PM Jan Dhan Yojana: जनधन खाते करा आधार कार्डशी लिंक, मिळवा ५,००० रुपये, जाणून घ्या तपशील

काम-धंदा
Updated Oct 15, 2020 | 17:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

आता आपण आपले जनधन खाते आधार कार्डाशी लिंक करू शकता. तसेच गरज पडल्यास यातून ५,००० रुपये काढूही शकता. भले आपल्या खात्यात पैसे असोत किंवा नसोत. या योजनेचे तपशील जाणून घेण्यासाठी हे वाचा.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana
PM Jan Dhan Yojana: जनधन खाते करा आधार कार्डशी लिंक, मिळवा ५,००० रुपये, जाणून घ्या तपशील 

थोडं पण कामाचं

  • जनधन खात्यांमधून ५,००० रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट
  • ओव्हरड्राफ्ट करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
  • जनधन योजनेच्या खात्याचे आणखीही अनेक फायदे

मुंबई: पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) स्वप्नातील योजनांपैकी (dream scheme) एक ही जनधन योजना (Jan Dhan scheme) आहे. या योजनेअंतर्गत आपण शून्य रकमेसह (zero balance) आपले खाते (bank account) उघडू शकता. ही योजना खासकरून अशा लोकांसाठी आणली गेली होती ज्यांची खाती बँकेत नव्हती. या योजनेची सुरुवात पंतप्रधान मोदींनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी केली होती. याद्वारे अल्पवयीन मुलेही (minors) आपल्या गार्डियनसह (guardians) आपले खाते उघडू शकतात. या खात्याचे अनेक फायदे आहेत. सरकारी योजनांपासून (government schemes) मिळणारे लाभ थेट लाभार्थींच्या खात्यात (beneficiaries’ account) जातात. उदाहरणार्थ, कोरोनाच्या संकटादरम्यान (corona pandemic) सरकारने महिलांच्या बँक खात्यांमध्ये तीन महिन्यांपर्यंत पाचशे रुपये घातले होते. उज्ज्वला योजनेचे (Ujjwala scheme) फायदेही थेट जनधन खात्यात पाठवले जातात. याचे इतरही अनेक फायदे आहेत. गरज पडल्यास यातून ५,००० रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते.

जनधन खात्यांमधून ५,००० रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट

जर आपल्याला खूप गरज असेल तर आपण जनधन खात्यामधून ५,००० रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट करू शकता. भले आपल्या खात्यात पैसे असोत किंवा नसोत. मात्र हे लक्षात ठेवा की याचे स्वरूप कर्जासारखे असेल. ते बँकेला परत करावे लागेल. ओव्हरड्राफ्टचा अर्थ असतो की आपण आपल्या बँक खात्यात पैसे नसतानाही काही पैसे काढू शकता.

ओव्हरड्राफ्ट करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

ओव्हरड्राफ्ट करण्यासाठी आपल्याला काही अटीही आहेत. ओव्हरड्राफ्टसाठी आधी ६ महिने जनधन खातेधारकाला खात्यात पुरेशी रक्कम ठेवावी लागते. तसेच आपल्याला रूपे डेबिट कार्डवरून व्यवहारही करावे लागतील. जेव्हा बँकेला खात्री पटेल तेव्हा आपल्याला ओव्हरड्राफ्ट मिळेल. यावर व्याजदरही कमी असेल.

बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करणे आवश्यक

जर आपण ५,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट करू इच्छित असाल तर आपले बँक खाते आपल्या आधारकार्डाशी लिंक करा. हे आवश्यक आहे. याद्वारे आपण बँकेतून ५,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट काढू शकता. यासोबतच आपल्याला अनेक लाभ मिळतील. रूपे डेबिट कार्डावर आपल्याला एक लाख रुपयांपर्यंतचा दुर्घटना विमा मिळतो. भले आपल्या खात्यात पैसे असोत किंवा नसोत. ३०,००० रुपयांचा अधिक विमाही मिळू शकतो. अशाप्रकारे खातेधारकाचा एखाद्या दुर्घटनेत मृत्यू झाल्यास तर १.३ लाख रुपये क्लेम केले जाऊ शकतात. जर आपले बँक खाते आधारकार्डाशी लिंक केलेले नसेल तर आपल्याला हा फायदा मिळणार नाही.

जनधन योजनेच्या खात्याचे आणखीही अनेक फायदे

जनधन खात्याच्या या लाभांशिवाय इतरही अनेक फायदे आहेत. या खात्यातून आपण देशभरात कुठेही पैसे पाठवू शकता. सरकारी योजनांचे पैसे थेट आपल्या खात्यात जमा होतात. पेन्शन योजनाही सोप्याने मिळवता येतात. इतकेच नाही, तर आपण आपल्या खात्यात पैसे जमा केलेत तर बँकेच्या नियमांनुसार आपल्याला व्याजही मिळते.   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी