यांचे रिशेड्युलिंगदेखील केले आहे. देशातील कोरोना संक्रमण आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या संसर्गामुळे रेल्वे प्रवाशांना कोरोना निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. रेल्वेकडून प्रवाशांना रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक तपासण्याचीही सूचना करण्यात येते आहे. त्यामुळे तुम्हीदेखील जर प्रवासाचे नियोजन करत असाल तर रेल्वेचे वेळापत्रक नक्की तपासा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी